महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई-ठाण्यात जलसंचय वाढला – Imd Heavy Rain Alert

Vishal Patole
Imd Heavy Rain Alert

IMD Heavy Rain Alert – भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, आगामी काही दिवसांत अत्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत 18 आणि 19 ऑगस्ट 2025 रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.मुंबई उपनगर, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, कोल्हापू या जिल्ह्यात अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट तर कोकण विभागात – पालघर, ठाणे, मराठवाडा विभागात– छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर तर विदर्भ विभागात – अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/ पोर्टल वर इशारा देण्यात आला आहे.

IMD Heavy Rain Alert

IMD Heavy Rain Alert महाराष्ट्रात अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत हवामान विभागाने अतिवृष्टीसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबई उपनगर, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, पालघर, ठाणे, नाशिक, सिंधुदुर्ग, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पुरस्थिती, पाणी साचणे आणि वाहतूक कोंडी अशा संकटांचा सामना करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना दिली आहे. हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहत आपली काळजी घ्यावी.

18 ऑगस्ट 2025 – रेड व ऑरेंज अलर्ट जिल्हे

  • अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट:
    मुंबई उपनगर, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर
  • जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट:
    कोकण – पालघर, ठाणे
    मराठवाडा – छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर
    विदर्भ – अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली

19 ऑगस्ट 2025 – रेड व ऑरेंज अलर्ट जिल्हे

  • अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट:
    पालघर, पुणे, सातारा
  • जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट:
    मुंबई उपनगर, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर

मुंबईसह राज्यातील मुख्य शहरांचा हवामानाचा आढावा (आज, 18 ऑगस्ट 2025)

  • मुंबई : सतत जोरदार पाऊस, तापमान 32.8°C, आर्द्रता 52%
  • पुणे : हलका सरींचा अनुभव, तापमान 22.8°C, आर्द्रता 93%
  • कोल्हापूर : मुसळधार पावसाची शक्यता
  • रत्नागिरी, सातारा, रायगड जिल्ह्यात पावसाचा प्रचंड जोर कायम

नागरिकांसाठी आवाहन

राज्यातील उपरोक्त जिल्ह्यांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाने आपत्कालीन सेवांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. जलसंचय, पुरस्थिती, वाहतूक कोंडी अशा समस्यांसाठी पूर्व उपाययोजना घेण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

हवामानाची ताजी माहिती www.mausam.imd.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट:

तारीखरेड अलर्ट जिल्हेऑरेंज अलर्ट जिल्हे
18-08-2025मुंबई उपनगर, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूरपालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली
19-08-2025पालघर, पुणे, सातारामुंबई उपनगर, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर

नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेऊन सुरक्षित राहावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.

IMD Heavy Rain Alert – हवामान विभागानुसार, पुढील सात दिवस महाराष्ट्र, गोवा तसेच गुजरात या राज्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.मुंबई व कोकणपट्टीत 17 ते 19 ऑगस्ट या कालावधीत अत्यंत मुसळधार पाऊस कोसळणार आहे.गुजरात परिसरात 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान तर सौराष्ट्र भागात 19 आणि 20 ऑगस्ट रोजी पावसाची तीव्रता सर्वाधिक असेल. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या भागात 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने या काळात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या जोमदार वाऱ्यांचाही इशारा दिला आहे.

मुंबई महानगर प्रदेशात सावधानतेचा इशारा
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या IMD Heavy Rain Alert जिल्हास्तरीय अंदाजानुसार संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाला 19 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, पालघर जिल्ह्यासाठी 19 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून, स्वतंत्र ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई शहरात या काळात “अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस” होईल असा अंदाज नाविण्यात आला आहे.

पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत
रविवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. मुंबईतील माहिम परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले तर मिठी नदीचे पाणीपातळीदेखील वाढलेली आढळली. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.

IMD Heavy Rain Alert अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्ली-एनसीआरला ११,००० कोटी रुपयांची भेट; UER-II आणि द्वारका द्रुतगती मार्गाचे (Dwarka Expressway) लोकार्पण

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत