भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील ― दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला हरवले ! – Ind Vs Eng

Vishal Patole
Ind Vs Eng

Ind Vs Eng – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम, ६ जुलै २०२५ (पाचवा दिवस, टी ब्रेक )- भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अत्यंत अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाचा ३३७ धावांनी दारुण पराभव केला आहे. पाच सामन्याच्या टेस्ट मालिकेतील या अगोदर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडच्या संघाने ५ विकेट्सनी पराभव केला होता. त्यामुळे ५ टेस्ट सामन्यांच्या या तेंडूलकर – एंडरसन ट्रॉफी मध्ये इंग्लंड आणि भारतीय हे दोन्ही संघ १-१ च्या बरोबरीत आले आहेत.

Ind Vs Eng – तेंडूलकर – एंडरसन ट्रॉफी द्वितीय सामना

एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या सामन्याचा प्रवास- सामन्याच्या सुरुवातील व पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाने अगोदर जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला परंतु त्यांना भारतीय संघाला आवर घालता आली नाही व भारताने ५८७ धावांचा डोंगर पहिल्या डावात उभा केला ज्यामध्ये कप्तान शुभमन गिल ने द्विशतकी खेळी खेळत ५८७ धावा केल्या तुअल जडेजाने ८९ धावा काढून चांगली साथ दिली. मात्र इंग्लंड चा संघ पहिल्या डावात ४०७ धावा काढून बाद झाला जेमी स्मिथने १८४ आणि ब्रूकने १५८ धावा करत इंग्लंड संघाला मजबुती दिली. दुसऱ्या डावात भारतीय संघाने ४२७ / ६ अशी धावसंख्या असताना डाव घोषित केला ज्यामध्ये पुन्हा गिल ने सर्वाधिक १६१ धावा काढून आपली जबाबदारी पाडली त्याला पंत्ने ६५ धावांची खेळी करून सुरेख साथ दिली. सध्या इंग्लंड संघाचा दुसऱ्या डावाचा खेळ सुरु असून टी ब्रेकपर्यंत इंग्लंड संघ २३२ / ८ या धावसंख्येवर खेळत होते. परंतु आकाशदीपच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. इंग्लंड चे प्रमुख फलंदाज जसे कि बेन डकेट (२५/१५ -५,०), ऑली पोप (२४/५०-३,०), जो रूट (६/१६ -१,० ) या तिघांना क्लीन बोल्ड (त्रिफळाचीत) केले तर फलंदाज हॅरी ब्रूक (२३/ ३१- ३,०),याला पायचीत (एल बी डब्ल्यू) बाद केले. तर शेवटी चिवट फलंदाजी करत चांगली धावसंख्या करण्याच्या प्रयत्नात असलेला इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथला आकाशदीने सुंदर च्या हाथी झेल देण्यास भाग पाडले. ब्रायडन कार्स(३८/४८-५,१) हा आकाशदीपचा सहावा बळी ठरला तो आकाशदीपच्या गोलंदाजीवर शुभमन गिल च्या हाथी झेलबाद झाला. अशारितीने आकाशदीपने आपल्या २१.१ ओव्हर मध्ये २ ओव्हर निर्धाव (मेडन) करत केवळ ४.६७ च्या इकोनोमी रेटने ९९ धावा देत इंग्लंड संघाचे एकूण सहा फलंदाज बाद करून इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले. तसेच प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि वाशिंगटन सुंदर या सर्वांनी एक एक फलंदाज बाद करत भारतीय संघाचा विजयाचा मार्ग प्रशस्त केला. इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स (३३/७३-६,०) वाशिंगटन सुंदर च्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला, क्रिस वोक्स ( ७/३२-१,०) हा मोहम्मद सिराज च्या हाथात झेल दिला तो प्रसिद्ध कृष्णा च्या गोलंदाजीवर बाद झाला, तर मोहमम्द सिराज ने झॅक क्रॉलीला (0/7- 0,0) भोपळा न फोडू देता उपखिलाडू (बी. साई सुदर्शन) च्या हाती झेलबाद केले. तर रवींद्र जडेजा ने जॉश टंग ला ( २/२९- ० ,० ) मोहम्मद सिराजच्या हाती झेलबाद केले. तर शेवटी शोएब बशीर (१२ / १२, १,१) नाबाद राहिला अशारितीने भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड फलंदाजांना दुसऱ्या डावात केवळ २७१ धावात गुंढाळले व सामना ३३७ धावांनी जिंकला तसेच ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

डावभारतइंग्लंड
१ला डाव५८७ ऑल आउट (शुभमन गिल २६९ , जडेजा ८९ )४०७ ऑल आउट (जेमी स्मिथ १८४ आणि हॅरी ब्रूक १५८ )
२रा डाव४२७ /६ डेक्लेअर (गिल 161, पंत 65)२७१ / १० भारत ३३७ धावांनी विजयी

दिवस ५, ६८.१ ओव्हरनंतरची स्थिती (लक्ष्य ६०८ ), इंग्लंड २७१ /१० , भारत ३३७ धावांनी विजयी

Ind Vs Eng – द्वितीय सामना निर्णायक क्षण

  1. गिलचा द्विशतकी आणि शतकांचा लोकोत्सव पहिल्या डावात कर्णधार शुभमन गिलचे २६९ धावांचे भव्य द्विशतक.
    दुसऱ्या डावातही फटकेबाजीची परंपरा कायम ठेवत १६१ धावा, १३ चौकार + ८ षटकार.
  2. मो. सिराज‑आकाश दीपची विध्वंसक गोलंदाजी पहिला डाव: सिराज ६ /७० , आकाश दीप ४ /८८ .
    दुसरा डाव (लक्ष्याचा पाठलाग): आकाश दीपने निम्मा संघ गुंढाळला — १३ ‑१ ‑५२ ‑४ .
  3. इंग्लंडची मोर्चेबांधणी डळमळीत बेन डकेटचे १५ चेंडूंमध्ये झटपट २५ धावांचे झटपट फटके, पण तितक्याच वेगाने पतन.६८.१ ओव्हरमध्ये २७१ /१० भारत ३३७ धावांनी विजयी

आजची सत्ररचना (स्थानिक वेळ)

सुरुवात 12:40  |  लंच 14:30 – 15:10
ड्रिंक्स ब्रेक 16:20 — इथेच इंग्लंड 110/5
टी ब्रेक 17:10 – 17:30  |  खेळ समाप्ती19:00

Ind Vs Eng – द्वितीय सामना रंगतदार आकडे

भारताचे टॉप स्कोअरधावाइंग्लंडचे विकेटटेकरबळी
शुभमन गिल२६९  & १६१ आकाश दीप४/५२ (द. डाव)
रवींद्र जडेजा८९  & ६९ *मो. सिराज६/७० (१. डाव)
यशस्वी जयस्वाल८७ जोश टंग२/९३ (२. डाव)

Ind Vs Eng – द्वितीय सामन्याची निर्णायक टप्प्याकडे वाटचाल

लक्ष्य: ६०८ धावा
सद्य स्थिती: इंग्लंड १८० /६ (हॅरी ब्रूक 23; बेन स्टोक्स 10, जेमी स्मिथ 11)
भारताला गरज: उरलेले २ बळी
इंग्लंडला गरज: ३७० धावा, वेळ आणि संयम दोन्ही कमी

रेफ्री व पंच पथक

उमपायर्स: ख्रिस गॅफनी (NZ) व शरफुद्दुल्ला (BAN) – DRS
टीव्ही उमपायर: पॉल राइफेल (AUS)
राखीव: मार्टिन सॅगर्स (ENG)
सामना निरीक्षक: रिची रिचर्डसन (WI)

भारताचा विजय जवळपास निश्चित मानला जात असला, तरी ऐतिहासिक एजबॅस्टनवर आश्चर्ये घडतातच. उरलेल्या सत्रांमध्ये इंग्लंडची शेवटची पत जोर कसा धरते यावरच या कसोटीतील अंतिम निकाल ठरणार आहे. जगभरातील चाहत्यांची नजर आता या अखेरच्या काही तासांवर टिकली आहे!

बि. सी.सी. आय. ची सामाजिक मध्यमावरील प्रतीकीयेसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

रामायण (Ramayan): एका अमर कथेचा भव्य महायज्ञ बॉलीवूडला जमेल का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागतिक दौऱ्याचा भारत–ग्लोबल साउथ (Global South) संबंधांवर दूरगामी परिणाम

TAGGED:
Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत