टी-20 मध्ये भारताचा भव्य विजय: तिलक आणि संजूच्या शतकांसोबत आर्शदीपची धडक – IND Vs SA

Vishal Patole
Ind Vs SA

IND VS SA- भारताचा ऐतिहासिक विजय: तिलक आणि संजूच्या धगधगत्या नाबाद शतकांनी दक्षिण आफ्रिकेला १३५ धावांनी पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेच्या T20 इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेतील, जोहान्सबर्गमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या T20 सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने २८३/१ असा विशाल स्कोअर उभा केला, आणि दक्षिण आफ्रिकेला केवळ १४८ धावांवर ऑलआउट करून १३५ धावांनी मोठा विजय मिळवला.

IND Vs SA

तिलक वर्मा आणि संजू सॅमसन दोघांची धडाकेबाज नाबाद शतकीय खेळी- IND VS SA

IND VS SA- दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने चार सामन्यांच्या T20 मालिकेतील अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेऊन आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर संजू सैमसन आणि अभिषेक शर्मा या दोघांनी चांगली सुरुवात करून दिली. सिपाम्लाच्या गोलंदाजीवर क्लासेन च्या हाथी झेलबाद देऊन अभिषेक शर्मा १८ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी ताबडतोड आणि धडाकेबाज फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढले. अभिषेक शर्मा नंतर एकही खिलाडू न गमावता भारताने २८३ धावांचा डोंगर उभा केला.

IND VS SA- तिलक वर्माने नाबाद १२० धावा केल्या त्याने ४७ चेंडूत ९ चौकार आणि १० उत्तुंग षटकार ठोकले त्यासोबतच संजू सॅमसनने ५६ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि ९ षटकार मारत १०९ नाबाद धावा केल्या. या दोघांनी मिळून एकत्रित २१० धावांची भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा अक्षरशः वेठीस धरले. दोघेही प्रत्येक चेंडूवर शॉट्स मारत होते आणि त्या वेळी ३०० धावा गाठणे शक्यच वाटत होते. सॅमसनने आपल्या करिअरमधील तिसरे शतक साकारले, तर तिलकने मागील सामन्यात आपल्या पहिल्या शतकानंतर आजचे दुसरे शतक साजरे केले.

भारतीय फलंदाजापुढे आफ्रिकी गोलंदाज हतप्रभ – IND VS SA

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना या दोघांच्या खेळापुढे काहीही सुचत नव्हतं. खास करून, मार्को जॅन्सन वगळता इतर कोणालाही या तुफानाचा सामना करणे शक्य झालं नाही. जॅन्सनला हलकं करून ३० धावा मिळवल्यानंतर, भारताने अंतिम १५ ओव्हरमध्ये २१९ धावा ठोकल्या.

अर्शदीपसिंगची चमकदार गोलंदाजी

दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिस्पर्ध्यांनाही या डोंगराएवढ्या स्कोअरचा पाठलाग करणं अत्यंत कठीण ठरलं. आर्शदीप सिंग (३-२० ) आणि हार्दिक पंड्या (१-८ ) यांनी सुरवातीच्या धडक्यात दक्षिण आफ्रिकेची १० धावा असताना ४ विकेट ची दयनीय स्थिती निर्माण केली. त्यानंतर साउथ आफ्रिकेचे खेळाडू झुंजार होण्याचा प्रयत्न करीत असले तरी, त्यांचा स्कोर १४८ पर्यंतच पोहोचला. ट्रिस्टन स्टब्स (४३ ) आणि डेव्हिड मिलर (३६ ) यांनी काही फटके मारले, पण यामुळे भारताचा विजय टळला नाही.

निःसंशय, हा दिवस तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या दोघांचा होता. त्यांची धडाकेबाज खेळी भारतासाठी ऐतिहासिक ठरली.

संक्षिप्त निकाल:
भारत: २८३/१ (टिलक वर्मा १२० , संजू सॅमसन १०९ )
दक्षिण आफ्रिका: १४८ (ट्रिस्टन स्टब्स ४३ , डेव्हिड मिलर ३६ ; आर्शदीप सिंग ३-२० , अक्षर पटेल २-६ )
भारत १३५ धावांनी विजय.

समाज माध्यमावरील प्रतिक्रियासाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

” (Gurunanak) गुरु नानक देवजींच्या जीवनातील सत्य आणि प्रकाश”

क्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अद्वितीय योद्धा (Lahuji Salve)

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत