IND vs SA T20- सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा,दक्षिण आफ्रिका – येथे १० नोव्हेंबरला खेळलेल्या ऐतिहासिक क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेने एक थरारक विजय मिळवला, या सोबतच दक्षिण आफ्रिकेच्या संघाची चार २० -२० सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. भारताविरुद्ध खेळताना, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अतिशय संयम आणि साहस दाखवला, आफ्रिकेने नाणेफेक जिंकत अगोदर भारतीय संघास फलंदाजीचे आमंत्रण दिले व मग अतिशय चांगली गोलंदाजी करत भारतीय संघास केवळ १२४ या अत्यंत कमी धावसंख्येवर रोखले त्यानंतर संयमी फलंदाजीचे प्रदर्शन केले व स्टब्स आणि कोएत्झी यांनी केलेल्य समजदारीपूर्ण व दमदार खेळाच्या जोरावर त्यांनी भारतावर दणदणीत विजय मिळवला.
- सामनावीर ट्रिस्टन स्टब्सची निर्णायक खेळी- IND vs SA T20
- भारताकडून वरूण चक्रवर्तीची चमकदार कामगिरी – IND vs SA T20
- भारतीय सलामी ढेपाळली – IND vs SA T20
- मधल्या फळीने सावध खेळ करत संघाला सन्मानजनक स्थितीत पोहोचविले- IND vs SA T20
- सामन्याच्या आधी भारतीय राष्ट्रगीतात तांत्रिक अडथला – IND vs SA T20
- भारताच्या कडव्या प्रयत्नांची प्रशंसा- IND vs SA T20
- समारोप- IND vs SA T20

सामनावीर ट्रिस्टन स्टब्सची निर्णायक खेळी- IND vs SA T20
IND vs SA T20 च्या दुसऱ्या क्रमांकाच्या सामन्याचा सर्व थरार अंतिम क्षणांमध्ये बघायला मिळाला आणि त्या क्षणाचे श्रेय गेलं ते दक्षिण आफ्रिकेच्या स्टब्स आणि कोएत्झी यांच्या अटूट संयमाला. दक्षिण आफ्रिकेचे ८६ धावांवर ७ गडी बाद झालेले असताना व संघ संघर्ष करत असताना, त्यांच्या विजयाची शक्यता कमी होती. परंतु, स्टब्स आणि कोएत्झी यांनी केवळ २० चेंडूत ४२ धावा करत, आणि शेवटी एक षटक शिल्लक ठेवून, आपल्या टीमला अप्रत्याशित विजय मिळवून दिला.
सामनावीर ट्रिस्टन स्टब्सने सांगितले, “धावगती आमच्यापासून कधीच दूर झाली नाही. कोएत्झी आला आणि शेवटी तो डाव खेळला. तो म्हणाला, ‘आपण हे जिंकू शकतो’. रन-ए-बॉलवर परत जाणे नेहमीच दोन हिट दूर होते. मी फक्त संयमी श्वास घेण्याचा प्रयत्न करत होतो. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे, त्यामुळे परिवारातील २०-३० लोक गेम पाहायला आले होते. त्यातही क्रिकेट खेळण्यासाठी हे माझे आवडते ठिकाण आहे.”असे तो म्हणाला.

भारताकडून वरूण चक्रवर्तीची चमकदार कामगिरी – IND vs SA T20
चक्रवर्ती, जो उत्तम मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखला जातो, त्याने मार्कराम, हेंड्रिक्सला, डेविड मिलर, मार्को जान्सेन आणि क्लासेन सारख्या खतरनाक फलंदाजांना स्वतात बाद केले. चक्रवर्तीने केवळ १७ दिल्या व ५ अविस्मरणीय विकेट्स पटकावल्या या आकड्यांसह सामन्यात भारतीय संघाला एक अप्रतिम लीड दिला.

भारतीय सलामी ढेपाळली – IND vs SA T20
IND vs SA T20 मालिकेतील द्वितीय सामन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला आमंत्रित केले. परंतु भारतीय सलामीवीरांना आज चमकदार कामगिरी करता आलीनाही. पहिल्याच ओव्हर मध्ये ३ चेंडू खेळून संजू सैम्सन बाद झाला. जन्सेन ने त्याला बोल्ड केले. त्यानंतर अभिषेक शर्मा केवळ ५ चेंडूत १ चौकार मारून जन्सेन च्या हाथी झेल देऊन बाद झाला. जोएत्झे ने त्याला बाद केले. सुर्याकुमार यादव देखील आजच्या सामन्यात काही खास करू शकला नाही त्याला शेम्लाने ने तो केवळ ४ धावांवर खेळत असताना एल.बी.डब्ल्यू. बाद केले. अशारातीने भारतीय सलामी ढेपाळली आणि भारताची धावसंख्या १५/३ अशी बिकट झाली.
मधल्या फळीने सावध खेळ करत संघाला सन्मानजनक स्थितीत पोहोचविले- IND vs SA T20
मधल्या फळीत आलेल्या तिलक वर्मा याने २० चेंडूत २० धावा, अक्षर पटेल ने २१ चेंडूत २७ धावा तर हार्दिक पंड्या च्या ४५ चेंडूत नाबाद ३९ धावांच्या संयमी खेळीने भारताचा डाव सावरला. त्यांनतर आलेल्या रिंकू सिंगने ११ चेंडूत ९ धावा तर अर्शदीप सिंग ने ६ चेंडूत ७ धावा करून भारतीय संघाला १२४ -६ या धावसंख्येवर पोहोचविले.दक्षिण आफ्रिकेकडून सहा गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्यापैकी केशव महाराज सोडून इतर सर्व पाच गोलंदाजांना १ – १ बळी मिळाला.
सामन्याच्या आधी भारतीय राष्ट्रगीतात तांत्रिक अडथला – IND vs SA T20
सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा,दक्षिण आफ्रिका येथे टी २० सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु होण्याअगोदर भारताचे राष्ट्रगीत वाजत असताना काही तांत्रिक अडचणींमुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली. रेकॉर्ड केलेला ऑडिओ दोन वेळा कापला गेला, आणि दोन्ही वेळेस तो पुन्हा सुरू करण्यात आला. यावर भारताच्या खेळाडूंनी शांती राखली आणि एकसंध आणि समर्पणाने ते राष्ट्रगीत अखंडपणे गात राहिले. अखेर, राष्ट्रगीत पूर्ण झाल्यावर खेळ सुरू झाला.
भारताच्या कडव्या प्रयत्नांची प्रशंसा- IND vs SA T20
अत्यल्प धावसंख्येचा बचाव करण्यासाठी व दक्षिण आफ्रिकेला रोखण्यासाठी भारताने जोरदार प्रयत्न केले. अर्शदीप सिंहच्या धारदार गोलंदाजीमुळे, रेकेल्टन लवकर गेला. भारताचे गोलंदाज अर्शदीप आणि बिश्नोई कडव्या परिश्रमाने खेळताना दिसले, मात्र दक्षिण आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर स्टब्स आणि कोएत्झी यांनी अखेरपर्यंत हार मानली नाही. विशेषत: कोएत्झीचा निर्णायक खेळ, जो खेळाच्या शेवटच्या क्षणात धावांची गती पकडून, स्टब्सला विश्वास दिला की विजय त्यांच्या जवळ आहे. कमी धावसंख्येचा बचाव करण्याच्या भारतीय संघाच्या प्रयत्नाने एकवेळ फक्त ३ विकेट्स मिळविल्या असत्या तर निकाल ब बदलला असता. म्हणून कमी धावा असताना सामना १९ व्या ओवर पर्यंत खेचला गेला. त्यातून भारतीय संघाची लढवू वृत्त्ती आणि हार न मानण्याची जिद्द दिसून येते.
समारोप- IND vs SA T20
हा सामना क्रिकेटप्रेमींना एक विस्मयकारी अनुभव देऊन गेला, आणि दक्षिण आफ्रिकेने शेवटी विजय मिळवला. हे सामन्याचे क्षण नक्कीच दीर्घकाळ आठवले जातील. सेंट जॉर्ज पार्कमध्ये एक अद्वितीय विजय, त्यातील सर्व भावना आणि संघर्ष, क्रिकेटच्या जगातील एक नवीन प्रेरणा ठरला आहे!
आमच्या अन्य ब्लॉगपोस्ट :
