IND Vs WI – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर !

Vishal Patole

भारत आणि वेस्ट इंडिज (IND Vs WI) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होत आहे. सकाळी ९:३० वाजता या ऐतिहासिक सामन्याची सुरुवात झाली असून थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स (DD Free Dish) वाहिनीवर करण्यात येत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी तितकीच महत्त्वाची मानली जात आहे. नुकताच आशिया चषक जिंकून आलेला भारतीय संघ आपला घरचा मोसम दमदार कामगिरीने सुरू करण्याच्या तयारीत आहे, तर वेस्ट इंडिज युवा खेळाडूंवर भिस्त ठेवून चुरशीने आव्हान उभे करण्यास सज्ज आहे.

IND Vs WI

IND Vs WI सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमची रंगत

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान म्हणून गौरवल्या जाते. पूर्वी ‘मोटेरा स्टेडियम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मैदानाची प्रेक्षक क्षमता जवळपास १,३२,००० इतकी असून, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज आहे. हे मैदान सर्वात अगोदर १९८२ साली बांधण्यात आले होते व २०२० मध्ये नव्याने अत्याधुनिक स्वरूपात तयार करण्यात आले. याच मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील २०२५चा पहिला कसोटी सामना होत आहे, ज्यासाठी देशभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळते आहे.

IND Vs WI थेट प्रक्षेपणाची सुविधा

क्रिकेट चाहत्यांसाठी डीडी स्पोर्ट्सवरील थेट प्रसारण ही मोठी संधी आहे. DD Free Dish वर मोफत प्रसारित होणाऱ्या या सामन्यामुळे देशभरातील प्रेक्षक आपल्या घरबसल्या भारताची कामगिरी पाहू शकतात.

भारतीय संघ अपेक्षित विजयाच्या धडपडीत आहे, तर वेस्ट इंडिजच्या संघाकडून नवनव्या चेहऱ्यांची झुंजही पाहायला मिळणार आहे. अहमदाबादमध्ये सुरू झालेला हा सामना चाहत्यांसाठी रोमांचकारी ठरणार यात शंका नाही.

IND Vs WI कसोटी मालिकेचा तपशीलवार वेळापत्रक

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा तपशीलवार वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

भारत बनाम वेस्ट इंडिज कसोटी मालिका वेळापत्रक

सामनादिनांकवेळस्थळ
पहिला कसोटी२ ते ६ ऑक्टोबरसकाळी ९:३० वा.नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
दुसरा कसोटी१० ते १४ ऑक्टोबरसकाळी ९:३० वा.अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

IND Vs WI सामन्यासाठी निवडलेले दोन्ही संघ

भारत-वेस्ट इंडिज पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवडलेली संघरचना पुढीलप्रमाणे आहे:

भारताची संघरचना:

  • शुभमन गिल (कर्णधार)
  • यशस्वी जयसवाल
  • के.एल. राहुल
  • साई सुदर्शन
  • देवदत्त पडिक्कल
  • ध्रुव जुरेल (विकेटकीपर)
  • रविंद्र जडेजा (उपकर्णधार)
  • वॉशिंग्टन सुंदर
  • जसप्रीत बुमराह
  • अक्षर पटेल
  • मोहम्मद सिराज
  • नितीश कुमार रेड्डी
  • प्रसिद्ध कृष्णा
  • एन. जगदीसन (विकेटकीपर)
  • कुलदीप यादव

वेस्ट इंडिजची संघरचना:

  • रोस्टन चेज (कर्णधार)
  • जोमेल वारिकन (उपकर्णधार)
  • केवलन अँडरसन
  • एलिक अथानजे
  • जॉन कॅम्पबेल
  • टेगेनारिन चंद्रपॉल
  • जस्टिन ग्रीव्हस
  • शाई होप
  • टेविन इमलाच
  • जेडिया ब्लेड्स
  • जोहान लेने
  • ब्रँडन किंग
  • अँडरसन फिलिप
  • खारी पियरे
  • जेडन सील्स

समाज माध्यम साईट “X” वरील प्रतिक्रियांसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

(ICC Women’s Cricket World Cup 2025) ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025: सविस्तर माहिती आणि Women’s World Cup Time Table

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत