India A vs Namibia, सराव सामना: रियान पराग–नमन धीरची दमदार फलंदाजी, नामिबियाची खराब सुरुवात

Vishal Patole

India A vs Namibia – ICC Men’s T20 World Cup Warm up Matches 2026 मधील 16व्या सराव सामन्यात India A संघाने नामिबियावर तब्बल 130 धावांनी दणदणीत विजय मिळवत आपली दमदार तयारी दाखवून दिली. बेंगळुरू येथील BCCI Centre of Excellence मैदानावर झालेल्या या सामन्यात India A ने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 197/8 अशी भक्कम धावसंख्या उभारली. रियान परागने 69 धावांची तडाखेबाज खेळी करत डावाला गती दिली, तर नमन धीर (39) आणि आशुतोष शर्मा (35) यांनीही महत्त्वाची साथ दिली. प्रत्युत्तरात 198 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. गुरजपनीत सिंगच्या भेदक गोलंदाजीने सुरुवातीलाच दोन बळी घेत दबाव निर्माण केला, तर मयांक यादवने वेगवान गोलंदाजी करत मधल्या फळीत धक्के दिले. नामिबियाला नियमित अंतराने बळी गमवावे लागले आणि ते मोठी भागीदारी उभी करू शकले नाहीत. परिणामी, India A ने हा सामना 130 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत विश्वचषकापूर्वी आत्मविश्वास वाढवणारी कामगिरी नोंदवली.

India A vs Namibia

India A vs Namibia – रियान परागची तडाखेबाज खेळी, नमन धीरची साथ

नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना India A ला सुरुवातीला धक्का बसला. प्रियांश आर्या (5) आणि उर्विल पटेल (14) लवकर बाद झाले. मात्र त्यानंतर नमन धीर (39 धावा, 29 चेंडू, 3 षटकार) आणि रियान पराग (69 धावा, 39 चेंडू, 6 षटकार, 5 चौकार) यांनी डाव सावरत गती दिली. परागने आक्रमक फलंदाजी करत नामिबियाच्या गोलंदाजांवर दबाव आणला. मधल्या फळीत आशुतोष शर्मा (35 धावा, 21 चेंडू) यांनीही फटकेबाजी करत स्कोअर 190 पार नेला. शेवटी अशोक शर्मा (9) आणि गुरजपनीत सिंग (नाबाद) यांनी डाव 20 षटकांत 197/8 पर्यंत नेला.

नामिबियाकडून रुबेन ट्रम्पेलमन (2 बळी), मॅक्स हेंगो (2 बळी) आणि कर्णधार एरास्मस (2 बळी, फक्त 2 धावा) यांनी चांगली गोलंदाजी केली.

India A vs Namibia नामिबियाची घसरगुंडी: गुरजपनीत–मयांकचा मारा

  • 198 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाची सुरुवात अत्यंत खराब झाली.
  • लॉरेन स्टीनकॅम्प आणि मालन क्रुगर दोघेही शून्यावर बाद
  • कर्णधार जेरहार्ड एरास्मस (0) यालाही मयांक यादवने बाद केले
  • गुरजपनीत सिंगने पहिल्याच षटकात दोन धक्के देत नामिबियाचा टॉप ऑर्डर उध्वस्त केला (2 षटके, 2 बळी, फक्त 6 धावा). मयांक यादवने वेगाने गोलंदाजी करत एरास्मसचा बळी घेतला.
  • सध्या जॅन फ्रायलिंक (12) आणि लोफ्टी-ईटन (9) क्रीजवर आहेत, पण आवश्यक धावगती 11 पेक्षा जास्त असल्याने दबाव वाढला आहे.
  • स्थळ: BCCI Centre of Excellence Ground 1, बेंगळुरू
  • स्पर्धा: ICC Men’s T20 World Cup Warm up Matches 2026
  • वेळ: सायं. 5:00 (स्थानिक वेळ)
  • सामन्याची स्थिती (Live)
  • India A: 197/8 (20 षटके)
  • Namibia: 25/3 (4.4 षटके)
  • CRR: 5.36 | RRR: 11.28

India A vs Namibia – नामिबिया — 67/10 (12.1 षटके)

फलंदाजी

फलंदाजबाद प्रकारधावा (R)चेंडू (B)चौकार (4s)षटकार (6s)स्ट्राईक रेट (SR)
लॉरेन स्टीनकॅम्पकॅच उर्विल पटेल, ब गुरजपनीत सिंग01000.00
जॅन फ्रायलिंककॅच मानव सुथार, ब मयांक यादव12131092.31
मालन क्रुगरकॅच उर्विल पटेल, ब गुरजपनीत सिंग02000.00
जेरहार्ड एरास्मस (क)ब मयांक यादव06000.00
जॅन निकोल लॉफ्टी-ईटनब अशोक शर्मा9801112.50
जे.जे. स्मिटकॅच उर्विल पटेल, ब अशोक शर्मा120050.00
झेन ग्रीन (यष्टीरक्षक)स्टंप उर्विल पटेल, ब विप्रज निगम260033.33
डिलन लीचरकॅच आणि ब विप्रज निगम222010110.00
रुबेन ट्रम्पेलमनकॅच गुरजपनीत सिंग, ब आयुष बडोनी130033.33
विलेम मायबर्गब रवी बिश्नोई690066.67
बर्नार्ड शॉल्ट्झनाबाद5500100.00
अतिरिक्त(लेगबाय 1, वाइड 6, नो-बॉल 2)9

एकूण: 67/10 (12.1 षटके, रनरेट 5.51)

फलंदाजीस न आलेले खेळाडू

Ben Shikongo, Max Heingo, Alexander Volschenk, Jack Brassell, Jan Balt


गोलंदाजी (India A)

गोलंदाजषटके (O)मेडन (M)धावा (R)बळी (W)नो बॉल (NB)वाइड (WD)इकॉनॉमी (ECO)
गुरजपनीत सिंग2162013.00
मयांक यादव1.40151029.00
अशोक शर्मा1040014.00

बाद क्रम (Fall of Wickets)

धावसंख्याषटकफलंदाज
0/10.1लॉरेन स्टीनकॅम्प
0/20.3मालन क्रुगर
2/31.5जेरहार्ड एरास्मस

पॉवरप्ले

कालावधीषटकेधावा
अनिवार्य0.1 – 625

India A vs Namibia – India A — 197/8 (20 षटके)

फलंदाजी

फलंदाजबाद प्रकारधावा (R)चेंडू (B)चौकार (4s)षटकार (6s)स्ट्राईक रेट (SR)
प्रियांश आर्याकॅच मालन क्रुगर, ब मॅक्स हेंगो5410125.00
उर्विल पटेलकॅच एरास्मस, ब बर्नार्ड शॉल्ट्झ14820175.00
नमन धीरकॅच स्मिट, ब एरास्मस392913134.48
रियान परागकॅच फ्रायलिंक, ब एरास्मस693956176.92
आयुष बडोनी (क)कॅच डिलन लीचर, ब विलेम मायबर्ग460066.67
आशुतोष शर्माकॅच एरास्मस, ब ट्रम्पेलमन352151166.67
विप्रज निगमकॅच मालन क्रुगर, ब मॅक्स हेंगो4210200.00
रवी बिश्नोईकॅच मालन क्रुगर, ब ट्रम्पेलमन5500100.00
अशोक शर्मानाबाद9401225.00
गुरजपनीत सिंगनाबाद02000.00
अतिरिक्त(ब 1, लेगबाय 3, वाइड 9)13

एकूण: 197/8 (20 षटके, रनरेट 9.85)


गोलंदाजी (Namibia)

गोलंदाजषटके (O)मेडन (M)धावा (R)बळी (W)नो बॉल (NB)वाइड (WD)इकॉनॉमी (ECO)
रुबेन ट्रम्पेलमन404420011.00
मॅक्स हेंगो303020610.00
बर्नार्ड शॉल्ट्झ404110210.20
जे.जे. स्मिट40330008.20
विलेम मायबर्ग202010010.00
लॉफ्टी-ईटन202300011.50
जेरहार्ड एरास्मस (क)1022012.00

 ठळक मुद्दे

 रियान परागची 69 धावांची स्फोटक खेळी नमन धीर आणि आशुतोष शर्मा यांचे महत्त्वाचे योगदान गुरजपनीत सिंगची भेदक सुरुवात

 India A vs Namibia नामिबियाचा टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी

India A vs Namibia या सराव सामन्यात India A ने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात वर्चस्व दाखवत टी-20 विश्वचषकासाठी आपली तयारी भक्कम असल्याचे संकेत दिले आहेत. नामिबियाला हा सामना वाचवण्यासाठी मोठी भागीदारी उभी करावी लागणार आहे.

समाज माध्यमावरील प्रतिक्रिया.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत