India China News : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (30 ऑगस्ट 2025) चीनच्या तियानजिन शहरात पोहोचले असून, ते 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, ही भेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर 50% टॅरिफ लावल्याच्या पार्श्वभूमीवर होत आहे, ज्याचा भारत-आमेरिका संबंधांवर मोठा परिणाम झालेला आहे. तियानजिन, चीन येथे होत असलेली SCO शिखर परिषद ही २५वी प्रमुख चर्चासत्र परिषद आहे. भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण आणि बेलारूस अशी एकूण १० सदस्य राष्ट्रे या संघटनेत आहेत. यावर्षी परिषदेत २० पेक्षा अधिक राष्ट्रप्रमुख आणि १० आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख सहभागी होणार आहेत, ज्यामुळे ह्या परिषदेला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. अमेरिकेच्या टॅरिफवारच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या परिषदेत सहभागी असलेले प्रमुख राष्ट्रे रशिया, चीन आणि भारत काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.

India China News : आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि भारताची भूमिका
पंतप्रधान मोदी यांचा हा ७ वर्षांनंतरचा पहिला चीन दौरा आहे. शिखर परिषदेत नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह विविध जागतिक नेत्यांशी भेटीगाठी करणार आहेत. भारत-चीन संबंध सुधारण्यावर तसेच द्विपक्षीय व्यापार विषयक चर्चा पार पडणार असून, जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन एकत्रितपणे काम करण्याकडे भर दिला जाणार आहे.
अमेरिकेच्या टॅरिफचा जागतिक संदर्भ
नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून होणाऱ्या आयातींवर ५०% टॅरिफ जाहीर केली आहे. या निर्णयातून भारताचा झुकाव चीन आणि रशियाकडे अधिक वाढतो आहे, असे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे मत आहे. चीन-भारत-रशिया त्रिकोणीय संवाद पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न, तांत्रिक क्षेत्रात एकत्र सहकार्य, आणि ‘ग्लोबल साऊथ’ म्हणून एकसंघ भूमिका घ्यावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त होत आहे.
SCOच्या भविष्यातील दिशा
या बैठकीमध्ये ‘तियानजिन घोषणापत्र’ आणि SCOचा २०३५ पर्यंतचा विकास आराखडा जाहीर होणार आहे. सुरक्षितता, आर्थिक संघटन, सांस्कृतिक आदानप्रदान आणि जागतिक प्रशासकीय सुधारणा यासारख्या क्षेत्रात सदस्य राष्ट्रांत सहकार्य वाढवण्याचा संकल्प घेण्यात येईल. अमेरिका केंद्रित जागतिक व्यवस्थेला पर्यायी बहुपक्षीय मंच म्हणून SCOला महत्त्व वाढत चालले आहे.
अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींचा चीन दौरा हा फक्त India China द्विपक्षीयच नव्हे, तर बहुपक्षीय कूटनीतीच्या दृष्टीने भारताच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय महत्त्व देणारा ठरणार आहे.
समाज मध्यमावरील MEA, अधिकृत प्रवक्ता रणधीर जैस्वाल यांची पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
