भारत-फिनलंड (India- Finland) संबंधांना नवे बळ : फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी भारताच्या जागतिक भूमिकेचे विशेष कौतुक करत भारताशी केले 11 महत्त्वपूर्ण करार !

Vishal Patole

India- Finland : सध्या फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष स्टब हे ४ ते ७ मार्च २०२६ या कालावधीसाठी भारताच्या राजकीय भेटीवर आलेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. दोन्ही (India- Finland) देशांमध्ये तंत्रज्ञान, व्यापार, ऊर्जा, पर्यावरण, डिजिटलायझेशन आणि स्टार्टअप क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष Alexander Stubb यांच्या India- Finland संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष स्टब यांनी भारताच्या जागतिक भूमिकेचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहींपैकी एक असून आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत प्रभावशाली देश आहे. युरोपसाठी भारत हा आज महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार बनला असून परराष्ट्र धोरण, सुरक्षा धोरण आणि व्यापार धोरणाच्या दृष्टीने भारताचे महत्त्व अतिशय मोठे आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक असल्याचेही त्यांनी नमूद केले आणि देशातील प्रगती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. राष्ट्राध्यक्ष स्टब यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचेही विशेष कौतुक करताना म्हटले की भारताने नेहमीच व्यवहार्य (pragmatic) आणि वास्तववादी दृष्टिकोनावर आधारित धोरण अवलंबले आहे. जागतिक राजकारणात सावधगिरी बाळगून स्वायत्तता जपणे किती महत्त्वाचे आहे हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. त्याचबरोबर बहुपक्षीयता (multilateralism) आणि जागतिक सहकार्याचा पुरस्कार करत भारताने संतुलित भूमिका निभावली आहे. त्यामुळेच भारताची भूमिका आज आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावी ठरत आहे. भारत आणि Finland यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना मोठे बळ देणारा महत्त्वाचा टप्पा फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष Alexander Stubb यांच्या भारत दौऱ्यादरम्यान गाठण्यात आला. या दौऱ्यात दोन्ही देशांनी एकूण ११ महत्त्वपूर्ण करार व सहकार्य उपक्रमांवर सहमती दर्शवली, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते Randhir Jaiswal यांनी दिली. या करारांमुळे भारत-फिनलंड संबंधांना “डिजिटलायझेशन आणि सस्टेनेबिलिटीतील स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप”चा दर्जा देण्यात आला आहे

India- Finland

India- Finland – भारत-फिनलंड संबंधांना ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष Alexander Stubb यांच्या भारत दौऱ्यादरम्यान झालेल्या बैठकीत दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधांना “Strategic Partnership in Digitalisation and Sustainability” या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला. या नव्या भागीदारीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, 6G तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्वच्छ ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि हरित तंत्रज्ञान अशा अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये संयुक्त सहकार्य वाढवले जाणार आहे.

 India- Finland – ११ महत्त्वपूर्ण करार आणि सहकार्य उपक्रम

राष्ट्राध्यक्ष स्टब यांच्या भेटीदरम्यान खालील प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्याची घोषणा करण्यात आली –

1. Migration and Mobility Partnership – भारतीय व्यावसायिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना फिनलंडमध्ये काम करण्यासाठी संधी उपलब्ध होणार.

2. पर्यावरण सहकार्य कराराचे नूतनीकरण – जैवऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, वेस्ट-टू-एनर्जी आणि नवीकरणीय ऊर्जेवर सहकार्य.

3. सांख्यिकी क्षेत्रातील सहकार्य करार – अधिकृत आकडेवारी आणि संशोधन पद्धतींची देवाणघेवाण.

4. भारत-फिनलंड संयुक्त संशोधन कार्यक्रम – विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संयुक्त संशोधन.

5. डिजिटलायझेशनसाठी संयुक्त कार्यगट (Joint Working Group) स्थापन करणे.

6. 6G तंत्रज्ञानासाठी संयुक्त टास्क फोर्स तयार करणे.

7. Indo-Finland Startup Corridor – दोन्ही देशांच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये थेट संपर्क.

8. Circular Economy सहकार्य – संसाधनांचा पुनर्वापर व पर्यावरणपूरक विकास.

9. Consular Dialogue – दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांदरम्यान नियमित संवाद.

10. World Circular Economy Forum 2026 संयुक्तपणे आयोजित करण्याचा निर्णय.

11. व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याचा रोडमॅप – 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट.

India- Finland – व्यापार, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात नवे सहकार्य

या करारांमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा, आर्क्टिक संशोधन, शिक्षण व नवोन्मेष या क्षेत्रात भारत आणि फिनलंड एकत्र काम करणार आहेत. तसेच जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी आणि नव्या तंत्रज्ञानाच्या सुरक्षित वापरासाठी सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला.

पंतप्रधान मोदींचे मत

बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, फिनलंड हा नॉर्डिक प्रदेशातील भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवीन ऊर्जा मिळाली आहे. डिजिटल तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्याची क्षमता आहे, ज्यात एआय, ६जी, क्वांटम कम्प्युटिंग, सॅमिकंडक्टर्स आणि संरक्षण क्षेत्रांचा समावेश होतो. फिनलंडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब यांच्यासोबत हैदराबाद हाउसमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीत अनेक करारांवर सही झाल्या, ज्यामुळे डिजिटायझेशन, शाश्वतता आणि हाय-टेक क्षेत्रातील सहकार्य वाढेल.

समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत