(India Lockdown) देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेवर केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी स्पष्ट शब्दांत पडदा टाकला आहे. “देशात कोणताही लॉकडाऊन लागू होणार नाही. काही राजकीय नेत्यांकडून पसरवल्या जाणाऱ्या या अफवा पूर्णपणे निराधार आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.अर्थमंत्री म्हणाल्या की, काही नेते लॉकडाऊन आणि इंधन तुटवड्याबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत, जे अत्यंत चिंताजनक आहे. “अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होते. जबाबदार पदांवर असलेल्या लोकांनी अशा अफवा पसरवणे योग्य नाही,” असे त्यांनी नमूद केले.

India Lockdown
कोविड-19 काळातील कठोर लॉकडाऊनची आठवण करून देत त्या म्हणाल्या की, “कोरोनाच्या काळात जसा लॉकडाऊन अनुभवला, तसा कोणताही लॉकडाऊन पुन्हा होणार नाही. परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे आणि सरकारकडे पुरेशा उपाययोजना उपलब्ध आहेत.” तसेच, इंधन तुटवड्याबाबतही त्यांनी स्पष्ट केले की देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाईघाईने साठेबाजी टाळावी, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारकडून वेळोवेळी परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून आवश्यक ते सर्व निर्णय योग्य वेळी घेतले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी शांत राहून अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.
समाज माध्याम्वरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
