१० वी पाससाठी पोस्टात २१४१३ जागांची मेगा भरती – India Post Recruitment

Vishal Patole
india post recruitment

India Post Recruitment – No.17-02/2025-GDS या नोटीफिकेशन अंतर्गत भारतीय डाक विभाने ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ग्रामीण डाक सेवक (GDS) म्हणजेच शाखा पोस्टमास्तर (BPM) /सहायक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक यांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. आजच्या लेखात आपण या जाहिरातीविषयी व GDS नोकरीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

GDS म्हणजे काय आणि त्यांच्या जबाबदाऱ्या – India Post Recruitment

उमेदवारांनी हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की ग्रामीण डाक सेवक (GDS) हे विभाग/केंद्र सरकारचे नियमित कर्मचारी नाहीत आणि त्यांचे वेतन, भत्ते आणि इतर हक्क केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे समान नसतात. त्यांची जबाबदारी खालीलप्रमाणे असते :

  • विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाखा डाकघर (B.O) आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) यांच्या दैनंदिन टपाल व्यवहारांचे संचालन करणे.
  • विभागाच्या विविध सेवा आणि उत्पादने यांचे विपणन आणि प्रसार करणे तसेच ग्राहक सेवा केंद्रे (CSC) मध्ये विविध सेवा पुरवणे.
  • एकहाती चालणाऱ्या शाखा डाकघरसाठी (BO), शाखा पोस्टमास्तर (BPM) यांना कार्यालयाच्या सुरळीत आणि वेळेवर कार्यान्वयनाची जबाबदारी असते, ज्यात टपाल वाहतूक आणि वितरण यांचा समावेश आहे.
  • एकहाती नसलेल्या शाखा डाकघरसाठी (BO), BPM यांना सहायक शाखा पोस्टमास्तर (ABPM) कडून सहाय्य मिळू शकते. मात्र, BPM यांना ABPM च्या अनुपस्थितीत किंवा आदेशानुसार त्यांचे एकत्रित कार्य पार पाडावे लागेल. तसेच, मेल ओव्हरसीअर (M.O)/इन्स्पेक्टर पोस्ट (IPO)/सहायक अधीक्षक पोस्ट (ASPOs)/पोस्ट ऑफिस अधीक्षक (SPOs)/वरिष्ठ अधीक्षक पोस्ट ऑफिस (SSPOs) इत्यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली कोणतीही अतिरिक्त जबाबदारी पार पाडावी लागेल.
india post recruitment

ग्रामीण डाक सेवक (GDS) साठी सेवा अटी:

(i) ड्युटी तास: सेवकाला एका दिवसात कमाल ५ तासांपेक्षा जास्त सेवा बजावण्याची आवश्यकता नाही.

(ii) सेवानिवृत्ती वयोमर्यादा: सेवकाला ६५ वर्षांपेक्षा जास्त वय झाल्यास सेवेत ठेवले जाणार नाही.

(iii) उत्पन्नाचा स्त्रोत: सेवकाने असे लेखी दिले पाहिजे की, त्याच्याकडे शासनाकडून मिळणाऱ्या भत्त्यांव्यतिरिक्त स्वतः आणि आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी इतर उत्पन्न स्रोत उपलब्ध आहेत.

(iv) स्थानांतरण: सेवकाला जनहित, प्रशासकीय किंवा दक्षता कारणास्तव एका पदावरून/युनिटवरून दुसऱ्या पदावर/युनिटवर बदली केली जाऊ शकते.

(v) नागरी सेवा श्रेणीबाहेर: सेवक केंद्र सरकारच्या नागरी सेवांमध्ये समाविष्ट नसतो.

(vi) निवास: सेवकाने निवडीनंतर पण रुजू होण्यापूर्वी एका महिन्याच्या आत संबंधित पोस्ट गाव/डाकघराच्या वितरण क्षेत्रात राहणे बंधनकारक आहे.

(vii) निवासाचे पालन न केल्यास परिणाम:

  • GDS BPM साठी, सेवकाने त्याच्या नियुक्तीच्या ठिकाणी राहणे अनिवार्य आहे.
  • इतर ग्रामीण डाक सेवकांनी संबंधित पोस्ट ऑफिसच्या वितरण क्षेत्रात राहणे बंधनकारक आहे.
  • नियुक्तीनंतर दिलेल्या निवासाच्या अटींचे पालन न केल्यास हे सेवा अटींचे उल्लंघन मानले जाईल आणि “वर्तन आणि नियुक्ती नियम” (Conduct & Engagement Rules) च्या नियम 10 अंतर्गत शिस्तभंग कारवाई केली जाऊ शकते, ज्यामध्ये सेवेतून काढून टाकणे किंवा बडतर्फ करणे (Removal/Dismissal) शक्य आहे.

(viii) पोस्ट ऑफिससाठी निवास व्यवस्था:
ग्रामीण डाक सेवक शाखा पोस्टमास्तर (GDS BPM) ने उपलब्ध करून दिलेली जागा पोस्ट ऑफिससाठी उपयुक्त आणि योग्य असावी. मात्र, जर केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन किंवा ग्रामपंचायत यांच्याद्वारे पोस्ट ऑफिससाठी जागा प्रदान केली जात असेल, तर तीच पोस्ट ऑफिसच्या कामकाजासाठी वापरण्यात येईल.

(ix) एकत्रित जबाबदाऱ्या:
सेवकाला एकापेक्षा जास्त जबाबदाऱ्या देणे शक्य आहे.

पेंशन/ग्रॅच्युइटी/सेव्हरेन्स रक्कम:

ग्रामीण डाक सेवकांना कोणत्याही प्रकारची पेंशन मिळणार नाही. तथापि शासनाने वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे , त्यांना GDS ग्रॅच्युइटी, सेव्हरेन्स रक्कम किंवा SDBS मिळतो.

ऑनलाईन अर्ज दिनांक – India Post Recruitment

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात १० फेब्रुवारी २०२५
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०३ मार्च २०२५
ऑनलाईन अर्ज दुरुस्ती दिनांक ०६ मार्च २०२५ ते ०८ मार्च २०२५

GDS पगार – India Post Recruitment

पदाचे नाव पगार
BPM – ब्रांच पोस्ट मास्टर १२,००० ते २९३८० रू.
ABPM/Dak Sevak
असि. ब्रांच पोस्ट मास्टर / डाक सेवक
१०,००० ते २४.४७० रु.

पात्रता – India Post Recruitment

वय मर्यादा

  • ६ मार्च २०२५ रोजी कमीत कमी १८ वर्षे
  • ६ मार्च २०२५ रोजी जास्तीत जास्त वय ४० वर्षे

वयातील सूट

प्रवर्ग सूट
एस. सी. / एस. टी.५ वर्षे
ओ.बी.सी.३ वर्षे
ई. डब्ल्यू. एस. लागू नाही
दिव्यांग (PWD)१० वर्षे
दिव्यांग (PWD) + ओ. बी. सी.१३ वर्षे
दिव्यांग (PWD) + एस. सी. / एस. टी.१५ वर्षे

शैक्षणिक पात्रता

  • दहावी पास

अन्य पात्रता

  • कमीत कमी ६० दिवसांचा संगणक कोर्स पूर्ण केलेला पाहिजे
  • सायकल चालविता आली पाहिजे
  • उपजीविकेचे इतर पुरेसे साधन आसने आवश्यक

परीक्षा फी – India Post Recruitment

प्रवर्ग फी
ओपन / ओ. बी.सी. १०० रु
एस. सी . / एस. टी. फी नाही
महिला / महिला ट्रान्सजेंडर फी नाही
दिव्यांग फी नाही

दिव्यांग आरक्षण

पदाचे नाव दिव्यांग प्रकार
BPM/ABPM/Dak
Sevaks
Low vision (LV)
ब्रांच पोस्ट मास्टर D(Deaf), HH (Hard of hearing);
असि. ब्रांच पोस्ट मास्टर / डाक सेवक एक हाथ (OA), एक पाय (OL), Leprosy Cured, Dwarfism, Acid Attack Victim
वरील सर्व पदांसाठी लागू Specific learning disability /Intellectual disability
बहुविध अपंगत्व, बहिरेपणा आणि अंधत्व वगळता वरील सर्व पात्र

महाराष्ट्रातील प्रवर्गनिहाय रिक्त जागा – India Post Recruitment

प्रवर्ग / भाषावार जागा महाराष्ट्र (कोंकणी )महाराष्ट्र (मराठी )
ओपन १३ ६८३
ओबीसी ३२३
एस. सी. १३७
एस. टी. १३१
ई. डब्ल्यू. एस. १४६
एकूण २४ १४२०
महाराष्ट्र ग्रांड टोटल१४४४

दिव्यांगासाठी महाराष्ट्रातील रिक्त जागा – India Post Recruitment

भाषावार जागा /
दिव्यांग प्रकार
महाराष्ट्र
(कोंकणी )
महाराष्ट्र
(मराठी )
Low vision (LV)१५
D(Deaf), HH
(Hard of hearing);
२०
One Arm (OA), One leg (OL), Leprosy Cured, Dwarfism,
Acid Attack Victim and
१७
Specific learning disability /Intellectual disability०१
एकूण ५३
महाराष्ट्रातील एकूण PWD जागा ५४

अर्ज कसा करावा- India Post Recruitment

ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील प्रक्रियेचे पालन करावे:

नोंदणी (Registration):

  • उमेदवाराने प्रथम अधिकृत वेबसाइट https://indiapostgdsonline.gov.in वर जाऊन स्वतःची नोंदणी करावी.
  • नोंदणीसाठी वैध मोबाईल क्रमांक आणि सक्रिय ईमेल आयडी आवश्यक आहे.
  • एक उमेदवार फक्त एकदाच नोंदणी करू शकतो. एकाहून अधिक नोंदणी केल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज भरावा (Online Application):

  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, उमेदवाराने आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा.
  • अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, आणि इतर आवश्यक तपशील अचूकपणे भरावेत.
  • अर्जासोबत ताजा पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे बंधनकारक आहे.

फी भरावी (Payment of Fees):

  • अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असल्यास अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावे.
  • काही प्रवर्गांसाठी फी सवलत किंवा माफी असू शकते, याची खात्री अधिकृत सूचनेतून करून घ्यावी.

अर्ज सादर करणे (Final Submission):

  • सर्व माहिती तपासून पाहिल्यानंतर अंतिम अर्ज सबमिट करावा.
  • एकदा अर्ज सादर झाल्यानंतर, त्यामध्ये बदल करता येणार नाही, त्यामुळे माहिती योग्य प्रकारे भरावी.

सुधारणा/दुरुस्ती विंडो (Edit/Correction Window):

  • अर्ज सादर झाल्यानंतर, विभागाने दिलेल्या तारखांमध्ये सुधारणा करण्याची संधी दिली जाईल.
  • सुधारणा विंडो उघडल्यावर, उमेदवार आपल्या अर्जातील चुकांचे सुधारणा करू शकतात.
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनंतर, त्यात सुधारणा/संपादन करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. ०६ मार्च २०२५ ते ०८ मार्च २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत, उमेदवार लागू शुल्क भरून यशस्वीरित्या सादर केलेल्या अर्जांमध्ये सुधारणा/संपादन करू शकतो.
  • सुधारित अर्ज सादर करण्यापूर्वी, अर्जदारांनी फॉर्मच्या प्रत्येक क्षेत्रात योग्य माहिती भरली आहे का ते तपासावे. ‘संपादन/दुरुस्ती’ विंडो संपल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत अर्जात कोणताही बदल/दुरुस्ती/सुधारणा करता येणार नाही. पोस्ट, फॅक्स, ईमेल, हस्तलिखित इत्यादी कोणत्याही स्वरूपात या संदर्भात कोणतीही विनंती विभागाकडून स्वीकारली जाणार नाही असे संबंधित जाहिरातीत स्पष्ट नमूद केले गेले आहे.

टीप:-
(१) अर्जदारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी ऑनलाइन अर्ज सादर करताना असा सल्ला दिला जातो कि, त्यांनी शेवटच्या तारखेच्या खूप आधी आणि शेवटच्या तारखेपर्यंत वाट न पाहता लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा कारण शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाइटवर जास्त भार असल्याने डिस्कनेक्शन/अक्षमता किंवा वेबसाइटवर लॉगिन करण्यात अयशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.

निवड प्रक्रिया – India Post Recruitment

  • मान्यताप्राप्त मंडळांच्या माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) किंवा
  • १०वीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • या गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवार निवडले जातात.

निवड सूचना – India Post Recruitment

१०वीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार झालेल्या गुणवत्ता यादी नुसार –

  • India Post Recruitment अर्जासाठी निवडलेल्या अर्जदारांची यादी विभागाकडून जीडीएस ऑनलाइन पोर्टलवर- https://indiapostgdsonline.gov.in प्रसिद्ध केली जाईल.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर तसेच नोंदणीकृत ईमेल पत्त्यांवर ईमेलद्वारे निकाल आणि कागदपत्रे पडताळणीच्या तारखा इत्यादींबद्दल माहिती दिली जाईल.
  • तथापि, तांत्रिक किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे नोंदणीकृत मोबाइल/ईमेल पत्त्यावर एसएमएस/ईमेल न मिळाल्यास, विभाग जबाबदार राहणार नाही आणि
  • या संदर्भात अन्य माध्यमातून कोणताही संवाद साधला जाणार नाही. म्हणून, अर्जदारांना नवीनतम अपडेट्ससाठी नियमितपणे वेबसाइट/पोर्टलला भेट देण्याचा सल्ला जी डी एस भरती विभागाकडून देण्यात आला आहे.

कागदपत्रांची भौतिक पडताळणी आणि पुढील सहभाग

निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाते, उमेदवारांना नियुक्त प्राधिकरणाच्या कार्यालयात, म्हणजेच विभाग/युनिटच्या विभागीय/युनिट प्रमुखाच्या कार्यालयात उपस्थित राहावे लागते

  • जिथे निवडलेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत
  • कागदपत्रांची भौतिक पडताळणी करून पुढील सहभाग सूचित केला जातो.
  • जे उमेदवार निर्धारित १५ दिवसांच्या कालावधीत नियुक्त अधिकाऱ्यांकडे हजर राहण्यास अयशस्वी ठरतील त्यांना सिस्टम/पोर्टलद्वारे ‘अनुपस्थित’ असे चिन्हांकित केले जाते. परिणामी, सिस्टम या उमेदवारांसाठी पुढील कागदपत्र पडताळणी प्रक्रिया आपोआप थांबवेल आणि अशारितीने त्यांची उमेदवारी स्वयंचलितपणे रद्द केली जाते.

पडताळणी साठी आवश्यक कागदपत्रे

कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहताना उमेदवाराला कागदपत्रे सादरीकरणासाठी खालील मूळ कागदपत्रे (लागू असल्यास) त्यांच्या दोन संचात स्व-साक्षांकित छायाप्रती सोबत बाळगणे आवश्यक असते.

  • गुणपत्रिका
  • ओळखीचा पुरावा
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बलता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • जन्मतारीख पुरावा
  • कोणत्याही सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र जसे कि, सरकारी दवाखाने/सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र इ.

अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :-

१० वी १२ वी पासवर तटरक्षकदलात नोकरी ! – ICG

१० वी पास वर ३०००० रु पगाराची नोकरीची संधी !” – 10th Pass Job

HDFC बँकेत रिलेशनशिप मॅनेजर (Assistant Manager/ Deputy Manager/ Manager/Senior Manager) पदांची भरती – HDFC Bank Recruitment 2025

भारतीय रेल्वेमध्ये ३२००० जागांची मेगा भरती- RRB Group D

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत