India Russia Defence Deal – भारत आणि रशियामधील संरक्षण सहकार्य आणखी बळकट करण्याच्या दिशेने मोठी घडामोड घडली आहे. मॉस्कोकडून भारताला आता अत्याधुनिक S-350 ‘वित्याज’ क्षेपणास्त्र प्रणाली उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आला आहे. ही प्रणाली सध्याच्या S-400 ‘ट्रायम्फ’ हवाई संरक्षण दलांबरोबर एकात्मिक स्वरूपात काम करणार असून, देशाच्या महत्त्वाच्या लष्करी आणि औद्योगिक मालमत्तांसाठी अधिक घट्ट हवाई कवच निर्माण करेल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या प्रस्तावाला वैयक्तिक मान्यता दिली असून, भारताने या करारात स्थानिकीकरण, उत्पादन, दुरुस्ती आणि दीर्घकालीन देखभाल (MRO) सुविधा देशातच उभ्या करण्यावर भर दिला आहे. या निर्णयामुळे भारताला केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ होणार नाही, तर ‘आत्मनिर्भर भारत’च्या संरक्षण क्षेत्रातील उद्दिष्टांना देखील गती मिळणार आहे.

India Russia Defence Deal
पाच S-400 स्क्वॉड्रन पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर S-350 प्रणाली त्याला पूरक ठरेल. तज्ज्ञांच्या मते, ही प्रणाली मध्यम ते लघु अंतरातील लक्ष्यांचा निपटारा करण्यास अधिक कार्यक्षम आहे. दोन्ही प्रणाली एकत्र आल्यास भारताचे हवाई संरक्षण एक बहिस्तरीय, नेटवर्क आधारित प्रणाली बनेल.
या घडामोडींचा भूराजकीय संदर्भही महत्त्वाचा आहे. अमेरिकेसोबतच्या संबंधांना धक्का न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियासोबतचे संबंध आणखी दृढ केले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी राजनैतिक स्तरावर मतभेद असतानाच, मोदींनी रशियाच्या माध्यमातून रणनीतिक स्वायत्ततेचा संदेश दिल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
भारताने या करारासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार प्राथमिक चर्चांना सुरुवात झाली आहे. या कराराच्या अंमलबजावणीनंतर भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.
समाज माध्यमावरील प्रतीक्रीयेन्साठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
