India Women Vs Ireland Women – भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना भारतीय महिला क्रिकेट संघाने ११६ धावांनी जिंकला आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडीयम, राजकोट येथे खेळला गेलेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी आपला सर्वोच्च खेळ दाखवत सर्वोच्च धावसंख्या ३७० /५ (५० ओव्हर) उभारली व नंतर आयर्लंड च्या संघाला २५४/ ७ (५० ओव्हर) या धावसंख्येवर रोखले व अशा रीतीने भारताने दुसरा सामना ११६ धावांनी जिंकला. या अगोदरच पहिल्या सामन्यात प्रभावी कामगिरी करत ६ गडी राखून विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. आणि आज दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका २-० च्या फरकाने भारतीय संघाने जिंकली आहे.
नाणेफेक – India Women Vs Ireland Women
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना अत्यंत चांगली सुरुवात केली आहे भारतीय कप्तान स्मृती मानधना च्या उत्कृष्ट खेळणे रोमांच वाढवला आहे.
स्कोरबोर्ड
आयर्संलंड संघाने एकूण (३३ ओव्हर) १५०/३, सारा फोर्ब्स – ३८ /६३ , जी. लेविस – १२ /१९ , ओरला पी. ३/१३ धावा करून बाद झाल्या आहेत तर कौल्तर रियली ७१/९५ आणि ल;लौरा देलेनी १२/१२ धावा करून खेळत आहे. आयर्लंड महिला संघाला जिंकण्यासाठी २२१ धावांची गरज परंतु त्यांच्या कडे केवळ ७ गडी आणि केवळ १७ ओव्हर शिल्लक आहेत.

सलामीवीरांची जबरदस्त भागीदारी
स्मृती मंधाना आणि प्रतीका रावल या जोडीने पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भक्कम भागीदारी केली. स्मृती मंधानाने आपल्या आक्रमक शैलीत खेळ करत केवळ ५४ चेंडूत ७३ धावांची दणक्यात खेळी साकारली. तिच्या या खेळीत १० चौकार आणि २ भव्य षटकारांचा समावेश होता. मात्र, ऑर्ला प्रेंडरगस्टच्या चेंडूवर स्मृतीला जोर्जीन डेम्पसीने झेलबाद केले.
दुसरीकडे, सलामीवीर प्रतीका रावलने संयमी खेळी करत आपला सुरेख फॉर्म दाखवला. ती जोर्जीन डेम्पसीने पायचीत बाद केली. तिच्या या खेळीने संघाला मजबूत स्थितीत आणले. तिने ६१ चेंडूत ८ चौकार आणि १ सिक्सर लगावत धडाकेबाज ६७ धावा पूर्ण केल्या.
मधल्या फळीतील खेळाडूंची जिगरबाज खेळी
स्मृती आणि प्रतीकाच्या बाद झाल्यानंतर हरलीन देओल आणि जेमिमाह रॉड्रिग्स क्रीजवर ठिय्या मांडला जेमीमाह ने आपला क्लास दाखवत दणादण १२ चौकार ठोकत आयर्लंड ची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली, तिने ९१ चेंडू खेळत १०२ धावा काढल्या तिला केली ने त्रिफळाचीत बाद केले. दुसरीकडून हर्लीन देओल चा सुरेख साथ जेमीमाह ला मिळाला हर्लीनने ८४ चेंडू खेळत ८९ धावा काढल्या ज्या मध्ये तिने १२ चौकार लगावले. दोघीही सावध खेळ करत धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना केलीच्या चेंडूवर लौराने झेल घेत देओलला बाद केले. शेवटी तेजलने २ चेंडूत २ धावा, तर सायली सातघरे हिने ३ चेंडूत २ धावा करून नाबाद राहिल्या व अशारितीने ५० ओव्हर मध्ये ३७० /५ धावांचा विशाल डोंगर आयर्लंडच्या संघासमोर उभा राहिला.
आयर्लंडचा संघ ढेपाळला
३७० धावांचा पाठलाग करताना आयर्लंडच्या महिला विशेष खेळ दाखवू शकल्या नाहीत ओपनर फलंदाज लेविस १९ चेंडू खेळून सायली सातघरे च्या चेंडूवर रिचा घोषच्या हाथी झेल देऊन बाद झाली. दुसरी ओपनर सारा फोर्ब्स ६३ चेंडू खेळून केवळ ३८ धावा करून दीप्ती शर्मा च्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद झाली. भारतीय संघाकडून गोलंदाज दीप्ती शर्माने १० ओव्हरमध्ये ३ बळी घेत केवळ ३७ धावा दिल्या. आयर्लंड च्या बाजूने मधल्या फळीतील फलंदाज कुल्तर रेली ने चांगली खेळी खेळत तिने ११३ चेंडूत १० चौकारासहित ८० धावा काढल्या तेव्हा तीतस साधूने तिला बोल्ड केले. तिच्या नंतर लौरा ने ३७ धावा, केलीने १९ धावा, कनिंग ने ११ धावा करत थोडाफार प्रयत्न केला मात्र शेवटी ५० ओव्हर मध्ये आयर्लंड केवळ २५४/७ धावाच करू शकला.
संघ रचना- India Women Vs Ireland Women
भारत महिला संघ:
स्मृती मंधाना (कर्णधार), प्रतीका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसाबणीस, दीप्ती शर्मा, सैमा ठाकोर, मिन्नू मनी, तितास साधू, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, उमा छेत्री, राघवी बिष्ट, सायली सातघरे.
आयर्लंड महिला संघ:
सारा फोर्ब्स, गॅबी लुईस (कर्णधार), ऑर्ला प्रेंडरगस्ट, लिया पॉल, लॉरा डेलनी, अवा कनिंग, क्रिस्टीना कुल्टर रीली (यष्टीरक्षक), आर्लीन केली, जोर्जीन डेम्पसी, फ्रेय सार्जेंट, अलाना डेलजेल.
सामन्याच्या पुढील घडामोडी पाहणे उत्सुकतेचे ठरेल, कारण भारत मोठा स्कोअर उभारण्याच्या तयारीत आहे.
पहिला सामना:India Women Vs Ireland Women
पहिल्या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीत वर्चस्व गाजवले. प्रतीका रावलच्या ८९ धावांच्या खेळीने आणि प्रिया मिश्रा व तितास साधूच्या अचूक गोलंदाजीने संघाला मोठा विजय मिळवून दिला. आयर्लंडच्या गॅबी लुईसने ९२ धावांची खेळी करत संघाला २३८ धावांपर्यंत पोहोचवले होते, पण भारतीय फलंदाजांनी सहजपणे हे लक्ष्य पार केले.
