Indian Post Result 2024 – भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी जाहिरात क्र. No.17-02/2025-GDS नुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा निकाल जाहीर केला आहे. GDS ऑनलाइन नियोजन वेळापत्रक-I, जानेवारी 2025 नुसार, पहिल्या निवड यादीचे प्रकाशन करण्यात आले आहे. या निवडक उमेदवारांना पुढील प्रक्रिया पार करण्यासाठी आवश्यक माहिती आणि सूचनांची मार्गदर्शन करण्यात आले आहे.

निकाल आणि निवडक उमेदवारांची यादी – Indian Post Result 2024
ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पहिली निवड यादी भारतीय डाक विभागाने जाहीर केली आहे. यादीतील उमेदवार पुढील शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि इतर आवश्यक प्रक्रिया पार करतील. ही यादी https://indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
निवड प्रक्रिया आणि पात्रता
जाहिरात क्र जाहिरात क्र. No.17-02/2025-GDS नुसार निघालेल्या पोस्ट भरती २०२५ मध्ये शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांसाठी अर्ज मागवले होते. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जांत नमूद दहावीच्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली गेली आहे. उमेदवारांना संबंधित पदासाठी दिलेल्या नोंदणी प्रक्रियेनुसार पुढील चरणांमध्ये सहभागी होणे आवश्यक असून ओरीजनल कागदपत्रांच्या आधारे कागदपत्रे पडताळणी झाल्यावरच निवड निश्चित होणार आहे त्यासाठी आवश्यक सूचना उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांक व इमेल द्वारे कळविले जाणार आहे.
निवडक उमेदवारांसाठी सूचना
Indian Post Result 2024 मधील निवडल्या गेलेल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित कार्यालयांमध्ये कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज करतांना दिलेल्या माहितीसाठी योग्य कागदपत्रांची प्रत सादर करणे आवश्यक आहे.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
