गोवा / कोच्ची | दि. २० ऑक्टोबर- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीपावलीच्या निमित्ताने भारताच्या सर्वात मोठ्या युद्धनौकेला — INS Vikrant — भेट देऊन भारतीय नौदलाच्या शौर्याला सलाम केला. या भेटीदरम्यान त्यांनी नौदलातील अधिकारी व जवानांसोबत दीपावली साजरी केली आणि त्यांच्यासोबत योगासत्रात सहभाग घेतला. मोदी यांनी आपल्या अधिकृत X (Twitter) अकाउंटवर लिहिले, “INS Vikrant भारतवर्ष का गौरव है! यह स्वदेशी टेक्नोलॉजी से बना हुआ भारत का सबसे बड़ा युद्धपोत है।” त्यांनी यावेळी कोची येथे झालेल्या INS विक्रांत च्या समावेश कार्यक्रमाची आठवणही करून दिली आणि आज पुन्हा या युद्धनौकेवर दीपावली साजरी करताना अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

INS Vikrant वर योग सत्र
प्रधानमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये विशेष उल्लेख करत म्हटले, “INS विक्रांत वर योग! आपल्या शूर नौसैनिकांना योगामध्ये सहभागी होताना पाहून प्रेरणा मिळते. योग आपल्या शरीर आणि मन दोन्हीला मजबूत करत राहो आणि आपल्याला एकतेच्या बंधनात बांधून ठेवो.”त्यांनी नौदलातील जवानांसोबत INS विक्रांत वर योगाभ्यास केला व आयुष्यभर तंदुरुस्त आणि मानसिक दृष्ट्या सक्षम राहण्याचा संदेश दिला.
INS Vikrant — स्वदेशी तंत्रज्ञानाचे प्रतीक
INS विक्रांत ही पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित भारताची सर्वात मोठी आणि अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौका आहे. कोची शिपयार्डमध्ये तयार केलेली ही नौका भारताच्या संरक्षण स्वायत्ततेचे प्रतीक मानली जाते.
ही भेट केवळ नौदलाच्या शौर्याचे दर्शन नव्हे तर देशाच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला दिलेला मूर्त प्रतिसाद ठरली आहे.
सैनिकांसोबत दीपावली साजरी करण्याची परंपरा कायम
मोदी यांनी या भेटीदरम्यान सांगितले की, “आप सभी की तरह मुझे भी अपने परिवारवालों के साथ दिवाली मनाना बहुत पसंद है। परंतु मेरा परिवार याही सैनिक भाइयों में है, जो देश की सुरक्षा में सदा तत्पर आहेत.”
ते दरवर्षी दीपावलीच्या निमित्ताने देशाच्या सीमांवर कार्यरत असलेल्या सैन्य व सुरक्षा दलांच्या जवानांसोबत सण साजरा करतात. या वर्षी त्यांना पश्चिम किनारपट्टीवरील गोवा आणि कारवार परिसरात INS विक्रांत वर नौसैनिकांसोबत सण साजरा करण्याचा योग आला.
हवाई शक्ती प्रदर्शनाचे दर्शन
यावेळी INS विक्रांत वर भारतीय नौदलाच्या हवाई दलाने विशेष हवाई शक्ती (Air Power Demo) चे प्रदर्शन केले. पंतप्रधानांनी या कार्यक्रमाचे निरीक्षण केले आणि आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या कार्यक्षमतेबद्दल कौतुक व्यक्त केले.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियांसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचे अडकलेले हेलीकॉप्टर, धक्का देऊन बाहेर काढावे लागले !
