टाटा समूहाने आज एक नवीन आणि महत्त्वपूर्ण अध्यायाची सुरुवात करत इतिहास रचला आहे. समूहातील वित्तीय सेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘टाटा कॅपिटल’(Tata Capital) ची भारतीय शेअर बाजारामध्ये अधिकृत नोंदणी (NSE) झाली असून, हा टाटा समूहाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ (IPO) ठरला आहे. तसेच, हा भारतातील सर्वात मोठा एनबीएफसी (गैर-बँकिंग वित्तीय कंपनी) आयपीओ आहे. टाटा समूहाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, “आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. बाजाराचा घंटानाद होताच एक नवीन प्रवास सुरू झाला आहे. ‘टाटा कॅपिटल’ची भारतीय स्टॉक एक्स्चेंजवरील (NSE) नोंदणी हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. टाटा समूहाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ असून एनबीएफसी क्षेत्रातही हा विक्रमी आयपीओ ठरला आहे. या ऐतिहासिक यशासाठी टाटा कॅपिटल टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.”

Tata Capital, IPO ची NSE मध्ये नोंद
(Tata Capital) टाटा कॅपिटलने आपल्या कार्यकाळात देशभरात वित्तीय सेवांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून, गृहकर्ज (Home Loan), व्यवसाय कर्ज (Business Laon), वैयक्तिक कर्ज (Personal Loan), वाहन कर्ज, गुंतवणूक सेवा व इतर अनेक वित्तीय उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली आहेत. मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीसाठी खुला झालेला हा आयपीओ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नोंदणीमुळे टाटा समूहाच्या वित्तीय व्यवसाया नवी उंची मिळेल आणि दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने हा टप्पा महत्वाचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Tata Capital काय आहे
टाटा कॅपिटल (Tata Capital) ही टाटा समूहातील अग्रगण्य वित्तीय सेवा कंपनी असून, ती गृहकर्ज, व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज तसेच गुंतवणूक सेवा अशा विविध उत्पादने ग्राहकांना प्रदान करते. भारतातील एनबीएफसी (NBFC) क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी म्हणून टाटा कॅपिटलने देशभरात विश्वासार्हता निर्माण केली आहे. ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शी धोरणांचा वापर करून ही कंपनी सतत प्रगती करत आहे. अलीकडेच टाटा कॅपिटलचा आयपीओ भारतीय शेअर बाजारात आला असून, तो एनबीएफसी क्षेत्रातील सर्वात मोठा आयपीओ (IPO) ठरला आहे.
IPO इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?
IPO, किंवा प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग, ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक खासगी कंपनी आपले शेअर्स किंवा भागीदारत्व सामान्य लोकांसाठी पहिल्यांदाच शेअर बाजारात विकायला आणते. या प्रक्रियेमुळे कंपनी खाजगी मालकीतून सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतरित होते. कंपनी IPO मार्फत भांडवल उभारते ज्याचा वापर तिच्या व्यवसायाचा विकास करण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी किंवा नवीन प्रकल्पासाठी केला जातो.
IPO सुरु करण्यासाठी कंपनीला नियामक संस्था SEBI कडून मंजूर मिळाली पाहिजे आणि कंपनीने प्रॉस्पेक्टस तयार करुन त्यात कंपनीची आर्थिक स्थिती, व्यवसायाचा आढावा आणि भविष्यातील योजना यांची माहिती देणे आवश्यक असते. या माहितीच्या आधारे गुंतवणूकदार शेअर्ससाठी बोली लावतात. एकदा IPO पूर्ण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होतात आणि त्यानंतर गुंतवणूकदार त्यात स्वतंत्रपणे व्यवहार करू शकतात.
साध्या भाषेत सांगायचे तर IPO म्हणजे कंपनीचा शेअर बाजारात पहिल्यांदा प्रवेश होणे आणि गुंतवणूकदारांना त्या कंपनीत हिस्सा खरेदी करण्याची शक्यता मिळणे. यामुळे कंपनीला उभ्या राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी आवश्यक आर्थिक साहाय्य मिळते तर गुंतवणूकदारांसाठी नफ्यात भागीदार होण्याची संधी निर्माण होते.
Tata Capital च्या अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
