गर्दी असलेल्या ठिकाणी पाणी पुरवठा आणि मंदिरातील प्रसाद विषबाधित करण्याचा कट रचित असलेल्या ISIS “आयएसआयएस” शी संबंधित तीन संशयितांना गुजरात एटीएस Gujrat Ats ने केली अटक !

Vishal Patole

(Gujrat Ats ) गुजरात एटीएस ने ISIS आयएसआयएस शी संबंधित तीन संशयितांना अडालाज, गांधीनगरजवळ अटक केली आहे. या आरोपींमध्ये हैदराबादचा डॉक्टर डॉ. अहमद मोहीउद्दीन सय्यद, आणि उत्तर प्रदेशच्या मोहम्मद सुहेल व आजाद सुलैमान सैफी यांचा समावेश आहे. या गटाने टेलीग्राम द्वारे आयएसआयएसच्या हॅंडलरच्या मार्गदर्शनाखाली कॅस्टर बियांपासून तयार होणाऱ्या रिसिन विषाचा वापर करून दिल्ली, लखनऊ आणि अहमदाबादमधील गर्दी असलेल्या ठिकाणी पाणी पुरवठा आणि मंदिरातील प्रसाद विषबाधित करण्याचा कट रचला होता. त्यांनी पाकिस्तानकडून शस्त्रे आणि गोळ्या आणण्याचा देखील सापळा रचला होता. गुजरात एटीएसने या संशयितांकडून दोन Glock पिस्तुले, एक Beretta पिस्तूल, गोळ्या आणि चार किलो कॅस्टर तेल जप्त केले असून, यांच्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता दूर झाली आहे.

ISIS, Gujrat Ats

Gujrat Ats ने अटक केलेल्या ISIS च्या तीन संशयितांपैकी एकजण आहे MBBS डॉक्टर !

Gujrat Ats ने धडक कारवाई करत अटक केलेल्या तीन संशयितांपैकी एकजण MBBS डॉक्टर आहे, डॉ. अहमद मोहीउद्दीन सय्यद असे त्याचे नाव असून त्याने चीनमध्ये MBBS पदवी घेतली आहे आणि विशेष म्हणजे त्याने रिसिन विष तयार करण्यासाठी संशोधन केले होते. या तिन्ही आरोपींनी लखनऊ, दिल्ली आणि अहमदाबाद येथे स्पर्धात्मक ठिकाणांची माहिती घेऊन या ठिकाणी सशस्त्र हल्ला करण्याचा कट रचला होता. आयएसआयएसखोरासन प्रांतशी (ISKP) संबंधित असलेला त्यांचा हॅंडलर अफगाणिस्तान मध्ये असल्याचेही बाहेर आले आहे.

ए टी एस गुजरातच्या योग्यवेळी केलेल्या कारवाईने भारतात होणाऱ्या मोठ्या हल्ल्यांपासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण झाले असून, यामध्ये आणखी कोणता आंतरराष्ट्रीय संबंध जोडलेला आहे की नाही याबाबत अजूनही तपास सुरू आहे.

Gujrat Ats यांच्या कारवाई बाबत DGP Gujarat यांनी दिली माहिती

DGP Gujarat यांच्या ट्विटनुसार, गुजरातची एंटी टेररिज्म स्क्वाड (ATS) ने एक मोठी दहशतवादी आघाडी उध्वस्त केली आहे. या कारवायीत तीन संशयितांना पकडले गेले असून त्यांच्याकडून शस्त्रे आणि लष्करी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. DGP Gujarat यांनी ATS च्या या यशस्वी कारवाईचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की ATS ने अत्यंत मेहनतीने गुप्त माहितीचे संकलन आणि सहजपणे कारवाई करण्याची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की Gujarat Police प्रत्येक दहशतवादी थ्रेटला तोंड देण्यासाठी सज्ज आहे आणि कोणत्याही दहशतवादाच्या योजनांना पूर्णपणे फोडून टाकले जाईल. या ट्विटमध्ये ATS च्या कामगिरीची प्रशंसा करताना दिलेल्या प्रतिसादातून गुजरात पोलिस दलाची ठाम भूमिका अधोरेखित होते.

संबंधित बातमीचे इंटरनेट वरील व्हिडीओ साठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:

आयर्नमॅन (Ironman 70.3) स्पर्धेचा थरार: जगभरातील १,३०० स्पर्धकांचा सहभाग,पंतप्रधान म्हणाले अशाप्रकारच्या स्पर्धा FitIndia आंदोलनाला मोठे प्रोत्साहन देतात !

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
2 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत