Israel News – इसरायल परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या निर्णयानंतर संयुक्त राष्ट्राच्या अनेक संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी सर्व संपर्क तात्काळ खंडित करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे इसरायल-यूएन संबंध आणखी तणावपूर्ण झाले असून, परराष्ट्रमंत्री गिदोन सा’अर यांनी संबंधित UN संस्था सतत इस्रायलविरोधी भूमिका घेत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने हा अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त निर्णय घेतला आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे की, संयुक्त राष्ट्रांच्या (UN) काही संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी इस्रायल तात्काळ सर्व संपर्क आणि सहकार्य समाप्त करणार आहे. यासंदर्भात इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी ट्विटर) वर अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे.

Israel News तपशील
संबंधित निर्णया अगोदर इसरायलने अमेरिकेच्या ६६ आंतरराष्ट्रीय संस्थांमधून माघार घेण्याच्या निर्णयाचा आढावा घेतला. त्यायानंतर त्या ६६ पैकी चार संस्थांशी इसरायलने पूर्वीच संपर्क तोडलेला असून, आता त्यामध्ये आणखी तीन संस्थांचा समावेश झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या एक्स पोस्टनुसार, खालील संस्थांशी तात्काळ संबंध तोडले आहेत.
इस्रायल सरकारच्या मते, संबंधित UN संस्था सतत इस्रायलविरोधी भूमिका घेत असून निष्पक्षता आणि व्यावसायिकतेचे उल्लंघन करत आहेत. काही संस्थांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या संरक्षण दलाला (IDF) दहशतवादी संघटनांप्रमाणे वागणूक दिल्याचा गंभीर आरोप इस्रायलने केला आहे.
Israel News : परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, “लोकशाही मूल्ये पाळणाऱ्या इस्रायलला ISIS आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांच्या पंक्तीत बसवणे हे लाजिरवाणे आणि अस्वीकार्य आहे.”
- यूएन अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशन्स: तुर्की आणि स्पेनने स्थापन केलेली ही संस्था इसरायलला सहभागी न करता त्याच्याविरोधात हल्ले घडवते. त्यामुळे इसरायलने या संस्थेशी आपले संबंध तोडले आहेत.
- यूएन एनर्जी: यूएनची अकार्यक्षम नोकरशाहीचे प्रतीक असल्याचे सांगत इसरायलने या देखील संस्थेशी आपले संबंध संपुष्टात आणले आहेत.
- ग्लोबल फोरम ॲन मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट: देशांच्या स्थलांतर धोरणांना कमकुवत करते असा आरोप करत इसरायलने या संस्थेशी आपले संबंध तोडले आहेत.
यापूर्वी खंडित केलेल्या संस्था:
- बाल हक्कांसाठी विशेष प्रतिनिधी कार्यालय (२०२४ मध्ये आयडीएफला ब्लॅकलिस्ट केले).
- यूनवुमेन (७ ऑक्टोबर २०२३ च्या बलात्कारप्रकरणांकडे दुर्लक्ष).
- युनक्टाड आणि इस्कवा (इसरायलविरोधी अहवाल).
पुढील पावले
परराष्ट्रमंत्री सा’अर यांनी इतर संस्थांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले असून, लवकरच आणखी निर्णय घेतले जातील. इसरायल यूएन प्रणितीत सामान्य सहभाग कायम ठेवेल, पण पूर्वग्रहपूर्ण संस्थांविरुद्ध कठोर भूमिका घेईल.
Israel News – आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
या निर्णयाने मध्य पूर्व तणाव वाढण्याची शक्यता; पॅलेस्टिनी संस्थांवर परिणाम होईल अशी भीती. यूएन अधिकाऱ्यांनी मदत कार्य रोखण्याचा इशारा दिला.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
