ISRO कडून विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी !- विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी NSSS 2026 मध्ये ‘समानांतर सत्र-६’

Vishal Patole
ISRO

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) तर्फे देशभरातील पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) विद्यार्थ्यांसाठी एक खास संधी जाहीर करण्यात आली आहे. २३ वा राष्ट्रीय अवकाश विज्ञान परिसंवाद (NSSS) – २०२६ दरम्यान, शिलाँग (मेघालय) येथील NESAC (नॉर्थ ईस्टर्न स्पेस अप्लिकेशन्स सेंटर) मध्ये २३ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ‘समानांतर सत्र-६ (PS-6): अवकाश विज्ञान व तंत्रज्ञानातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला बळ’ आयोजित होणार आहे. ज्याचा उद्देश : पुढच्या पिढीतील वैज्ञानिक घडवणे आहे. ISRO च्या माहितीनुसार, या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनात सक्रीय सहभागी करून घेणे, तसेच भारतीय अवकाश मोहिमांमधून उपलब्ध होणाऱ्या डेटाचा वैज्ञानिक उपयोग विद्यार्थ्यांनी करावा यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.

ISRO

ISRO चे (NSSS) – २०२६

ISRO चे (NSSS) – २०२६ सत्राच्या प्रमुख वैशिष्ट्ये :

  • START (Space Science & Technology Awareness Training) 2024 व 2025 मधील गुणवंत विद्यार्थ्यांना संशोधन सादरीकरणाची संधी.
  • ईशान्य भारतातील नामांकित संस्थांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग.
  • देशभरातून निवडलेले विद्यार्थी – ऑनलाइन परिक्षा व संशोधन-सारांश (Abstract) यावर आधारित पारदर्शक निवड प्रक्रिया.
  • वरिष्ठ व ख्यातनाम अंतराळ वैज्ञानिकांची व्याख्याने आणि थेट संवाद.

अभ्यासासाठी क्षेत्रे :
विद्यार्थी मानवी अवकाश मोहिमा, स्पेस स्टेशन, पुढील पिढीच्या अवकाश मोहिमा (चंद्र, मंगळ व त्यापुढे), पृथ्वी निरीक्षण, नॅनो उपग्रह तंत्रज्ञान आणि बहुविषयक संशोधन या विषयांवर आपले विस्तृत संशोधन सादर करू शकतील.

अर्हता व नोंदणी :
भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठे/महाविद्यालयांमध्ये शिकणारे पदवी अंतिम वर्ष व पदव्युत्तर विद्यार्थी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, संगणकशास्त्र, अभियांत्रिकी व संबंधित शाखा) नोंदणीस पात्र आहेत.

  • नोंदणी शेवटची तारीख : १५ सप्टेंबर २०२५
  • निवड झाल्यानंतर शुल्क: ₹३,०००/-
  • मर्यादित विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध असेल.

निवड प्रक्रिया :

विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया : निवड ISRO – ‘जिज्ञासा पोर्टल’ द्वारे होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रथम ऑनलाइन नोंदणी करून शैक्षणिक व वैयक्तिक तपशील सादर करावे लागतील. प्रणालीद्वारे निर्माण झालेला नामांकन फॉर्म (कॉलेज ) संस्थेच्या प्रमुखांकडून (अप्रुव्हल घेऊन) मान्य करून अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्विझ द्यावी लागेल.

निवड प्रक्रियेत शैक्षणिक गुणवत्ता, क्विझमधील कामगिरी आणि संशोधनाचा विस्तृत सारांश या आधारांवर गुणांकन केले जाईल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून किमान १ विद्यार्थी निवडला जाणार असून एकूण ४० PAN India विद्यार्थी अंतिमतः निवडले जातील. याशिवाय, ईशान्य राज्यांतून ३० विद्यार्थी आणि प्रत्येकी एक अध्यापक यांची विशेष नामनिर्देशित निवड करण्यात येईल.

ISRO च्या या उपक्रमामुळे NSSS 2026 हे विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक व्यासपीठ न ठरता, तर भारतीय अवकाश संशोधनात पुढील पिढीला घडवणारे महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

इस्रो ची समाज माध्यमावरील पोस्टसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठी झेप : Made in India बॅटरी इलेक्ट्रिक वाहन (BEV) ई-व्हिटारा (e-VITARA) चे जागतिक स्तरावर निर्यात करण्यास सुरुवात

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया
  • पिंगबॅक WFP

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत