शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑगस्ट 2025 करिता प्रवेशाबाबत सूचना- ITI Admission 2025

Vishal Patole
ITI Admission 2025

ITI Admission 2025- राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये “शिल्पकार प्रशिक्षण योजना” अंतर्गत ऑगस्ट 2025 साठी प्रवेश केंद्रीकृत ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती जसे कि प्रवेश प्रक्रिया, नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती याबद्दल आपण आजच्या लेखात माहिती पाहणार आहोत.

ITI Admission 2025

ITI Admission 2025

महत्वाच्या दिनांक

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची सुरुवात १५ मे २०२५
प्रथम फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक २६ मे २०२५

पात्रता

वय – कमीत कमी १४ वर्षे

शिक्षण – कमीत कमी १० वी पास किंवा काही ट्रेडसाठी १० वी नापास

फी प्रवेश अर्ज शुल्क:

NRIs: ₹500

मागासवर्गीय / राखीव प्रवर्ग: ₹100

अनारक्षित प्रवर्ग: ₹150

महाराष्ट्राबाहेरील उमेदवार: ₹300

ITI Admission 2025 साठी ऑनलाईन अर्ज

आय टी आय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.

उमेदवारांसाठी मार्गदर्शन सुविधा:

प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी प्रत्येक शासकीय व खासगी ITI मध्ये 15 मे 2025 पासून सकाळी 10 ते 11 या वेळेत मोफत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. असे विभागाने जाहिरातीत नमूद केले आहे.

प्रवेशप्रक्रिया व संकेतस्थळासंबंधी तांत्रिक अथवा इतर शंका असल्यास नजीकच्या ITI संस्थेशी संपर्क साधावा किंवा संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षाशी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा.


प्रवेश अर्ज प्रक्रिया:

सर्व ITI संस्थांचा सहभाग – राज्यातील सर्व शासकीय व खासगी ITI या प्रवेश प्रक्रियेत सहभागी आहेत.

माहितीपुस्तक वाचणे अनिवार्य – उमेदवारांनी व पालकांनी प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी माहितीपुस्तकातील नियम, अटी व प्रक्रिया नीट वाचावी.

ऑनलाईन अर्ज उपलब्धता – कोणत्याही माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरता येतो. ITI संस्थांमध्ये देखील अर्ज व पर्याय भरण्याची सुविधा आहे.

मोबाईल नंबर अनिवार्य – प्रत्येक उमेदवाराने अर्जात एकच प्राथमिक मोबाईल नंबर नमूद करणे आवश्यक आहे. याच नंबरवर OTP व इतर माहिती दिली जाईल.

अर्ज भरण्यानंतर User ID मिळणार – नोंदणीनंतर उमेदवाराला Registration Number हा User ID म्हणून वापरता येईल.

Application Form पूर्णपणे भरावा – अर्ज भरण्यानंतर सगळी माहिती तपासून ऑनलाईन पेमेंटद्वारे शुल्क भरावे.

शुल्क भरल्यानंतर अर्जात बदल शक्य – अंतिम सबमिट करण्यापूर्वी अर्जात बदल करता येतील.

ITI Admission 2025 प्रवेशाबाबत महत्वाचे मुद्दे

  1. प्रिंट घेणे आवश्यक – शुल्क भरल्यानंतर अर्जाची प्रिंट घेणे आवश्यक आहे.
  2. अर्जाची खातरजमा (Confirmation):
    • आवश्यक मूळ कागदपत्रे, त्याच्या छायांकित प्रती व अर्जाची प्रिंट जवळच्या ITI मध्ये सादर करावी.
    • संस्थेतील अधिकारी मूळ कागदपत्रांच्या आधारे तपासणी करतील व अर्जाची खातरजमा करतील.
    • खातरजमा झाल्यावर उमेदवारास Application Confirmation Slip व अर्जाची खातरजमा प्रत दिली जाईल.
    • कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये; घेतल्यास मदत केंद्राशी संपर्क साधावा.फक्त खातरजमा झालेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
  3. खातरजमा झाल्यानंतर अर्जात कोणतेही बदल करता येणार नाहीत, परंतु काही निवडक बदल “हरकती फेरी” मध्ये करता येतील.
  4. प्रथम फेरीसाठी पर्याय भरणे – नोंदणी क्रमांक व पासवर्डच्या सहाय्याने संकेतस्थळावर लॉगिन करून आपले पर्याय व प्राधान्य सादर करावेत.
  5. Option Form ची प्रिंट घ्या.

ITI Admission 2025 अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ITI Admission 2025 बाबत महत्त्वाचे:

  • फक्त एकच अर्ज भरावा – एकापेक्षा अधिक अर्ज आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील व प्रवेश नाकारला जाईल.
  • इतर राज्य व NRI उमेदवार – 15 मे 2025 पासूनच अर्ज व पर्याय सादर करणे आवश्यक आहे.

आय.टी. आय. प्रवेशाबाबत संपूर्ण माहिती देणारी माहिती पुस्तिकेसाठी येथे क्लिक करा.

आय.टी. आय. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांच्या यादीसाठी येथे क्लिक करा.

व्यावसायिक ट्रेड आणि त्याकरिता लागणारी पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आय. टी. आय. प्रवेशाबाबत मागील तीन वर्षाचा ट्रेडनुसार कट ऑफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

भारतीय नागरिकांसाठी टेरिटोरिअल आर्मी अधिकारी पदांसाठी सुवर्णसंधी – Indian Army Job

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
2 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत