Jammu Kashmir च्या सोपोरमध्ये दोन दहशतवादी अटक; पिस्तुल आणि हँड ग्रेनेड जप्त !

Vishal Patole

सोपोर (Jammu Kashmir) – दिल्लीच्या रेड फोर्ट जवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर देशभरात व विशेषत: जम्मू काश्मीर मध्ये शोधमोहीम व अटकसत्र सुरु असून गुरुवारी संध्याकाळी सोपोरच्या मोमिनाबाद परिसरातील सय्यद कॉलनी येथे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सेना (22 आरआर) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (179 बटालियन सीआरपीएफ) यांच्या संयुक्त कारवाईत दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. अटक झालेल्यांमध्ये शबीर अहमद नजार आणि शबीर अहमद मीर यांचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान सुरक्षा यंत्रणांना दोघांकडून एक पिस्तुल, एक मॅगझिन, २० जिवंत काडतुसे आणि दोन हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे हा नाका मोमिनाबाद भागात उभारण्यात आला होता. फळ मंडी सोपोर परिसरातून अघात बाबा मार्गाने येणारे हे दोघे संशयित व्यक्ती पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करत होते. परंतु संयुक्त पथकाने वेळीच कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे मोहल्ला तौहीद कॉलनी माजबुघ येथील रहिवासी शबीर अहमद नजार (पुत्र मोहम्मद अकबर नजार) आणि ब्रथ सोपोर येथील शबीर अहमद मीर (पुत्र मोहम्मद सुलतान मीर) अशी त्यांची ओळख पटली आहे. या प्रकरणात पोलिस ठाणे सोपोर येथे युएपीए आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार एफआयआर क्रमांक 253/2025 नोंदविण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात दोघांचे उत्तर काश्मीरमधील दहशतवादी नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Jammu Kashmir

Jammu Kashmir

१० नोव्हेंबर २०२५ च्या सायंकाळी दिल्लीच्या रेड फोर्ट जवळ झालेल्या कार बोंब स्फोट झाला होता हा आत्मघाती हल्ला होता ज्यामध्ये १३ जण मृत आणि वीसाहून अधिक जखमी झाले आहेत. राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) या प्रकरणाची चौकशी करत असून, या प्रकरणाच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या (Jammu Kashmir) मधून मिळालेल्या इंटेल इनपुटच्या आधारे शबीर अहमद नजार आणि शबीर अहमद मीर या दोन आतंकवाद्यांची अटक झाली आहे. (NIA) च्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार दिल्ली आत्मघाती कार स्फोटासाठी वापरलेले घटक अमोनियम नायट्रेट होते. स्फोटाचे सूत्रदेखील पाकिस्तान-आधारित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदशी जोडले गेले आहे. या प्रकरणातील आरोपी डॉक्टर उमर मोहम्मद आहेत, ज्यांचा अल-फलाह विद्यापीठाशी संबंध आहे, तसेच अन्य काही आरोपींचीही अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान हा स्फोट एक दहशतवादी कारवाई असल्याचे स्पष्ट झाले आणि केंद्र सरकारने याला ‘दहशतवादी हल्ला’ म्हणून घोषित केले. तपासात हे दिसून आले की, या स्फोटाचा हेतू दिल्लीमध्ये अनेक स्थळी एकत्रित दहशतवादी हल्ले करणे हा होता, पण सुरक्षितता यंत्रणांच्या वेळीच्या कारवाईंमुळे मोठ्या हल्ल्यापासून बचाव झाला आहे.

ही दहशतवादी कारवाई आणि (Jammu Kashmir) सोपोरमधील अटकमध्ये जप्त केलेले हत्यारं यांच्या दरम्यान दहशतवादी नेटवर्कचे गहरे संबंध असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. म्हणूनच, सोपोरमध्ये शबीर अहमद नजरा आणि शबीर अहमद मीर यांची अटक याप्रकरणातून फक्त स्थानिकच नव्हे तर देशव्यापी दहशतवाद विरोधी कारवाईचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. सुरक्षा यंत्रणा या दोन्ही प्रकरणांमधील पुरावे, संदर्भ आणि साक्षांचे सखोल तपास करत आहेत, ज्याचा उद्देश दहशतवादाविरूद्धच्या मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी होईल.

(Jammu Kashmir) जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही काळात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. विशेषतः उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, सोपोर आणि हँडवारा परिसरांमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. सीमाभागातून घुसखोरी करणे, स्थानिक तरुणांना दहशतवादी नेटवर्कमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न, आणि हत्यारांची वाहतूक अशा प्रकारच्या गोष्टी वाढत चालल्या आहेत.

सोपोर क्षेत्र दीर्घकाळापासूनच दहशतवादी हालचालींसाठी संवेदनशील मानला गेलेला आहे. येथे अनेक वेळा लपून-छपून दहशतवादी तळ तयार होतात, आणि स्थानिकांशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने हत्यारे, दारूगोळा व इतर सामुग्रीची खरेदी व वाहतूक केली जाते. याच पार्श्वभूमीवर पोलिस, सैन्य व सीआरपीएफ यांनी जागरूकता वाढवली असून, मिळालेल्या माहितीवरून अचानक नाके बंदोबस्त व शोधमोहीम राबवल्या जात आहेत.

शबीर अहमद नजार आणि शबीर अहमद मीर यांच्या हालचालींबाबत सुरक्षा यंत्रणांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर हे कारवाईचे नियोजन करण्यात आले. ते दोघे दहशतवादी नेटवर्कच्या संपर्कात असल्याचा शंका आधीपासूनच व्यक्त केली जात होती. पोलिस व अन्य सुरक्षा दले मिळून परिस्थिती जनतेच्या हितासाठी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

या घटनेमुळे स्थानिक पातळीवर पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांचे महत्व वाढले आहे. उत्तर काश्मीरमध्ये शांती राखण्यासाठी आणि युवकांना दहशतवादी प्रवृत्तींपासून वाचवण्यासाठी असे कठोर उपाय यंत्रणेमार्फत पुढेही राबवले जाणार आहे.

जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) पोलिसांनी या कारवाईनंतर एक निवेदन जारी करून दहशतवादाविरुद्धची मोहिम सुरू ठेवण्याचा आणि राज्यात शांतता व सुरक्षितता टिकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज.

Delhi Blast Updates- दिल्ली स्फोट प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. उमर नबीशी निगडीत असलेली स्फोटकांनी भरलेली लाल रंगाची इकोस्पोर्ट कार सापडली !

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत