(Jammu Kashmir News) कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : ७ नोव्हेंबर २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी ‘ऑप पिंपल (Operation Pimple) ही मोहिम राबवून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. गुप्त माहितीच्या आधारे सुरू करण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईदरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. चिनार कॉर्प्सच्या माहितीनुसार, केरन भागात संशयास्पद हालचाल दिसताच जवानांनी कारवाई सुरू केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सैन्याने प्रभावी प्रत्युत्तर देत दोघा दहशतवाद्यांना ठार केले. ही चकमक उशिरा रात्रीपासून ८ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत चालली. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू असून उरलेले दहशतवादी लपले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.Jammu Kashmir News

Jammu Kashmir News : पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेलगत दहशतवादी हालचालींना वेग दिला आहे
Jammu Kashmir News – गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वासार्ह माहितीनुसार, पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेलगत दहशतवादी हालचालींना वेग दिला आहे. नीलम, लीपा, चकोटी, बगसर, देवा, भिंबर, बट्टल आणि गोई या भागांमध्ये पूर्वी भारतीय सेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नष्ट केलेले १५ दहशतवादी लाँच पॅड्स आता पुन्हा सक्रिय करण्यात आले आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरीसाठी तयार असल्याचे गुप्तचर विभागाच्या अहवालांवरून स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान या नव्या हालचालीतून पुन्हा एकदा सीमावर्ती परिसरात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय सैन्याने तत्काळ या धोक्याची नोंद घेत उच्चतम सतर्कतेचा इशारा दिला असून सीमावर्ती भागांत गस्त आणि शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
दरम्यान, नीलम व्हॅलीतील अथमुकाम सेक्टरमधून पाकिस्तान सैन्याने काही दहशतवाद्यांना भारतीय नियंत्रण रेषा ओलांडण्यासाठी प्रवृत्त केले. भारतीय जवानांनी ही संशयास्पद हालचाल ओळखताच तत्परतेने प्रतिसाद देत त्यांना आव्हान दिले, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये अल्पकाळ चकमक झाली. केरन सेक्टरमध्ये ३ ते ४ पाकिस्तानी दहशतवादी सध्या भारतीय दलांच्या घेरावात अडकले असून तेथील परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. भारतीय सैनिकांनी घुसखोरीचे सर्व मार्ग बंद केले असून या चकमकीचा शेवट दहशतवाद्यांच्या पूर्ण निर्मूलनाने होणार, असा विश्वास वर्तवला जात आहे. सीमा भागातील भारतीय जवानांनी पुन्हा एकदा आपल्या सजगतेची आणि शौर्याची प्रचिती दिली असून पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या कारस्थानाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सेना सदैव सक्षम आणि तयार आहे.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
