पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा (Japan Tour) : भारत-जपान (India Japan) संबंधांना नवीन उर्जा- जपान भारतात ६७ अब्ज डॉलर गुंतवणार, तर खाजगी कंपन्यांनी केले भारताशी १३ अब्ज डॉलरचे १५० करार.

Vishal Patole
India Japan, Japan Tour

India Japan Relations – टोकियोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या (Japan Tour) जपान दौर्‍यादरम्यान मोठ्या गुंतवणुकीचा दिशादर्शक निर्णय करण्यात आला आहे. परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जपानकडून भारतात खासगी गुंतवणुकीसाठी नवे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून त्यानुसार जपान भारतात १० ट्रिलियन जपानी येन, म्हणजे सुमारे ६७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. याव्यतिरिक्त काल झालेल्या व्यवसाय मंचावर खासगी क्षेत्राने सुमारे १५० समझोते करार (MoUs) जाहीर केले आहेत, ज्यांची एकत्रित किंमत १३ अब्ज डॉलरहून अधिक आहे. हे करार आणि व्यावसायिक भागीदारी (India Japan ) भारतीय-जपानी संबंधांवरील व्यवसाय क्षेत्राच्या विश्वासाचे द्योतक आहेत. या नव्या गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नवीन चालना मिळेल आणि आर्थिक क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदींच्या जपान दौर्‍यामुळे भारताच्या जागतिक आर्थिक नकाशावर स्थान अधिक बळकट होणार आहे. ट्रम्प

Japan Tour, India Japan

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्यामुळे (Japan Tour) भारत-जपान (India Japan) संबंधांना मोठी उर्जा मिळाली असून अनेक क्षेत्रांत दोन्ही देशांनी सहकार्याची नवीन वाट मांडली आहे. जो निर्णायक अध्याय ठरणार आहे. टोकियोमध्ये आज संध्याकाळी १५वी भारत-जपान वार्षिक शिखर बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानी पंतप्रधान इशीबा यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंवर सखोल चर्चा केली आणि भारत-जपानच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला आणखी मजबूत करण्याचा मनोनीत झाला. या बैठकीत आर्थिक, संरक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यासाठी नवीन संधींवर देखील सहमती झाली टोकियोमध्ये सुरू झालेल्या या दौऱ्यादरम्यान मोदींनी जपानी पंतप्रधान शिगेरु ईशीबा, माजी पंतप्रधान तसेच अनेक आघाडीच्या जपानी नेत्यांशी चर्चा करून आर्थिक, संरक्षण, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी भारत-जपान भागीदारीसाठी पुढील १० वर्षांचा रोडमॅप तयार केला असून त्यात गुंतवणूक, नवाचार, लोकांमधील देवाणघेवाण यावर विशेष भर देण्यात आला आहे. मोदींच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील मैत्री नक्कीच बळकट होणार आहे आणि जागतिक स्तरावर स्थिरता, शांती व समृद्धीसाठी भारत-जपानची भूमिका अधिक प्रभावी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा (Japan Tour) आणि (India Japan) संबंध

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याच्या निमित्ताने भारत-जपान संबंधांना मोठी उर्जा मिळाली असून अनेक क्षेत्रांत दोन्ही देशांनी सहकार्याची नवीन वाट मांडली आहे. मोदींच्या या दौऱ्यात जपानमधील भारतीय समुदायाने मोदींचे उत्साहाने स्वागत केले. जपानी महिला कलाकारांनी “पधारो म्हारो देश” आणि “आमची अशी आशा आहे की भारत आणि जपान (India Japan) यांच्यात अतिशय गाढ मैत्री व सहकार्य प्रस्थापित होवो.” या आशयाचे हिंदी भाषेत संभाषण करत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पुढील टप्प्यात टोकियोमध्ये आयोजित झालेल्या इंडिया-जपान इकोनॉमिक फोरममध्ये मोदींनी व्यासपीठावर भाषण देत दोन्ही राष्ट्रांची व्यावसायिक नाती आणि मैत्री यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, भारताच्या विकास प्रवासात जपान नेहमी एक महत्वाचा भागीदार ठरला आहे. मेट्रो, मॅन्युफॅक्चरिंग, सेमीकंडक्टर्स आणि स्टार्टअप्ससह विविध क्षेत्रांत भागीदारी नेहमीच विश्वासाचे प्रतीक राहिली आहे.

पुढे मोदी म्हणाले, “आज भारतात राजकीय आणि आर्थिक स्थिरता आहे. धोरणे पारदर्शक आणि पूर्वानुमानक्षम आहेत. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे.” पंतप्रधानांनी भारतात ‘ईझ ऑफ डूइंग बिजनेस’ वर देखील भर दिला असून व्यवसायासाठी सिंगल डिजिटल विंडो उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच, S&P ग्लोबलने भारताची क्रेडिट रेटिंग सुधारल्याचे आणि जगभर भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे नमूद केले.”ऑटोमोबाईल क्षेत्रातील यशानंतर, आता बॅटर्‍या, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर्स, शिप-बिल्डिंग आणि न्यूक्लिअर ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांतही नवसंस्थापन करून जागतिक स्तरावर वरचढ होण्याचा आमचा मानस आहे,” असे देखील त्यांनी सांगितले. ग्लोबल साऊथ, विशेषत: आफ्रिकेच्या विकासात भारत आणि जपान (India Japan) संयुक्तपणे योगदान देतील असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला.

जपानचे तंत्रज्ञान आणि भारतीय कुशलता या शतकाचे नेतृत्व करेल

मोदींनी पुढे म्हटले, “भारताने AI, सेमीकंडक्टर्स, क्वांटम कॉम्प्युटिंग, बायोटेक आणि स्पेससारख्या क्षेत्रांत धाडसी आणि महत्वाकांक्षी उपक्रम घेतले आहेत. जपानची अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भारतातील कुशल प्रतिभा यांचा संगम या शतकाचे तंत्रक्रांतीत नेतृत्व करेल.” जपानच्या सहकार्याने मुंबई आणि अहमदाबादमधील हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पासह पुढील दहा वर्षांसाठी आर्थिक सुरक्षा, पर्यावरण, तंत्रज्ञान, आरोग्य, लोकांमधील संवाद आणि प्रदेशीय भागीदारी या क्षेत्रांवरील रोडमॅपही तयार करण्यात आला आहे.

(India Japan) डिजिटल पार्टनरशिप 2.0

मोदींनी जपानमध्ये सुरक्षा, संरक्षण, समुद्री सुरक्षा आणि आतंकवादविरोधी सहकार्यावर भर दिला आणि नवे आर्थिक सुरक्षा सहकार्य आणि डिजिटल पार्टनरशिप 2.0 यांसारख्या उपक्रमांची घोषणा केली. सेमीकंडक्टर्स आणि रेअर अर्थ मिनरल्सवर विशेष लक्ष असून पुढील दशकासाठी हे महत्त्वाचे क्षेत्र राहणार असल्याचे सांगितले.

माजी पंतप्रधानांशी मोदींची भेट

(Japan Tour) मध्ये मोदींनी जपानमधील माजी पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ नेत्यांशीही संवाद साधून व्यापार, तंत्रज्ञान, मानवी संसाधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरील सहकार्य वाढवण्याची चर्चा केली. त्यांनी भारताच्या संरक्षण उद्योगातील प्रगती सह-जागतिक सहकोपरेशनसाठी एक मोठी संधी असल्याचे नमूद केले.

जपानच्या प्रमुख पुरोहितांची मोदींना विशेष भेट

Japan Tour दौऱ्यादरम्यान मोदींनी जपानच्या प्रमुख पुरोहितांच्या भेटीला देखील महत्त्व दिले आणि भारतीय संप्रदायातील बौद्ध धर्मपरंपरेशी जपानी संस्कृतीच्या दारुमा प्रतिमेचा संबंध अधोरेखित केला.

हा (Japan Tour) दौरा भारताच्या जागतिक राजकारणातील स्थान अधिक बळकट करणार असून, जपान आणि भारत यांच्यातील आर्थिक, तांत्रिक, संरक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य आणखी विस्तारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान मोदींचा हा जपान दौरा (Japan Tour) भारत-जपान (India Japan) भागीदारीसाठी एक नवे पर्व ठरल्याचे स्पष्ट झाले आहे आणि दोन्ही देशांनी भविष्यातील सहकार्यात मोठ्या संधी पाहिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाजमाध्यमावर आपल्या जपान दौऱ्याचा (Japan Tour) व्हिडीओ शेअर केला आहे तो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

Anand Mahindra आनंद महिंद्रांकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा; हृदयस्पर्शी व्हिडीओद्वारे व्यक्त केल्या भावना

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत