Reliance Jio रिलायन्स जिओने नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल उचलत, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून जिओ कॉईन Reliance Jio Coin नावाचे नवीन रिवॉर्ड टोकन शुक्रवारी लॉन्च केले आहे. असे करून मुकेश अंबानीने पुन्हा एक नवा विक्रम रचला आहे;अशारितीने जिओ बनले भारतातील पहिले टेलिकॉम कंपनी… पॉलीगॉन ब्लॉकचेन नेटवर्कवर आधारित असलेली ही क्रिप्टोकरन्सी डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवण्याची शक्यता आहे. जिओचे संस्थापक मुकेश अंबानी यांनी यामुळे पुन्हा एकदा चर्चेत स्थान मिळवले आहे. मात्र, जिओ कॉईनचा उपयोग नेमका कशासाठी होणार आहे, याबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.
Reliance Jio Coin – जिओ कॉईनची वैशिष्ट्ये
जिओस्पीयर या जिओच्या वेब ब्राऊजरवर इंटरनेट ब्राउज करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी जिओ कॉईन हे रिवॉर्ड मेकॅनिझम म्हणून डिझाइन करण्यात आले आहे. 16 जानेवारी रोजी सोशल मीडिया वापरकर्त्यांनी जिओ कॉईनचा जिओस्पीयरमध्ये समावेश झाल्याचे पाहिले. पॉलीगॉन लॅब्ससोबत झालेल्या भागीदारीमुळे जिओ ब्लॉकचेन आणि वेब3 सुविधांचा वापर करून आपली सेवा अधिक प्रगत करण्यावर भर देत आहे.
Reliance Jio Coin – जिओ कॉईनचा वापर
सध्या जिओ कॉईनचे रिडीम करणे किंवा इतरांना ट्रान्सफर करणे शक्य नाही. मात्र, रिलायन्सच्या विस्तृत इकोसिस्टममध्ये भविष्यात याचा उपयोग कसा करता येईल, हे स्पष्ट होईल.
बिटिनिंगचे सीईओ काशिफ रझा यांच्या मते, जिओ कॉईनचा उपयोग भविष्यात मोबाईल रिचार्ज, रिलायन्स इंधन पंपांवर व्यवहार, किंवा इतर सेवा देण्यासाठी होऊ शकतो.
टीका आणि शंका
jio coin जिओ कॉईनच्या लॉन्चनंतर काहींनी टीका केली आहे. लेखक आणि क्रिप्टो विश्लेषक सुनील अग्रवाल यांनी या टोकनच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली आहे.
Reliance Jio रिलायन्स जिओच्या या नव्या उपक्रमामुळे भारतीय डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे. मात्र, जिओ कॉईनचा खरा उपयोग आणि त्याचा प्रभाव काय असेल, हे येणाऱ्या काळात कळेल.
संक्षिप्त सारांश
हा विषय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खासगी ‘व्हर्च्युअल कॉईन्स’ आणि क्रिप्टोकरन्सींबाबत व्यक्त केलेल्या चिंता यांच्या पार्श्वभूमीवर येतो. भारतातील धोरणकर्त्यांमध्ये अजूनही क्रिप्टोकरन्सीवर चर्चा सुरू आहे. मात्र, जागतिक स्तरावर डिजिटल टोकन्सच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. विशेषतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष-नियुक्त डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिप्टोकरन्सीला धोरणात्मक महत्त्व दिल्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व मिळाले आहे.