८ ते १० नोव्हेंबर दरम्यान झालेल्या बहुराज्ये मोहिमेत (JK Police) जम्मू-काश्मीर पोलिसांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या सुरक्षा दलांसह मिळून जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार घझवात-उल-हिंदशी जोडलेले दहशतवादी जाळे उधळून लावले. या कारवाईत आठ संशयितांना जेरबंद करण्यात आले, ज्यामध्ये वैद्यकीय व्यावसायिक डॉ. आदिल अहमद रदर, डॉ. मुझम्मिल शकील आणि डॉ. शाहीना भट यांचा समावेश आहे. पोलिसांनी अनंतनाग, फरीदाबाद आणि सहारनपूर येथून दोन AK-47 रायफल्स, पिस्तुले, ग्रेनेड, गोळ्या आणि तब्बल २,९०० किलो अमोनियम नायट्रेट जप्त केली आहे. हा अमोनियम नायट्रेट आयईडीसाठी उपयुक्त असा असून पाकिस्तानच्या ISI कडून समर्थित या मोड्यूलने उच्चशिक्षित व्यावसायिकांना भरती करून दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याचा कट रचला होता, ज्याला intelligence based माहितीच्या आधारे केलेल्या कारवायांनी निष्फळ ठरवले.

JK Police आणि स्थानीय पोलिसांची संयुक्त कार्यवाही
(JK Police) पोलिसांनी स्थानीय पोलिसांच्या मदतीने अनंतनाग, फरीदाबाद आणि सहारनपूर येथील ठिकाणांवर छापेमारी करत दोन AK-47 रायफल, पिस्तुले, ग्रेनेड, शस्त्रे, गोळ्या आणि तब्बल २,९०० किलो अमोनियम नायट्रेट हे स्फोटक जप्त केले आहेत. हे अमोनियम नायट्रेट आयईडी तयार करण्यासाठी वापरता येण्याजोगे आहे. फरीदाबादमधील घराघरांत झडती घेत असताना पोलिसांना जे स्फोटक मिळाले, ते अमेरिकेतील ओक्लाहोमा बॉम्बिंगसाठी वापरलेल्या प्रमाणापेक्षा (१८०० किलो) १००० किलो अधिक आहे. या स्फोटकांचा वापर करून दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रावर मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला जात होता, जो intelligence based raids मुळे टळला तूर्तास टळला आहे. आरोपी डॉक्टर आदिल अहमद रदर अंबाला रोडवरील खासगी हॉस्पिटलमधून कार्यरत होता. तो पूर्वी अनंतनागमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात काम करत होता. त्याच्या जुन्या लॉकरमधून रायफल सापडली. त्याच्या चौकशीतून परत एक डॉक्टर डॉ. मुझम्मिल शकील याचा शोध लागला जो फरीदाबादमधील अल-फलाह हॉस्पिटलमध्ये काम करतो. त्याच्याकडे ३५० किलो अमोनियम नायट्रेट, २० टाइमर आणि एक रायफल सापडली. डॉ. शाहीना भट या तिसर्या महिला डॉक्टराला देखील या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी या स्फोटकांमुळे देशात एक अत्यंत मोठा दहशतवादी स्फोट टाळला असल्याचे सांगितले. संशयित दहशतवादी नेटवर्कवर पाकिस्तानच्या ISI चा पाठबळ असल्याचा संशय आहे.
ISI आणि पाकिस्तानचा संबंध असण्याची पूर्ण शक्यता
तपास अजून सुरू असून, या नेटवर्क मधील संबंधित इतर सदस्य शोधण्यात येत आहेत. देशभरातील सुरक्षा यंत्रणा या प्रकरणात सतर्क आहेत.ही घटना देशातील सुरक्षिततेसाठी अत्यंत गंभीर आहे आणि यावर वेगाने कारवाई करत पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना फोडण्यात भारतीय सुरक्षा विभागाला यश आलेआहे. अधिकाऱ्यांच्या मते, हे दहशतवादी नेटवर्क पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI कडून समर्थीत असून, उच्चशिक्षित कट्टरवाद्यांना दहशतवादात सामील करून मोठ्या प्रमाणावर भारतात हल्ले करण्याच्या नियोजनात ISI अगोदर पासूनच सामील राहिलेले आहे.त्यामुळे या संपूर्ण नेटवर्कला पाकिस्तान व पाकिस्तानातील गुप्तहेर संघटना ISI जबाबदार असण्याची दाट शक्यता आहे.सध्याच्या तपासात, या संघटनेशी संबंधित अन्य सदस्य शोधण्यात येत असून, देशभरातील सुरक्षा एजन्सी सतर्क आहेत. विविध राज्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात येत असून, नागरिकांकडून काळजी न करता आणि घाबरून जाता, आपल्या आसपासच्या हालचालींबाबत सावध राहून पोलिसांना आवश्यक ती माहिती त्वरित सूचित करावी अशी सूचना समाज माध्यामांवर येणाऱ्या संदेशात नेटकरी करताना दिसत आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने या घडामोडींचं गांभिर्याने परीक्षण केल्याचं जाहिर केलं असून, सुरक्षा दलांना अधिक संसाधने देऊन तसेच त्वरित कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “भारतीय सुरक्षा यंत्रणा या कठीण परिस्थितीत देखील आपल्या कामगिरीची दखल घेत आहेत आणि यामुळे देशाची अखंडता आणि सुरक्षितता कायम राहील.”
संबंधित बातम्यांचे इंटरनेटवरील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
