Khelo India Winter Games 2025 -मोठ्या प्रमाणात तरुणांना खेळाकडे वळविण्याच्या आणि देशात खेळ संस्कृती वाढवण्याच्या उद्देशाने ” खेलो इंडिया योजना” भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने २०१७ -२०१८ या वर्षी सुरु केली. हि खेळातील एक प्रमुख केंद्रीय क्षेत्र योजना आहे जी भारतातील विविध खेळातील प्रतिभाशाली खिळाडूंना शोधते , त्यांना योग्य ते जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देते, खेळाचे प्रदर्शन करण्याच्या उद्दशाने राष्ट्रीय स्तरावरील मंच उपलब्ध करून देते. याच कार्यक्रमांतर्गत Khelo India Winter Games आयोजित केले जातात ज्याची ५ वी आवृत्ती – 5th Khelo India Winter Games 2025 सध्या जम्मू काश्मीर आणि लद्दाख मध्ये आयोजित केली गेली आहे.

खेलो इंडिया योजनेंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा
खेलो इंडिया युथ गेम्स, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आणि खेलो इंडिया विंटर गेम्स यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्याचे काम खेलो इंडिया योजनेंतर्गत केले जाते. खेलो इंडिया हिवाळी खेळांच्या ४ आवृत्त्या आतापर्यंत झाल्या आहेत. खेलो इंडिया युथ अँड युनिव्हर्सिटी गेम्सच्या ७ आवृत्त्या आणि खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या एका आवृत्तीचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
Khelo India Winter Games 2025 पहिल्या दिवसाच्या खेळांचा निकाल

पंतप्रधान मोदींनी Khelo India Winter Games 2025 निमित्त दिल्या शुभेच्छा
“५ व्या खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा! मला खात्री आहे की ही स्पर्धा आगामी प्रतिभेला प्रोत्साहन देईल. खेळ देखील खेळाडू भावनेचा उत्सव असू दे” या शब्दात पंतप्रधान मोदींनी सोशल मिडिया साईट “X” वरून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
- खेलो इंडिया युथ गेम्स- आवृत्या – २०१८, २०१९, २०२०, २०२१, २०२२, २०२३
- खेलो इंडिया विंटर गेम्स – आवृत्या – २०२०, २०२१, २०२३, २०२४ ,२०२५
- खेलो इंडिया युथ अँड युनिव्हर्सिटी गेम्स – आवृत्या – २०२०, २०२१, २०२२. २०२३
- खेलो इंडिया पॅरा गेम्स- आवृत्ती – २०२३
४ थे खेलो इंडिया हिवाळी गेम्स २०२५ ( 4th Khelo India Winter Games 2025)
- Khelo India Winter Games 2025- खेलो इंडिया हिवाळी खेळांमध्ये बर्फामध्ये खेळले जाणारे खेळ खेळले जातात, जसे कि आईस हॉकी, आइस स्केटिंग, स्की पर्वतारोहण, अल्पाइन स्कीइंग, स्नोबोर्ड, नॉर्डिक स्कीइंग.
- खेलो इंडिया हिवाळी खेळांची हि ५ वी आवृत्ती असून ती जम्मू काश्मीर आणि लद्दाख येथे आयोजित केली जात आहे.
- ५ व्या Khelo India Winter Games 2025 मध्ये एकूण २३ सुवर्ण, २३ रौप्य, २३ ब्रांझ मेडल साठी चुरस होणार आहे.
- हिवाळी खेळ २०२५ चा पहिल्या भागात २ आइस स्पोर्ट्स (आईस हॉकी आणि आइस स्केटिंग) २३ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान लेह येथे आयोजित करण्यात आले आहेत. हिवाळी खेळ २०२५ चा दुसऱ्या भागात म्हणजे ४ स्नो स्पोर्ट्स (स्की पर्वतारोहण, अल्पाइन स्कीइंग, स्नोबोर्ड आणि नॉर्डिक स्कीइंग) गुलमर्ग, जम्मू आणि काश्मीर येथे २२-०२ -२०२५ रोजी आयोजित केला गेला आहे.

4th Khelo India Winter Games 2025 Schedule- ४ थ्या खेलो इंडिया हिवाळी गेम्स २०२५ चे वेळापत्रक
| अ. क्र. | खेळ प्रकार | तारीख | स्थळ |
| १ | आईस हॉकी | २३ ते २७ जानेवारी २०२५ | एनडी स्टेडियम (पुरुष आणि अंतिम फेरी) आणि आर्मी रिंक (महिला), लेह लडाख |
| २ | आईस स्केटिंग (Short Track) | २३ ते २७ जानेवारी २०२५ | एनडी स्टेडियम (शॉर्ट ट्रॅक), गुफुक तलाव (लाँग ट्रॅक), लेह लडाख |
| ३ | स्की पर्वतारोहण | २२-०२-२०२५ | कांगदरी, गुलमर्ग |
| ४ | अल्पाइन स्कीइंग | २२-०२-२०२५ | कांगदरी, गुलमर्ग |
| ५ | स्नोबोर्ड | २२-०२-२०२५ | कांगदरी, गुलमर्ग |
| ६ | नॉर्डिक स्कीइंग | २२-०२-२०२५ | कांगदरी, गुलमर्ग |
५ व्या खेलो इंडिया हिवाळी गेम्स २०२५ विषयी (About Khelo India Winter Games 2025)
पहिल्यांदाच भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या संलग्न मंडळ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या संयुक्त विद्यमाने ५ व्या खेलो इंडिया हिवाळी गेम्स २०२५ खेळांचे तांत्रिक आयोजन तथा व्यवस्थापन केल्या जात आहे. ( 5th Khelo India Winter Games 2025) ५व्या खेलो इंडिया हिवाळी गेम्स २०२५ मध्ये ७०० पेक्षा अधिक खेळाडू, ११३ तांत्रिक अधिकारी, १४१ सहाय्यक कर्मचारी, २५० पेक्षा अधिक स्वयंसेवक आणि क्रीडा विशिष्ट स्वयंसेवकांसह १२०० पेक्षा अधिक लोक सहभागी होतील आणि एकूण १३६ पदकांसाठी चुरशीच्या स्पर्धा रंगणार आहेत.
५ व्या खेलो इंडिया हिवाळी गेम्स २०२५ चे प्रक्षेपण
५ व्या खेलो इंडिया हिवाळी गेम्स २०२५ चे प्रक्षेपण डी. डी. स्पोर्ट्स वर केले जाणार आहे.
खेलो इंडिया च्या अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.
FAQ
What is Khelo India program?
मोठ्या प्रमाणात तरुणांना खेळाकडे वळविण्याच्या आणि देशात खेळ संस्कृती वाढवण्याच्या उद्देशाने ” खेलो इंडिया योजना” भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने २०१७ -२०१८ या वर्षी सुरु केली. हि खेळातील एक प्रमुख केंद्रीय क्षेत्र योजना आहे जी भारतातील विविध खेळातील प्रतिभाशाली खिळाडूंना शोधते , त्यांना योग्य ते जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देते. खेलो इंडिया युथ गेम्स, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आणि खेलो इंडिया विंटर गेम्स यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्याचे काम खेलो इंडिया योजनेंतर्गत केले जाते.
What is the new name of Khelo India?
खेलो इंडिया
When was Khelo India first started?
भारत सरकार ने २०१७-२०१८ ला खेलो इंडिया चा शुभारंभ केला ज्याच्या अंतर्गत खेलो इंडिया युथ गेम्स- २०१८ सर्व प्रथम आयोजित केल्या गेले.
What is Khelo India Youth Games 2024?
खेलो इंडिया युथ गेम्स, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आणि खेलो इंडिया विंटर गेम्स यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्याचे काम खेलो इंडिया योजनेंतर्गत केले जाते आतापर्यंत ६ वेळा Khelo India Youth Games आयोजित केले गेले आहेत.
Khelo India Registration
खेलो इंडिया मध्ये आपण Applicant or Valunteer or Participant म्हणून किंवा पार्टनर म्हणून एक Business or NGO or Youth Club or Academia च्या रुपात किवा वेरीफायर DYO or NSS Program officer or Placement Officer म्हणून नोंदणीसाठी येथे क्लिक करा.
खेलो इंडिया युथ गेम्स बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
आमचे इतर ब्लॉगसाठी येथे क्लिक करा.
