ज्येष्ठ अभिनेते आणि माजी आमदार कोटा श्रीनिवास राव (Kota Srinivasa Rao) यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोकाची लाट पसरली आहे. रविवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमावरून कोटा श्रीनिवास राव यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटले की, “कोटा श्रीनिवास राव यांची चित्रपटसृष्टीतील बहुआयामी प्रतिभा आणि भूमिकांची बहुविधता कायम लक्षात राहील.

मोदींनी पुढे लिहिले, “श्री कोटा श्रीनिवास राव गारू यांच्या निधनाने मन अत्यंत व्यथित झाले आहे. त्यांनी आपल्या उत्कट अभिनयाने अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ते सामाजिक सेवेच्या आघाडीवर होते आणि गरिबांसाठी, वंचितांसाठी कार्य करत राहिले. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी शोकसंवेदना व्यक्त करतो. ॐ शांती.”
कोटा श्रीनिवास राव (Kota Srinivasa Rao) यांच्याविषयी थोडक्यात:
आंध्र प्रदेशातील विजयवाडा उपनगरात जन्मलेले कोटा श्रीनिवास राव यांनी 1978 मध्ये ‘प्रणाम खरेदू’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यांनी 750 हून अधिक चित्रपटांत वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केले. 2015 मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, जो भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
अंतिम दर्शनासाठी कलाकार, राजकारणी जमा
निधनाची बातमी समजताच अनेक राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि नातेवाईक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. चिरंजीवी, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अभिनेते प्रकाश राज, चित्रपट निर्माते अल्लू अरविंद (अल्लू अर्जुन यांचे वडील) यांनी देखील भेट दिली. माध्यमांशी बोलताना अरविंद म्हणाले, “कोटा श्रीनिवास राव आमच्या कुटुंबाचे जवळचे सदस्य होते. त्यांच्यासोबत वेळ घालवणे मला नेहमीच आवडायचे. त्यांच्या निधनामुळे आमच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.”
सोशल मीडियावर सेलिब्रिटिंची भावनिक श्रद्धांजली
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून कोटा राव Kota Srinivasa Rao) यांना श्रद्धांजली वाहिली. चिरंजीवी यांनी त्यांना “बहुआयामी प्रतिभावान” असे संबोधले आणि एक भावनिक पोस्ट लिहिली.
अभिनेता रवी तेजा यांनी लिहिले, “त्यांना पाहून मोठा झालो, त्यांचा आदर करत आलो, त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून शिकत आलो. कोटा बाबाई आमच्यासारख्यांसाठी कुटुंबासारखेच होते. त्यांच्या सोबत केलेल्या चित्रपटांच्या आठवणी नेहमी माझ्या हृदयात राहतील. ॐ शांती.”
विष्णु मंचू यांनी देखील भावनात्मक पोस्ट लिहित म्हटले, “माझं मन फार जड झालं आहे. कोटा श्रीनिवास राव गारू हे अत्यंत प्रभावी अभिनेते होते. कोणतीही भूमिका असो – विनोदी, खलनायक अथवा गंभीर – त्यांनी त्या भूमिकेत जीव ओतला. मला त्यांच्या सोबत काम करण्याचा बहुमान मिळाला आणि अनेक चित्रपटांतून त्यांना पाहत मोठा झालो. त्यांनी माझ्या चित्रपटप्रेमाला आकार दिला.”
कोटा श्रीनिवास राव (Kota Srinivasa Rao) यांचे निधन ही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक अपूरणीय हानी आहे. त्यांचे योगदान सदैव लक्षात राहील.
अभिनेता रवी तेज यांची समाज माध्यमावरील प्रतिक्रिया.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
रामायण (Ramayan): एका अमर कथेचा भव्य महायज्ञ बॉलीवूडला जमेल का ?
