राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अनेक महिलांना आर्थिक मदत मिळत असताना, काही पात्र लाभार्थ्यांना Ladki Bahin ekyc प्रक्रिया पूर्ण करूनही योजनेचा लाभ मिळालेला नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विशेषतः e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला जाणे, माहितीतील त्रुटी किंवा तांत्रिक अडचणी यामुळे काही बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्या लाभार्थ्यांनी e-KYC पूर्ण केले असले तरी त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा सर्व महिलांना पुन्हा Ladki Bahin ekyc करून माहिती दुरुस्त करण्याची पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सरकारने ऑनलाइन पोर्टलवर ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या कालावधीत लाभार्थ्यांनी आपल्या e-KYC मधील चुकीची माहिती तपासून योग्य दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यामुळे प्रलंबित लाभ त्वरीत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Ladki Bahin ekyc मागे सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा हीच सरकारची भूमिका
महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की, सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा हीच सरकारची भूमिका असून, e-KYC मधील तांत्रिक किंवा मानवी चुका दुरुस्त करण्यासाठी ही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या ‘लाडक्या बहिणी’ना अजून पैसे मिळाले नाहीत, त्यांनी मुदतीपूर्वी पोर्टलवर जाऊन आपली माहिती दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
काय करावे?
- Ladki Bahin ekyc करण्यासाठी अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन करून e-KYC तपासा
- चुकीचा पर्याय/माहिती असल्यास दुरुस्ती करा
- बँक खाते, आधार क्रमांक व वैयक्तिक तपशील पडताळा
- ३१ मार्च २०२६ पूर्वी प्रक्रिया पूर्ण करा
Ladki Bahin Yojna Ekyc करण्यासाठी अधिकृत वेबसाईट साठी तयेथे क्लिक करा.
- Ladki Bahin Yojna Ekyc करण्यासठी वरील वेबसाईट ब्राउजर वर ओपन करावी
- पात्र महिलांनी त्यांचा आधार क्रमांक प्रविष्ठ करावा
- आधारला लिंक असलेल्या मोबाईल वर एक आधारच ओ टी पी येतो
- मोबाईल वर आलेला ओ टी पी वेबसाईट वरील ओ टी पी प्रविष्ठ करण्यासाठी दिलेल्या जागी ओ टी पी प्रविष्ठ करावा
- दिलेल्या दोन्ही पर्यायांना वाचून योग्य तो पर्याय होय असेल तर होय किंवा नाही असेल तर नाही निवडावा (पात्र महिलांना नाहीच निवडावे)
- नंतर शेवटी सबमिट वर क्लिक केल्यावर EKYC सक्सेसफुली झाल्याचा संदेश झळकला कि आपली प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे.
योग्य वेळी दुरुस्ती केल्यास ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ नक्की मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांची समाज माध्यमावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
