‘माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) अपडेट– राज्य सरकारने राज्यातील लाखो महिलांसाठी एक आनंददायी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना जुलै महिन्याचा ₹१५०० सन्मान निधी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला थेट बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे वितरित केला जाणार आहे.नुकतीच ही घोषणा महिला व बालकल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी समाज माध्यम साईट “X” च्या माध्यमातून केली. त्यांनी एक पोस्ट शेअर करत सांगितले की, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) जमा करण्यात येईल.

Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची योजना आहे. राज्यातील गरजू, economically weaker आणि वंचित वर्गातील महिलांना आर्थिक सन्मान आणि आत्मनिर्भरतेसाठी हातभार लावणारी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा ₹1500 सन्मान निधी म्हणून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.या योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना आर्थिक सन्मान व आधार देणे आहे. रक्षाबंधनासारख्या भावनिक नात्यांच्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा निर्णय महिला सक्षमीकरणासाठी एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहिला जात आहे.
रक्षाबंधनासारख्या भावनिक सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जुलै महिन्याचा सन्मान निधी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वितरित करून लाखो लाडक्या बहिणींना खास भेट दिली जाणार आहे . मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे.
ही योजना महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासोबतच त्यांच्या आत्मसन्मानासाठी महत्त्वपूर्ण ठरते आहे, तसेच राज्य शासनाच्या ‘महिला-कल्याण’ धोरणाचा एक सकारात्मक टप्पा मानला जातो.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) महिला सन्मानासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेली महत्वाकांक्षी योजना आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला महाराष्ट्र शासन १५०० रु सन्मान निधी जमा करते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
AIIMS NORCET‑9 – Nursing Officer भरती
(IB Recruitment) इंटेलिजन्स ब्युरो भरती 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात 4987 जागांसाठी मेगाभरती
Mahavatar Narsimha- “महाअवतार नरसिंह”— २५ जुलै २०२५ पासून थेट सिनेमागृहात
