महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या Ladki Bahin Yojana – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. राज्यातील महिला व भगिनींना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने ही योजना कार्यान्वित असून, लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात निधी जमा होणार आहे.राज्याच्या महिला व माता-भगिनींचा अखंड विश्वास आणि सहभागावर आधारलेली ही योजना आज यशस्वीपणे मार्गक्रमण करत असल्याचे आमदार अदिती तटकरे यांनी सांगितले. सन्मान निधीचे वेळेवर वितरण होऊन महिलांना थेट फायदा मिळावा, यासाठी प्रशासन पातळीवर काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana
या योजनेतून महिलांना केवळ आर्थिक सहाय्यच नाही, तर सामाजिक प्रतिष्ठा आणि स्वाभिमान देखील मिळत असल्याचे मत तटकरे यांनी मांडले. महिला सक्षमीकरण ही केवळ योजना मर्यादित बाब नसून, ती एक अखंड क्रांती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’मुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कौटुंबिक जीवनात स्थैर्य लाभत असून, रोजगारनिर्मिती व उद्योजकतेलाही चालना मिळत आहे. आगामी काही दिवसांत राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हा सन्मान निधी जमा होईल, अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
