राज्य शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” (Ladki Bahin Yojna) या योजनेत e-KYC प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे अडचणीत आलेल्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती एस. तटकरे यांनी जाहीर केले की, या योजनेंतील लाभार्थ्यांना e-KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी एक अंतिम संधी देण्यात येत असून, ही सुधारणा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करता येईल. आदिती तटकरे यांनी आपल्या सामाजिक माध्यम खात्यावर माहिती देताना सांगितले, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेचे बहुसंख्य लाभार्थी हे दुर्गम व ग्रामीण परिसरातील महिलाच आहेत. e-KYC करताना काही तांत्रिक अथवा माहितीविषयक चुका होणे स्वाभाविक आहे. त्या चुका दुरुस्त करण्यासाठी विभागाकडे अनेक निवेदने आली आहेत. महिला सक्षमीकरणाच्या हेतूने ही योजना राबविली जात असल्याने, अशा महिलांना सुधारण्याची संधी देणे आवश्यक आहे.” त्यामुळे शासनाने e-KYC प्रक्रियेत केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविली आहे.

Ladki Bahin Yojna – दिवंगत पती किंवा वडिलांच्या लाभार्थींसाठीही सुविधा
महिला व बालविकास विभागाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे कि, ज्या लाभार्थ्यांच्या पती किंवा वडील हयात नाहीत, अशा “लाडक्या बहिणी”साठी देखील e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojna ekyc प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर भर
या सुधारित प्रक्रियेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना मोठा लाभ होणार आहे. विभागाने सूचित केले आहे की सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी दुरुस्ती अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करून योजना लाभ अखंडपणे मिळवावा.
महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की, “ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी होईल, आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा” यासाठी शासन कटिबद्ध आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची समाज माध्यमावरील प्रतिक्रिया वाचण्येयासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
