महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने वर्ष २०२५ मधील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेचे आयोजन रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यभर करण्यात आले आहे.महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2025) ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत दरवर्षी आयोजित केली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आहे. या परीक्षेचा मुख्य उद्देश म्हणजे प्राथमिक (इयत्ता १ ते ५) व उच्च प्राथमिक (इयत्ता ६ ते ८) शाळांमधील शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता निकष निश्चित करणे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने (NCTE) घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही परीक्षा घेतली जाते, ज्यामुळे शिक्षक म्हणून नियुक्त होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचे शैक्षणिक ज्ञान व अध्यापन कौशल्य तपासले जाते.

MAHA TET 2025 Hall Ticket
शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट २०१३ अन्वये परीक्षा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा पार पडणार आहे. महाराष्ट्र TET 2025 परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall Ticket) आता अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात आले आहे. उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन त्यांच्या लॉगिनद्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करावे:
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक: https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login
या वर्षीच्या MAHA TET 2025 परीक्षेच्या पॅटर्नमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता पहिली ते आठवी या वर्गातील शिक्षकांसाठी दोन्ही पेपर – Paper I व Paper II उत्तीर्ण करणे आवश्यक राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेसंबंधी सर्व अधिकृत सूचना व माहिती त्यांच्या संकेतस्थळांवरच दिली जाते असा पुनरुच्चार केला आहे. उमेदवारांना सूचित करण्यात येते की YouTube चॅनेल्स, सोशल मीडियावरील अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. परीक्षेसंबंधी सर्व ताजी माहिती व अद्यतन खालील अधिकृत संकेतस्थळांवर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाते:
कोणत्याही चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवल्यास त्यातून होणाऱ्या नुकसानीस संबंधित उमेदवार जबाबदार राहतील, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
