Mahakumbh – प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यातील एका तंबूमध्ये दोन गॅस सिलेंडर स्फोट झाल्याने मोठी आग लागली, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही आग वेगाने पसरून एकूण १८ तंबू जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झाल्याची नोंद नाही.
आग लागल्यानंतर मेळ्याच्या सुरक्षेसाठी आधीच तैनात असलेल्या अग्निशमन गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यात यशस्वी झाल्या. स्थानिक नागरिक आणि भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पाहणी करण्याचे आदेश दिले.

Mahakumbh आग रोकण्यासाठी प्रशासनाची तत्काळ कारवाई
आग लागल्यानंतर त्वरित अग्निशमन दलाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली,” अशी माहिती अखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी भास्कर मिश्रा यांनी मिडियाच्या माध्यमातून दिली.
Mahakumbh महाकुंभाची पार्श्वभूमी
१३ जानेवारीपासून सुरू झालेला ४५ दिवसांचा महाकुंभ मेळा भाविकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ७.७२ कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले आहे, तर शनिवारी एकट्या ४६.९५ लाखांहून अधिक लोकांनी गंगेत डुबकी घेतली.
सुरक्षेच्या कडक उपाययोजनांसह सुरू असलेल्या या धार्मिक मेळ्याला लागलेली आग आता विझवण्यात आली असली, तरी या घटनेने भाविकांमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे. प्रशासनाने पुढील घटनांसाठी अधिक सतर्कता बाळगण्याचे आश्वासन दिले आहे.
उत्तर परदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांचा घटनास्थळी दौरा
मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभ मेळा क्षेत्रात झालेल्या आगजनीच्या घटनेची दखल घेत घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना मदतकार्य युद्धपातळीवर राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
Mahakumbh महाकुंभ ची सोशल साईट “X” अधिकृत पोस्ट करून आग आटोक्यात आणल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले.
महाकुंभ च्या अधिकृत खात्यातून समाज मध्यम “X” वर लिहिले कि “आग लागल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ आणि तत्परतेने कारवाई करून आग आटोक्यात आणली.आता सर्वकाही पूर्ववत सामान्य झाले आहे. मेळा प्रशासनाच्या कुशल व्यवस्थापनामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मेळा प्रशासन आणि अग्निशमन दल अभिनंदनास पात्र आहेत.
प्रतिक्रिया वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :
Mahakumbh- महाकुंभ मेळा 2025: १४४ वर्षांतून एकदा येणारे एक दिव्य पर्व.
