Maharashtra Din-1 मे महाराष्ट्र दिन

Maharashtra Din

Vishal Patole
Maharashtra DinMaharashtra Din

सर्वांना १ मे या (Maharashtra Din) महाराष्ट्र दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा !!! १०७ हुताम्यांच्या बलिदानाने, अनेक नेत्यांच्या संघर्षाने, कित्येक शाहिरांच्या मेहनतीतून उभ्या राहिलेल्या चळवळीचा परिणाम म्हणजे १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मिती होय. आज महाराष्ट्र राज्य निर्मितीचा तो ऐतिहासिक संघर्ष आठवण्याचा दिवस आहे. ज्या संघर्षातून, आंदोलकांनी आणि मराठी माणसाच्या लढ्याने आपला न्याय्य हक्क असलेले “मुंबईसह महाराष्ट्र” राज्य निर्माण करून घेतले. त्या संघर्षाची कहाणी आजच्या लेखात आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या प्रमुख बातम्या अशा कि, आज ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच मुंबईत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल साईट “x” च्या माध्यमातून देशाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिल्या (Maharashtra Din) महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

भारताचे यशस्वी आणि विश्वप्रसिद्ध पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज १ मे रोजी महराष्ट्र दिनानिमित्त मराठी भाषेत, सर्व मराठी जनतेला शुभेच्छा देणारी पोस्ट मायक्रो ब्लॉगिंग साईट X वर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जनतेला या गौरवपूर्ण दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

PRIME MINISTER, NARENDRA MODI POST ON X

एका ऐतिहासिक संघर्षाची कहाणी- Maharashtra Din

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर व भारतीय संविधान लागू झाल्यानंतर विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील विविध प्रांतांना संघराज्याच्या माळेत गुंफण्याच्या हेतूने विविध राज्ये निर्मितीसाठी आपण ” भाषावार प्रांत रचना” स्वीकारली म्हणजेच देशातील विखुरलेले प्रांत हे तेथील बोलल्या जाणाऱ्या भाषेवरून प्रांतांची विभागणी करून व सीमा ठरवून राज्ये निर्मिती करण्याचे ठरले व त्याकरीता “राज्य पुनर्रचना आयोग” निर्माण झाला परंतु मुंबई मराठी भाषिकांची असतांनाही राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले, तसेच मुंबई महाराष्ट्रात सामील न करण्याची भूमिका केंद्रातील नेहरू सरकार व तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी घेतली. त्यांच्या या चुकीच्या धोरणामुळे मराठी अस्मिता रक्तात वाहत असलेला मराठी माणूस या अन्यायाने पेटून उठला. सगळीकडे वेगवेगळ्या सभांमधून या अन्यायाचा विरोध होत होता, त्याचाच परिणाम म्हणून २१ नोव्हेंबर १९५६ च्या संध्याकाळी मुंबईतील शेकडो कापडगिरण्यातील मराठी कामगारांचा ताफा पांढऱ्या कपड्यात मुंबईच्या चारही बाजूने फ्लोरा फाऊनटेन जवळ शासनाच्या जुलमी निर्णयाविरोधात आंदोलन करण्यासाठी जमा होऊ लागला. मोरारजी देसाईच्या सरकारने या ठिकाणी जमावबंदी लागू केली होती. परंतु पोलिसांना न जुमानता लोक सत्याग्रहासाठी फ्लोरा फाऊनटेन जवळ आंदोलनासाठी बसले. या जमावावर शासनाने अगोदर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले.पोलसांनी लाठीचार्ज केला. या लाठ्या, काठ्या सहन करत आंदोलनकांनी आंदोलन सुरुच ठेवले होते व ते हार मानण्यास तयार नव्हते. एवढे करूनही लोक हटायला तयार नाहीत हे पाहून मोरारजी देसाई यांनी पोलिसांना “दिसताक्षणी गोळ्या घाला” चे आदेश दिले. गोळीबार सुरु झाला. शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या रक्ताच्या चिरकांड्या परिसरात उडू लागल्या. कित्येक आंदोलनकारी या लढ्यात हुतात्मा झाले जानेवारी १९५७ पर्यंत या लढ्यात १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्रांणांची आहुती दिली होती.

Hutatma Chowk, Mumbai Maharashtra

अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) आणि सयुंक्त महाराष्ट्र चळवळ

सयुंक्त महाराष्ट्राचा लढा खऱ्या अर्थाने गावा-गावा पर्यंत पोहोचला, तो तत्कालीन शाहीर आत्माराम पाटील यांनी लिहिलेला गोंधळ, अमर शेख यांची गीते व पोवाडे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून जन्मलेल्या कित्येक गीते, पोवाडे इत्यादीच्या माध्यामतून त्यापैकीच महाराष्ट्र आणि मुंबईच्या परिस्थितीवर आधारित असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एक गीत विशेष करून “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची व्हतीया काहिली” ने मराठी मनाचा ताबा घेतला. या गीताने अवघ्या महाराष्ट्राचे मन मुंबईच्या विरहाने व्याकूळ करून सोडले. एवढेच नाही तर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या पोवाड्यातून कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, दादासाहेब गायकवाड यांसारख्या सयुंक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांचे विचार सर्व सामन्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्याकाळी आपल्या गीतातून व पोवाड्याच्या माध्यमातून केले. ज्याकाळी मोबाईल, इंटरनेट, टीव्ही, सोशल मिडिया यापैकी काहीही नसतांना, एवढेच काय तर देशात इलेक्ट्रिसिटी, लाउड स्पीकर, माईक यासारख्या साधनांची उपलब्धता नसतांना या सर्व महान शाहिरांनी केवळ आणि केवळ त्यांच्या आवाज आणि कलेच्या जोरावर अवघा मराठीमुलुख हा “मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र चळवळीने” पेटवण्याचे काम केले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन तिथे पोवाडे, गीते, गोंधळ इत्यादीच्या माध्यमातून जनजागृती करत मराठी जनतेच्या मनात चळवळ पेरली. अशारीतीने सर्व सामान्यांना कळेल या भाषेत त्यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीकडे त्यांनी आकर्षित केले हेच त्यांचे सर्वात मोठे यश होते.

“माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची व्हतीया कायली”- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
Maharashtra din

संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान कॉंग्रेस केंद्र शासनापुढे नतमस्तक झाली

नेहरूंनी सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली. तसेच मोरारजी देसाई यांचा गुजरातमध्ये मुंबई सामिल करण्याचा डाव असताना महाराष्ट्रातील कॉंग्रेस केंद्रशासनापुढे नतमस्तक झाली होती एवढेच काय तर कॉंग्रेस नेते यशवंतराव चव्हाण म्हणाले होते कि, “नेहरू आणि संयुक्त महाराष्ट्रात मला नेहरू महत्वाचे वाटतात”

Maharashtra Din Quaote

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना आणि Maharashtra Din साठी योगदान

दि. १० ऑक्टोबर १९५५ रोजी न्या. फजल अली कमिशनने केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात मुंबईला द्विभाषिक राज्याचा दर्जा देण्याचा तसेच मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कारवार, निपाणी आणि पश्चिम महाराष्ट्र मिळून संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला होता.
२० नोव्हेंबर १९५५ रोजी तत्कालीन मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि तत्कालीन मुंबईचे महापौर सदाशिव कानोजी पाटील या कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुंबई च्या चौपाटीवर प्रक्षोभक भाषणे दिली मोरारजी देसाई म्हणाले “कॉंग्रेस जिवंत असे पर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही आणि गुंडगिरीला योग्य उत्तर मिळेल.”

त्यानंतर राज्य पुनर्रचना कायदा १९५६ नुसार भाषावार प्रांतरचनेनुसार मुंबई/ Bombay राज्याची निर्मिती झाली. परंतु या राज्यात मराठी भाषिक आजचा महाराष्ट्र, गुजराती भाषिक आजचा गुजरात, काही कोकणी भाषिक प्रदेश, तर काही कच्छी भाषा बोलानारे लोक देखील होते. अशा “बॉम्बे स्टेट” ची निर्मिती झाली होती, त्यामुळे ६ फेब्रुवारी १९५६ रोजी आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, केशवराव जेधे, नाना पाटील, प्रबोधनकार ठाकरे (केशव सीताराम ठाकरे), सेनापती बापट, ना. ग. गोरे, दादासाहेब गायकवाड, जयवंतराव टिळक यांनी एकत्र येवून मराठी भाषिकांचे मुंबई सह महाराष्ट्र राज्य निर्माण करावे म्हणून “संयुक्त महाराष्ट्र समिती” स्थापन केली. नेहरूनी सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनतेत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. त्याचबरोबर “संयुक्त महाराष्ट्र समिती” ने देखील ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ हि भूमिका अधिक धारदार केली.

“मुंबईचा हा लढा जिंकल्याशिवाय आम्ही थांबणार नाही”
– प्रबोधनकार ठाकरे

प्रबोधनकार ठाकरे

“Maharashtra Din” -१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती

शाहिरांची जनजागृती, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सभा, भाषणे इत्यादीच्या परिणामातून जन्माला आलेल्या चळवळीच्या आगीत तेल ओतण्याचे काम “२१ नोव्हेंबर १९५६ रोजी, मुंबईच्या फ्लोरा फाऊनटेन येथे आंदोलकांवर झालेला गोळीबार” या घटनेने केले आणि त्यानंतर मराठी भाषिकांचा हा संघर्ष अधिक ज्वलनशील झाला, अशातच या अन्यायाविरोधात केंद्रात अर्थमंत्री असलेले सी. डी. देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याचा फायदा आंदोलनाला मिळाला. मात्र कॉंग्रेसच्या इतर मराठी नेत्यांची भूमिका आंदोलन विरोधी होती त्यामुळे जनतेतून कॉंग्रेसला विरोध सुरु झाला आणि संयुक्त महाराष्ट्र समितीला जनतेचे समर्थन मिळणे सुरु झाले. त्यातूनच मग पुढे १९६२ साली येणाऱ्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला याचा लाभ न मिळता कॉंग्रेसला जनतेचे समर्थन मिळावे या उद्देशाने इदिरा गांधी यांनी नेहरूंना आपली भूमिका बदलण्यासाठी समजावले व त्यांचे मन वळविले. त्यांनतर महाराष्ट्र व गुजरात हे दोन राज्ये निर्मितीसाठी नेहरू तयार झाले. परंतु या विभाजनासाठी काही अटी ठरवल्या गेल्या होत्या, त्या अटी नुसारच महाराष्ट्राने गुजरातला १० कोटी दिले तसेच मुंबईच्या विकासात गुजराती भांडवलदारांची मेहनत आहे असा दावा गुजराती भाषिकांनी केल्यावर त्याचा मोबदला म्हणून ५० कोटी रुपये गुजरातला दिल्या गेले अशारितीने त्याकाळी कोट्यावधी रुपये गुजरातला देऊन आणि शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानानंतर “मुंबई” महाराष्ट्र राज्यात सामील करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. शेवटी राज्य पुनर्रचना कायदा १९५६ नुसार १ मे १९६० रोजी मुंबई सह “महाराष्ट्र” राज्याची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री झाले.

hutatmyanchi nave, hutatma smarak, mumbai

संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यांकडून हुतात्मा स्मारक


संयुक्त महाराष्ट्र समितीचे सदस्य असलेले प्रल्हाद अत्रे, श्रीपाद डांगे यांनी नंतर आंदोलकांवर गोळीबार झालेल्या फ्लोरा फाऊनटेन परिसरात धोतर बंडीतला शेतकरी आणि सदरा पायजमा घातलेला कामगार दोघेही एकहाती मशाल घेऊन जात असल्याचे शिल्प मूर्तिकार हरीश तालीम यांच्याकडून तयार करून घेतले व फ्लोरा फाऊनटेन परिसरात स्थापित केले, अशारितीने मुंबई येथे हुतात्मा स्मारक उभारले गेले. याठिकाणी आज सर्व हुतात्म्यांची नावे कोरली गेलेली आहेत. एच. पी. गैस च्या वतीने येथे अविरत ज्योत लावली गेली आहे जी सतत तेवत आहे आणि आजही मराठी मनात हुतात्म्यांचा आदर प्रज्वलित करीत आहे.

Hutatma Chowk
cm devendra fadanavis maharashtra din wishes post on x

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा.

FAQ

Q. Why is Maharashtra Day celebrated on 1 May?

Ans:- शेकडो हुतात्म्यांच्या बालीदानानंतर १ मे १९६० (Maharashtra Din) रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण झाले म्हणून हा दिवस महराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र साजरा केला जातो.


Q. Is 1 May a holiday in Maharashtra?

Ans:– होय, १ मे हा महाराष्ट्राचा निर्मित दिवस आहे आणि तो सुट्टीचा दिवस आहे.


Q. Is Maharashtra Day and Labour Day same?

Ans:- होय, लेबर डे आणि महाराष्ट्र दिन हे दोन्ही दिवस १ मे याच तारखेला असतो.


Q. १ मे रोजी महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

Ans:- बॉम्बे या द्विभाषिक राज्यातून १ मे १९६० रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण झाले म्हणून हा दिवस महराष्ट्र दिन (Maharashtra Din ) म्हणून साजरा केला जातो.


Q. 1 May maharashtra day quotes

Ans:- संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान वापरलेले गेलेले घोषवाक्य, पोवाडे गीते हे मराठी जनास प्रेरणा देणारे ठरले होते त्यापैकी काही खाली देत आहोत-

“मुंबईचा हा लढा जिंकल्याशिवाय आम्ही थांबणार नाही”- प्रबोधनकार ठाकरे

‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’

“माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची व्हतीया कायली”- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दिनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल ची x वरील पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या इतर ब्लॉग विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत