Maharashtra HSC Result 2025 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता बारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र – HSC) परीक्षेचा निकाल दिनांक ५ मे २०२५ (सोमवार) रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

Maharashtra HSC Result 2025
फेब्रुवारी – मार्च २०२५ या कालावधीत राज्यभरातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
Maharashtra HSC Result 2025
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे:
- https://results.digilocker.gov.in
- https://mahahsscboard.in
- https://hscresult.mkcl.org
- https://resultstargetpublications.org
- https://results.navneet.com
- https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharshtra-board-exams
- https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results
- https://www.indiatoday.in/education-today/results
- https://www.aajtak.in/education/board-exam-results
गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज:
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकनासाठी मंगळवार, ६ मे २०२५ पासून मंगळवार, २० मे २०२५ या कालावधीत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येईल.
पुरवणी परीक्षा अर्ज:
ज्या विद्यार्थ्यांना जून – जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांना बुधवार, ७ मे २०२५ पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :
