Mahavatar Narsimha- “महाअवतार नरसिंह” बॉक्स ऑफिस वर धमाल करतोय १६ व्या दिवशी एकूण कमाई ₹१४५.९ कोटी!

Vishal Patole
Mahavatar Narsimha

“धर्माचा रक्षक, अधर्माचा नाशक Mahavatar Narsimha ! भारतीय अ‍ॅनिमेशन विश्वाला नवी उंची देणारा चित्रपट ‘महा अवतार नरसिंह’ २५ जुलै पासून देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या सुरुवातीला केवळ १.७५ करोड रुपयांचा गल्ला गोळा करणाऱ्या या चित्रपटाने हळू हळू प्रगती साधली आहे. पहिल्या आठवड्यात ४४.७५ करोड तर दुसऱ्या आठवड्यात ७३.४ करोड मिळून १६ व्या दिवशी एकूण १४५.९ करोड रुपये कमावले आहेत.एकूण पाच भारतीय भाषेत हा चित्रपट रिलीज केला गेला आहे. त्यापैकी हिंदी भाषेतील रिलीजने सर्वाधिक १०८.६५ करोड रुपये या चित्रपटाला कमावून दिले आहेत तर अन्य लोकल भाषेतील रिलीज जसे कि, कन्नड – ४.०९, तेलगु- ३०.९५ , तमिळ- १.८४ तर मल्याळम- ०.३७ करोड रुपये मिळविण्यात चित्रपटाला मदत केली आहे. याअनोख्या अध्यात्मिक अ‍ॅनिमेशनपटाचा ट्रेलर आणि टीझर अलीकडेच प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळेच अन्य माध्यमातील विशेष प्रचार नसताना या धार्मिक अ‍ॅनिमेशन चित्रपटाने समाज माध्यम व माउथ पब्लिसिटीच्या जोरावर यश मिळविले आहे हे विशेष म्हणावे लागेल.

Mahavatar Narsimha

Mahavatar Narsimha चित्रपटाची वैशिष्ट्ये:


हा चित्रपटअ‍ॅक्शन, अ‍ॅनिमेशन आणि भावनांनी भरलेला आहे. तसेच दैवी शक्ती, श्रद्धा आणि धर्म-अधर्माच्या संघर्षाची गाथा हा चित्रपट अ‍ॅनिमेशनच्या स्वरुपात अत्यंत प्रभावीपणे मांडतो. ‘महा अवतार नरसिंह’ चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केलं असून, क्लीम प्रोडक्शन व KGF, कांतारा फेम होम्बळे फिल्म्स यांनी त्याची निर्मिती केली आहे.

Mahavatar Narsimha हा चित्रपट कन्नड (२D/३D), हिंदी (२D/३D), तमिळ (२D/३D), तेलुगू (२D/३D), मल्याळम (२D/३D) अशा एकूण पाच भाषांमध्ये आणि दोन्ही फॉरमॅट्समध्ये (२D आणि ३D) प्रदर्शित झाला आहे.

Mahavatar Narsimha चित्रपटाची कथा — सत्याची विजयगाथा:


चित्रपटाची कहाणी हिरण्याक्षचा सूड घेण्यासाठी उभा ठाकलेला असुरराज हिरण्यकश्यप आणि भगवंत विष्णूप्रती निष्ठावान असलेला त्याचा (हिरण्यकश्यपचा) मुलगा प्रल्हाद यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. हिरण्यकश्यप स्वतःला देव घोषित करतो, पण प्रल्हाद विष्णूभक्ती पासून हटत नाही. हे पाहून भगवान विष्णू नरसिंह अवतार घेतात — अर्धसिंह, अर्धमानव स्वरूप ! आणि हिरण्यकश्यपचा अंत करून अधर्माचा विनाश करतात. ही कथा धैर्य, भक्ती आणि न्यायाच्या विजयाची एक उत्तम पौराणिक कथा आहे.

उत्पत्ती आणि दिग्दर्शन: Mahavatar Narsimha

हा चित्रपट विष्णु पुराण”, “नरसिंह पुराण” आणि “श्रीमद्भागवत पुराण” यांवर आधारित आहे. अश्विन कुमार यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणात तयार झालेला हा चित्रपट जवळपास ४.५ वर्षांच्या मेहनतीनं साकारण्यात आला. अ‍ॅनिमेशन आणि VFX च्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक कथांचे जागतिक दर्जाचे सादरीकरण करण्याचा हेतू त्यांनी व्यक्त केला आहे.

संगीत:
चित्रपटाला प्रभावी संगीत लाभले आहे. सॅम सी. एस. यांनी संगीत दिलं असून, “Roar of Narsimha” हे पहिले गाणं २५ जूनला आणि संपूर्ण अल्बम ८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला. थिंक म्युझिक इंडिया आणि इष्टार म्युझिक यांनी संगीत हक्क विकत घेतले आहेत.

होम्बळे फिल्म्सचा आणखी एक भव्य प्रकल्प:
होम्बळे फिल्म्स ही KGF, कांटारा, आणि सलार यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करणारी कंपनी आहे. विजय किर्गंदूर आणि चाळुवे गौडा यांनी स्थापन केलेली ही कंपनी आता महा अवतार सिनेमॅटिक युनिव्हर्स सुरू करत आहे आणि महा अवतार नरसिंह ही त्याची पहिली कडी आहे.

दुसऱ्या आठवड्यातील यश पाहून विशेष ट्रेलर रिलीज

“महावतार नरसिंह” च्या निर्मात्यांनी दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कलेक्शनमध्ये अभूतपूर्व वाढ पाहून, एक विशेष यश ट्रेलर रिलीज केला आहे. हा ट्रेलर कथेतले अद्याप न दिसलेले दृश्यमान भाग समोर आणतो आणि प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटाच्या थरारात परत आणण्यास उद्युक्त करतो.

चित्रपटाचा दुसरा आठवडा अत्यंत दमदार गेला — पहिल्या आठवड्याच्या 30 कोटींच्या जवळपास असलेल्या कमाईनंतर दुसऱ्या आठवड्यात त्याने 50 कोटींचे कलेक्शन साध्य केले. या यशामुळे प्रेक्षकांचा उत्साह दिसून येतो आणि त्याचबरोबर वर्ड-ऑफ-माउथचा प्रभावही स्पष्ट होत आहे.

यशाच्या ट्रेलरच्या माध्यमातून निर्माता पक्षाने या गतिमान यशाला बळ आणले असून, अधिकाधिक प्रेक्षकांना थिएटरमध्ये येण्याची प्रेरणा दिली आहे. हा ट्रेलर मूळ कथानकातील भावनिक थर आणि धार्मिक उत्कटता पुन्हा उजागर करतो, ज्यामुळे चित्रपटाची चर्चा पुढेही टिकून राहावी, असे उद्दिष्ट ठोसपणे दिसते.

दुसऱ्या आठवड्यातील अभूतपूर्व यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रदर्शित केलेल्या या विशेष ट्रेलरने चित्रपटाची लोकप्रियता अधिक वाढवली आहे.

विशेष झलक:

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २५ नोव्हेंबर २०२४ रोजी विशेष स्क्रीनिंग
भारतातील अ‍ॅनिमेशन तंत्रज्ञानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारा प्रयोग
भारतीय संस्कृती, पुराण आणि अध्यात्म यांचे आधुनिक आणि भव्य अ‍ॅनिमेटेड चित्रण

‘महा अवतार नरसिंह’ — भारतीय अ‍ॅनिमेशन सिनेमात नवा अध्याय सुरू!

Mahavatar Narsimha मुख्य माहिती:

चित्रपटाचे नाव: महा अवतार नरसिंह
दिग्दर्शक: अश्विन कुमार
संगीतकार: सॅम सी. एस.
प्रदर्शन दिनांक: २५ जुलै २०२५
भाषा: कन्नड (डब केलेल्या भाषा – हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम)
शैली: फँटसी | ३D अ‍ॅनिमेशन | पौराणिक अ‍ॅक्शन-ड्रामा
निर्माते:नरेंद्र देसाई, शिल्पा धवन, कुशल देसाई, चेतन्य देसाई
सह-निर्माते: दुर्गा बलूजा, एस.सी. धवन
कार्यकारी निर्माते: ध्रुवा करुणाकर, समय महाजन
सहयोगी निर्माते: ऋचा अरोरा, ख्रिस्तियन कॅरिलो

तांत्रिक बाजू व क्रू टीम:

संगीत समन्वयक: वेलवन बी
प्रॉडक्शन मॅनेजमेंट टीम: कन्नन एम, इंदुमती के, सत्य मूर्ती
टेक्निकल सहाय्य: पार्थिबन
ध्वनी डिझाईन: करण अर्जुन सिंग, दीप बावा
फोली आर्टिस्ट: करण अर्जुन सिंग, हरीश नाथ, अनिल पवार
फोली इंजिनिअर्स: राम किशन नाथ, सुजित लुहार
साऊंड इफेक्ट्स व अॅम्बियन्स: दीप बावा
मिक्सिंग व मास्टरिंग: बालू थंकेचन
सहाय्यक:पॉल डॅनियल, हरिहरन

एक जागतिक दर्जाचा अ‍ॅनिमेशन प्रकल्प: Mahavatar Narsimha

होम्बळे फिल्म्सने ‘KGF’, ‘कांटारा’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर आता पौराणिक अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ‘महा अवतार नरसिंह’ ही Mahavatar Cinematic Universeची पहिली कडी असून यामधून भारतीय अ‍ॅनिमेशन उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न झाला आहे.

होम्बळे फिल्म्सने चित्रपट रिलीजवेळी समाजमध्यमावर दिलेली प्रतिक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्यब्लॉगपोस्ट :

AI निर्मित रामायण (Ramayan) मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित : सिनेमॅटिक व्हिज्युअल्ससह नव्या युगातील रामकथा!

IBPS PO भरती 2025: IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 5208 जागांसाठी भरती – अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
2 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत