Majhi Ladki Bahin Yojana – राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिनांक ०३-०३-२०२५ रोजी जाहीर केले आहे की, फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी हा जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच ७ मार्च रोजी, पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.

महिलांना दरमहा १,५०० रुपये सन्मान निधी – Majhi Ladki Bahin Yojana
या योजनेअंतर्गत, राज्यातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये सन्मान निधी दिला जातो. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता विलंबित झाल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये चिंता होती. मात्र, महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र शासन श्रीमती आदिती तटकरे यांनी आश्वस्त केले आहे की, आवश्यक तांत्रिक तयारी पूर्ण झाली असून, निधी लवकरच वितरीत केला जाईल. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा सन्मान निधी मिळत असल्याने राज्यभरातील महिलांसाठी हा दिवस अधिक खास ठरणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे.
५ लाख महिला अपात्र – Majhi Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पात्रतेचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत. त्यामुळे, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत २.४६ कोटी महिलांना लाभ मिळाला होता, परंतु अलीकडील तपासणीनंतर ५ लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र, या महिलांकडून यापूर्वी दिलेला सन्मान निधी परत घेतला जाणार नाही, असे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे महिलांच्या सन्मानात वाढ झाली आहे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लागत आहे.
समाज माध्यम साईट “X” वरील महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
ऑस्कर (OSCAR 2025) पुरस्कार सोहळ्यात ‘Anora’ चे वर्चस्व !
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत कार्यकारी पदांसाठी भरती: ऑनलाईन अर्ज सुरू! – IPPB
रेल्वे संरक्षण दल (RPF) SI आणि कॉन्स्टेबल भरती 2024: प्रवेशपत्र जाहीर- RPF Admit Card 2025
