Malegaon Blast Case Update– मालेगाव स्फोट प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. महाराष्ट्र एटीएसचे माजी अधिकारी मेहबूब मुझावर यांनी दावा केला आहे की, त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते. हे प्रकरण पूर्णपणे राजकीय हेतूने चालवले जात होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
“माझ्यावर मोहन भागवत यांना अटक करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. पण मी हे अमानवी आणि गुप्त आदेश पाळण्यास नकार दिला. त्यामुळे माझ्या ४० वर्षांच्या सेवाभरित आयुष्यावर घाला आला,” असे मुझावर यांनी सांगितले.

Malegaon Blast Case Update
महाराष्ट्र एटीएसचे माजी अधिकारी मेहबूब मुझावर यांनी पुढे म्हटले की:
हे आदेश परमबीर सिंग आणि त्याहूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आले होते. मला “सर्व्हिस सिक्रेट फंड”मधून निधी दिला गेला. महाराष्ट्र पोलिसांचे १० अधिकारी या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले. एटीएसकडून अधिकृतपणे मला रिव्हॉल्व्हरही देण्यात आला. मी आदेश न पाळल्यामुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या खुलाशामुळे मालेगाव स्फोट प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप आणि कथित ‘हिंदुत्व दहशतवाद’चा फसवा प्रचार पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
या पार्श्वभूमीवर काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत —
- हे “वरिष्ठ अधिकारी” कोण होते?
- या राजकीय कारस्थानाला संरक्षण देणारे नेते कोण होते?
- संघप्रमुखांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यामागे कोण होते?
ही केवळ एक चौकशी नव्हे, तर देशविरोधी कटकारस्थानाचा भाग होता, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
देशाला आता सत्य हवे आहे — आणि ते पूर्णपणे उघड होईपर्यंत भाजप संघर्ष करत राहणार, असे संकेत पक्षाच्या नेत्यांकडून दिले जात आहेत.
समाज मध्यम साईट “X” वरील भाजपा ची अधिकृत प्रतिक्रिया.
आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :
