MHT CET 2025- महाराष्ट्र शासनाच्या यंदा १२वीत / एच. एस. सी. मध्ये शिकत असलेल्या व येणारे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विविध (इंजिनियरिंग) अभियांत्रिकी/तंत्रज्ञान कोर्सेस/ डिग्री, फार्मसी- डिप्लोमा किंवा डिग्री, बी.प्लॅनिंग, एम.प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) आणि कृषी शिक्षणाच्या (बी.एस.सी. अग्री)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एमएचटी-सीईटी 2025 (MHT-CET 2025) परीक्षा महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Test Cell) आयोजित केली जात असते.
ही परीक्षा महाराष्ट्र राज्यातील तसेच राज्याबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाते. विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा त्यांच्या उच्च शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रवेश प्रक्रियेत ही परीक्षा निर्णायक ठरत असल्याने तिचे अनन्यसाधारण महत्व आहे.
MHT CET 2025 Registration Date
ज्या विद्यार्थ्यांना इंजिनियरिंग, फार्मसी, .प्लॅनिंग, एम.प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) आणि कृषी शिक्षणाच्या (बी.एस.सी. अग्री) इत्यादी अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे केवळ त्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रियाचे नियोजित वेळापत्रक खाली दिले आहे त्याव्यतिरीक उर्वरित अभ्यासक्रमाच्या
| ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात | ३० डिसेंबर २०२४ |
| ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १५ फेब्रुवारी २०२५ |
| लेट फी सह ऑनलाईन अर्ज आणि अर्ज कन्फर्म करणे सुरुवात | १६ फेब्रुवारी २०२५ |
| लेट फी सह ऑनलाईन अर्ज आणि अर्ज कन्फर्म करण्याची शेवटची दिनांक | २२ फेब्रुवारी २०२५ |
| ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची दिनांक | २३ फेब्रुवारी २०२५ |
MHT Cet 2025 Registration अर्जाची नोंदणी: ऑनलाईन माध्यमातूनच होणार.
विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची माहिती म्हणजे या परीक्षेसाठी नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन केवळ ऑनलाईन अर्ज पद्धतीने केल्या जाते ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक अधिकृत वेबसाईट www.mahacet.org वर उपलब्ध करण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता येथे क्लिक करा.
- परीक्षा केंद्रे: महाराष्ट्र व राज्याबाहेरील विविध केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.
- उमेदवारांसाठी सूचना:
- अर्ज भरण्यासाठी आणि माहिती पुस्तिकेसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
- अर्जाची अंतिम मुदत संपण्यापूर्वी अर्ज सादर करावा.

MHT CET 2025 Tentative Schedule
MHT CET 2025 Exam Date- MHT CET 2025 अंतर्गत होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा वेगवेगळ्या तारखांना होणार असून त्यांच्या नोंदणीच्या दिनांक देखील वेगवेगळ्या आहेत.
| अ.क्र. | CET चे नाव | रजिस्ट्रेशन सुरुवातीची दिनांक | नोंदणीची शेवटची दिनांक | नियोजित परीक्षा दिनांक |
| १ | एम. एड. CET- २०२५ | २५-१२-२०२४ | २५-०१-२०२५ | १९ मार्च २०२५, |
| २ | एम. पी. एड. – CET-२०२५ | २५-१२-२०२४ | २५-०१-२०२५ | १९ मार्च २०२५, |
| ३ | एम. पी. एड. – फिल्ड टेस्ट ऑफलाईन | NA | NA | २० मार्च २०२५, २१ मार्च २०२५ |
| ४ | एम. बी. ए. / एम. एम. एस. CET- २०२५ | २५-१२-२०२४ | २५-०१-२०२५ | १ एप्रिल २०२५, २ एप्रिल २०२५, ३ एप्रिल २०२५, |
| ५ | एल.एल.बी. – ३ वर्षे CET- २०२५ | २७-१२-२०२४ | २७-०१-२०२५ | २० मार्च २०२५, २१ मार्च २०२५, |
| ६ | एम. सी. ए. CET- २०२५ | २५-१२-२०२४ | २५-०१-२०२५ | २३ मार्च २०२५, रविवार |
| ७ | बि.एड. (जनरल आणि स्पेशल) आणि बि. एड. (ELCT) CET- २०२५ | २८-१२-२०२४ | २८-०१-२०२५ | २४ मार्च २०२५ २५ मार्च २०२५ २६ मार्च २०२५, |
| ८ | बि.पी. एड. CET- २०२५ बि.पी. एड. फिल्ड टेस्ट ऑफलाईन | ३१-१२-२०२४ | ३१-०१-२०२५ | २७ मार्च २०२५, २८ मार्च २०२५ ते ०२ एप्रिल २०२५ |
| ९ | एम. एच. एम.सी.टी. CET- २०२५ | ०४-०१-२०२५ | २०-०१-२०२५ | २७ मार्च २०२५ |
| १० | बि. एच. एम. सी.टी./ एम. एच. एम. सी.टी इंटिग्रेटेड CET- २०२५ | ३१-१२-२०२४ | १५-०१-२०२५ | २८ मार्च २०२५, |
| ११ | बि. ए. बि. एड. / बि. एस. सी. बि. एड. (चार वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) CET- २०२५ | ०४-०१-२०२५ | ०४-०२-२०२५ | २८ मार्च २०२५, |
| १२ | बि. एड. / एम. एड. (३ वर्षे इंटिग्रेटेड कोर्स) CET- २०२५ | ०६-०१-२०२५ | ०६-०२-२०२५ | २८ मार्च २०२५, |
| १३ | बि. डिझाईन CET- २०२५ | ०४-०१-२०२५ | २७*-०१-२०२५ | २९ मार्च २०२५, |
| १४ | बि. बिबिए / बि.सी. ए. / बिबिएम./ बि.एम.एस. CET- २०२५ | ०२-०१-२०२५ | १०-०२-२०२५ | २९ एप्रिल २०२५, ३० एप्रिल २०२५, २ मे २०२५, |
| १५ | एल.एल.बी. (५ वर्षे) CET- २०२५ | ०३-०१-२०२५ | ०३-०२-२०२५ | २८ एप्रिल २०२५, |
| १६ | ए.ए.सी. CET- २०२५ | तूर्तास उपलब्ध नाही | तूर्तास उपलब्ध नाही | ५ एप्रिल २०२५, |
| १७ | नर्सिंग CET- २०२५ | तूर्तास उपलब्ध नाही | तूर्तास उपलब्ध नाही | ७ एप्रिल २०२५, ८ एप्रिल २०२५, |
| १८ | डीपिएन/ पी.एच. एन. CET- २०२५ | तूर्तास उपलब्ध नाही | तूर्तास उपलब्ध नाही | ८ एप्रिल २०२५, |
| १९ | एम. एच. टी. CET- २०२५ (पी.सी.बी. ग्रुप) | ३०-१२-२०२४ | १५-०२-२०२५ | ९ एप्रिल २०२५, ते १७ एप्रिल २०२५, (१० आणि १४ एप्रिल २०२५ सोडून) |
| २० | एम. एच. टी. CET- २०२५ (पी.सी.एम . ग्रुप) | ३०-१२-२०२४ | १५-०२-२०२५ | १९ एप्रिल २०२५, ते २७ एप्रिल २०२५, (२४ एप्रिल २०२५ सोडून) |
MAH-MBA/MMS-CET-2025 परीक्षा फी
| १. महाराष्ट्र राज्यातील ओपन श्रेणीचे अर्जदार, २. महाराष्ट्र राज्याबाहेरील (OMS)/ ३. अन्य भारतीय अर्जदार आणि J&K स्थलांतरित अर्जदार यांच्यासाठी CET शुल्क: | परीक्षा फी – १२०० रुपये |
| १) मागासवर्गीय – SC, ST, VJ/DT- NT (A), NT-1 (B), NT-2 (C), NT-3 (D), OBC, SEBC, EWS आणि SBC श्रेणी): महाराष्ट्र राज्यातील फक्त त्याच अर्जदारांना, ज्यांच्याकडे वैध जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आहे आणि त्यांच्याकडे वैध (31 मार्च 2026 पर्यंत वैध) नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र आहे. त्यांच्यासाठी CET शुल्क: | परीक्षा फी – १००० रुपये |
| फक्त महाराष्ट्र राज्यातील: अनाथ, ट्रांसजेंडर आणि PWD (व्यक्तिगत दिव्यांग) अर्जदारांसाठी, CET शुल्क: | परीक्षा फी – १००० रुपये |
MHT CET 2025 परीक्षा केंद्रे
CET परीक्षा महाराष्ट्र राज्यभर विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाईल.
MHT CET 2025 परीक्षा 2025-26 साठी आवश्यक दस्तऐवज
महाराष्ट्रातील MHT CET 2025 परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांना खालील दस्तऐवजांची आवश्यकता असते-
शैक्षणिक दस्तऐवज:
- इयत्ता १० वी चे मार्कशिट आणि प्रमाणपत्र
- इयत्ता १२ वी चे मार्कशिट आणि प्रमाणपत्र
- पदवीचे प्रमाणपत्र (अर्जदाराने संबंधित प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास)
- टी. सी. / बोनाफाईड
ओळखपत्र:
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र (Voter ID)
- पासपोर्ट
- ड्रायविंग लायसन्स
जात प्रमाणपत्र (अर्जदाराच्या परिस्थितीनुसार):
- सक्षम प्राधिकरणाद्वारे जारी केलेले वैध जात प्रमाणपत्र
- मागासवर्गीय उमेदवारांनी जात पडताळणी प्रमाणपत्र काढून ठेवावे अथवा जात पडताळणी अर्ज करून त्याची पावती CETअर्ज करण्याअगोदर तयार ठेवावी.
- ओबीसी उमेदवारांसाठी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र आवश्यक.
निवास प्रमाणपत्र:
- महाराष्ट्र राज्यातील निवासी असल्याचा पुरावा- डोमिसाईल प्रमाणपत्र
अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र:
- योग्य आकारातील नवीन छायाचित्र
स्वाक्षरी:
- निर्दिष्ट केलेल्या स्वरूपात स्कॅन केलेली स्वाक्षरी
इमेल आय डी
- स्वत:चा कायमस्वरूपी इमेल आय डी – भविष्यातील परीक्षेसंदर्भातील माहितीसाठी जसे कि- प्रवेशपत्र, परीक्षा दिनांक, निकाल किंवा इतर फेरबदल इत्यादी माहिती मिळणे करिता आवश्यक
मोबाईल
- ओ टी पी साठी तसेच भविष्यातील परीक्षेसंदर्भातील माहितीसाठी जसे कि- प्रवेशपत्र, परीक्षा दिनांक, निकाल किंवा इतर फेरबदल इत्यादी माहिती मिळणे करिता आवश्यक म्हणून कायमस्वरूपी चालू मोबाईल नंबर असावा.
महत्त्वाचे मुद्दे:
- आधिकारिक सूचना तपासा: उमेदवाराने अर्ज करताना नेहमीच CET सेल द्वारे वेळोवेळी जारी केलेल्या ताज्या सूचनांची माहिती वाचत राहिली पाहिजे.
- डिजिटल प्रत copy: अनेक अर्जांमध्ये दस्तऐवजांची स्कॅन केलेली प्रत आवश्यक असते.
- सुसंगत माहिती: अर्जाच्या प्रत्येक तपशिलाची माहिती योग्य असल्याची खात्री करा, ज्यामुळे कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
अर्ज प्रक्रिया यथासांग पार पाडण्यासाठी, सर्व दस्तऐवज वेळेवर तयार ठेवून अर्ज करावा.
निष्कर्ष:
राज्य सामान्य प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबईच्या मार्गदर्शनाखाली घेतली जाणारी MHT CET 2025 परीक्षा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. योग्य वेळेत अर्ज नोंदणी करून आणि मार्गदर्शनानुसार तयारी करून विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घ्यावा.
विद्यार्थ्यांना आवाहन
संबंधित सर्व विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था आणि संबंधित घटकांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. एमएचटी-सीईटी 2025- MHT CET 2025 परीक्षा ही व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
