महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत ३४ संवर्गांतील पदांसाठी सरळसेवा भरती 2023 च्या लेखी (ऑनलाईन) परीक्षेचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत काही पदांसाठी परीक्षा याआधीच पार पडली असून, उर्वरित २३ संवर्गांतील पदांसाठी परीक्षा 10 जुलै ते 10 ऑगस्ट 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. संबंधित परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच जाहीर केले जाणार आहेत.

MIDC सरळसेवा भरती २०२३ लेटेस्ट अपडेट
MIDC सरळसेवा भरती २०२३ महत्त्वाचे ठळक मुद्दे:
- जाहिरात प्रसिद्धीची तारीख: 14 ऑगस्ट 2023
- ऑनलाइन अर्ज कालावधी: 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2023
- एकूण पदसंख्या: ३४ संवर्गांतील विविध पदे
- परीक्षा कालावधी: 10 जुलै 2025 ते 10 ऑगस्ट 2025
निवड निवड प्रक्रियेनुसार विविध पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे नियोजित वेळापत्रक:
10 जुलै 2025:
- लिपिक टंकलेखक (गट क)
- चालक यंत्र चालक (गट क)
- लघुटंकलेखक (गट क)
- लघुलेखक (निचली श्रेणी) (गट क)
- क्षेत्र व्यवस्थापक (गट ब)
- सहायक (गट क)
- पंपचालक (श्रेणी 2) (गट क)
06 ऑगस्ट 2025:
- भूमापक (गट क)
- वीजतंत्री (श्रेणी 2) (गट क)
- जोडारी (श्रेणी 2) (गट क)
- सहायक आरेखक (गट क)
- अनुरेखक (गट क)
- गाळणी निरीक्षक (गट क)
- अग्निशमन विमोचक (गट क)
- वीजतंत्री – ऑटोमोबाईल (गट क)
08 ऑगस्ट 2025:
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट क)
- तांत्रिक सहायक (श्रेणी 2) (गट क)
09 ऑगस्ट 2025:
- उप अभियंता (सिव्हिल/मेकॅनिकल) (गट अ)
- सहायक अभियंता (सिव्हिल/मेकॅनिकल) (गट ब)
- उपमुख्य लेखा अधिकारी (गट अ)
- विभागीय अग्निशमन अधिकारी (गट अ)
- सहायक अग्निशमन अधिकारी (गट क)
- वरिष्ठ लेखापाल (गट क)
- लेखा अधिकारी (गट ब)
10 ऑगस्ट 2025:
- सहायक अभियंता (स्थापत्य) (गट ब)
- सहायक वास्तुशास्त्रज्ञ (गट ब)
- कनिष्ठ संचार अधिकारी (गट क)
प्रवेशपत्र (Hall Ticket) माहिती:
- परीक्षेस पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र परीक्षा दिनांकाच्या किमान 7 दिवस आधी MIDC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल.
- प्रवेशपत्रासाठी संकेतस्थळ: 👉 https://www.midcindia.org
- उमेदवारांनी आपले अर्ज क्रमांक व पासवर्ड वापरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
- परीक्षेचे केंद्र व वेळ प्रवेशपत्रावर नमूद असेल; उमेदवारांनी परीक्षा वेळेपुर्वी केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे.
सूचना व मार्गदर्शक तत्त्वे:
- निवडलेल्या केंद्राची हमी नाही; केंद्र बदल होऊ शकतो.
- प्रवेशपत्र व माहितीपुस्तिका यामधील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व पालन करावे.
- परीक्षेसाठी फोटो आयडी सोबत अनिवार्य आहे.
सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा!
पुढील अपडेटसाठी MIDC च्या अधिकृत वेबसाइटला नियमित भेट द्या.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
IGR Maharashtra Hall Ticket 2025: नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाई भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
भारतीय सैन्य भरती 2025-26 : कॉमन एन्ट्रन्स परीक्षा (CEE) चे ॲडमिट कार्ड जाहीर- Agniveer Admit Card
