MPSC Group B Bharti 2026 : महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Maharashtra Public Service Commission (MPSC) मार्फत “महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026” साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 552 पदे भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.

MPSC Group B – भरतीची प्रमुख माहिती
- जाहिरात क्रमांक: 011/2026
- एकूण पदसंख्या: 552
- परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
- नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
- परीक्षा केंद्र: राज्यातील 37 जिल्ह्यांमध्ये
MPSC Group B पदनिहाय रिक्त जागा, पात्रता, महत्वाच्या तारखा व इतर तपशील
| पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | सहायक कक्ष अधिकारी (ASO) | 06 |
| 2 | राज्य कर निरीक्षक (STI) | 236 |
| 3 | पोलीस उपनिरीक्षक (PSI) | 310 |
| एकूण | 552 |
शैक्षणिक पात्रता
- सहायक कक्ष अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवीधर
- राज्य कर निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवीधर
- पोलीस उपनिरीक्षक:
- पदवीधर
- उंची: पुरुष – 165 सेमी, महिला – 157 सेमी
- छाती (पुरुष): 79 सेमी
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2026 रोजी)
- ASO / STI: 18 ते 38 वर्षे
- PSI: 19 ते 31 वर्षे
- मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ: 5 वर्षांची सवलत
अर्ज फी
- खुला प्रवर्ग: ₹394/-
- मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ: ₹294/-
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2026
- पूर्व परीक्षा: 14 जून 2026
MPSC Group B अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा:
- Apply Online: https://mpsconline.gov.in/candidate
- अधिकृत वेबसाइट: https://mpsc.gov.in/home
भरतीचे महत्त्व
ही परीक्षा राज्यातील प्रशासन, कर विभाग आणि पोलीस दलात अधिकारी होण्याची संधी देते. विशेषतः PSI पदासाठी शारीरिक पात्रतेची अट असल्यामुळे उमेदवारांनी शारीरिक तयारीसह अभ्यासावर भर देणे आवश्यक आहे. सविस्तर जाहिरातीसाठी अधिकृत वेबसाईट वरील जाहिरात पहावी.
अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
