पंतप्रधान मोदींना सायप्रसने आणखी एका जागतिक सन्मानाने गौरवले: भारतासाठी अभिमानाचा क्षण- (Narendra Modi)

Vishal Patole
Narendra Modi
Narendra Modi

G7 देशांच्या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या तीन देशांच्या दौर्‍यादरम्यान सायप्रस देशाला भेट दिली. गेल्या २३ वर्षांमध्ये कोणत्याही भारतीय पंतप्रधानाची ही सायप्रसला पहिलीच भेट ठरली आहे.

Contents

सायप्रसचे राष्ट्रपती महामहीम निकोस ख्रिस्तोडूलिडीस यांनी आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान — “ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III” प्रदान केला.

१. १४० कोटी भारतीय नागरिकांच्या वतीने हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदी यांनी सायप्रसचे राष्ट्रपती, सरकार आणि जनतेचे मन:पूर्वक आभार मानले.

२. हा पुरस्कार भारत आणि सायप्रस यांच्यातील दीर्घकाळापासून असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना समर्पित करत त्यांनी सांगितले की हे संबंध परस्पर विश्वास आणि समान मूल्यांवर आधारित आहेत.

३. पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, हा सन्मान भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ — ‘संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे’ — या शतकानुशतकांपासून चालत आलेल्या तत्त्वज्ञानाची मान्यता आहे, जे जागतिक शांतता आणि प्रगतीसाठी भारताच्या दृष्टिकोनाचे मार्गदर्शन करते.

४. पंतप्रधान मोदी यांनी या पुरस्काराला भारत-सायप्रस भागीदारी बळकट करण्याची आणि त्यात नवनवीन विविधता आणण्याची एक नव्याने बांधिलकी मानली आहे.

५. या पुरस्काराद्वारे शांतता, सुरक्षितता, सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि समृद्धीसाठी दोन्ही देशांची कटिबद्धता अधोरेखित होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोदींना यापूर्वी मिळालेले एकूण जागतिक सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ प्रदान

दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी, कुवेतने पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान (Narendra Modi) यांना त्यांच्या भारत आणि कुवेत यांच्यातील दृढ मैत्रीचे प्रतीक म्हणून कुवेतच्या ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ या सर्वोच्च सन्मानाने गौरवले आहे. रविवारी कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांनी पंतप्रधान मोदींना हा प्रतिष्ठित नाइटहूड ऑर्डर प्रदान केला.

‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ हा कुवेतचा सर्वोच्च सन्मान आहे जो देशाच्या प्रमुखांनाच तसेच परदेशी सार्वभौम आणि राजघराण्यांच्या सदस्यांना दिला जातो. पंतप्रधान मोदींनी या पुरस्काराबद्दल कुवेतच्या शाही कुटुंबाचे आभार मानले आणि हा सन्मान भारतातील लोकांना समर्पित केला.

Narendra Modi)

पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 20 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. यापूर्वी या पुरस्काराने अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांसारख्या मोठ्या नेत्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

कुवेतचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ मिळाल्यावर समाज माध्यम “X” वरील मोदींची प्रतिक्रिया

तसेच, गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींना गयानाचे सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ने सन्मानित केले होते.

कुवेत अगोदर Narendra Modi– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना सरकारने नुकताच ‘ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान केला आहे. गयाना दौऱ्यावर असतना पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. इरफान अली यांच्या हस्ते दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी दिला गेला. हा सन्मान त्यांच्या जागतिक सेवा, राजकीय कर्तृत्व आणि भारत-गयाना संबंधांना मजबूती देण्याच्या प्रयत्नांसाठी दिला गेला आहे.

नुकतेच गयाना व्यतिरिक्त डोमिनिका आणि बार्बाडोस या देशांनी मोदींना दिला त्यांच्या देशातील सर्वोच्च पुरस्कार

डोमिनिका या देशाने पंतप्रधान मोदींना ‘अवॉर्ड ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. पंतप्रधान मोदींनी ‘डॉमिनिका पुरस्कार ऑफ ऑनर’ स्वीकारताना सांगितले, “हा पुरस्कार मी अत्यंत विनम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारतो. मी हा पुरस्कार माझ्या अनिवासी भारतीय नागरिकांना समर्पित करतो, जे नेहमीच डॉमिनिका या राष्ट्रासोबत भारताच्या मैत्रीला महत्त्व देतात.”

गयाना आणि डोमिनिका व्यतिरिक्त बार्बाडोसने देखील पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ फ्रीडम’ हा बार्बाडोसचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला. हा पुरस्कार विशेषतः परदेशी नेत्यांना दिला जातो, आणि भारत-बार्बाडोस यांच्यातील घनिष्ठ संबंधाचे प्रतीक आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावर एक प्रभावशाली आणि नेत्याच्या रूपात ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वामुळे भारताला जागतिक पातळीवर एक महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदानामुळे पंतप्रधान मोदींना अनेक देशांकडून विविध उच्चतम नागरी सन्मान प्राप्त झाले आहेत. या सन्मानांनी मोदींच्या नेतृत्वाची आणि भारताच्या जागतिक प्रभावाची दखल घेतली आहे.

Narendra Modi

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या विविध राज्य सन्मानांचा तपशीलवार आढावा घेतल्यास, त्यांचे जागतिक पातळीवरचे स्थान अधिक स्पष्ट होते.

Narendra Modi यांना ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीझ (साउदी अरेबिया)

ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीझ (साउदी अरेबिया) – 3 एप्रिल 2016
साउदी अरेबियाने दिनांक 3 एप्रिल 2016 पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीझ’ सन्मान दिला, जो साउदी अरेबियाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताच्या मध्य-पूर्व देशांसोबत वाढलेल्या राजनैतिक, व्यापारिक आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याचे प्रतीक आहे.

स्टेट ऑर्डर ऑफ घाजी आमिर अमानुल्ला खान या पुरस्काराने अफगाणिस्तानने २०१६ मध्ये Narendra Modi यांना सन्मानित केले.

स्टेट ऑर्डर ऑफ घाजी आमिर अमानुल्ला खान (अफगाणिस्तान) – 4 जून 2016
अफगाणिस्तानाने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ घाजी आमिर अमानुल्ला खान’ हा सर्वोच्च नागरी सन्मान दि 4 जून 2016 रोजी दिला. हा पुरस्कार अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्यांना दिला जातो. मोदींच्या नेतृत्वात भारताने अफगाणिस्तानच्या पुनर्निर्माणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार केली आहे.

ऑर्डर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन हा पुरस्कार Narendra Modi यांना (पॅलेस्टाईन) ने २०१८ साली दिला

ऑर्डर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन (पॅलेस्टाईन) – 10 फेब्रुवारी 2018
पॅलेस्टाईनने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन’ दि 10 फेब्रुवारी 2018 रोजी प्रदान केला, जो पॅलेस्टाईनचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून पॅलेस्टाईनने मोदींच्या नेतृत्वाखाली भारताच्या मध्य-पूर्वातील भूमिका आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षासाठी दिलेल्या समर्थनाचे कौतुक केले.

ऑर्डर ऑफ इज्जुद्दीन हा मालदीवचा सर्वोच्च पुरस्कार Narendra Modi यांना २०१९ मध्ये मिळाला

ऑर्डर ऑफ इज्जुद्दीन (मालदीव) – 8 जून 2019
मालदीवने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ इज्जुद्दीन’ हा सन्मान २०१९ मध्ये, दि 8 जून 2019 रोजी प्रदान केला. हा सन्मान मालदीवचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि परदेशी नेत्यांना दिला जातो. मोदींच्या नेतृत्वात भारत-मालदीव संबंध अधिक दृढ झाले आहेत, विशेषतः समुद्रसुरक्षा, पर्यटन आणि वाणिज्य क्षेत्रात.

ऑर्डर ऑफ झायद हा संयुक्त अरब अमिराती देशाचा सर्वोच्च सन्मान Narendra Modi यांना दिला गेला

ऑर्डर ऑफ झायद (संयुक्त अरब अमिराती) – 24 ऑगस्ट 2019
संयुक्त अरब अमिरातीने २०१९ मध्ये, दि. 24 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ झायद’ सन्मान प्रदान केला. हा UAE चा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो भारत आणि UAE यांच्यातील सखोल आर्थिक आणि राजनैतिक संबंधांचे प्रतीक आहे.

Narendra Modi – ऑर्डर ऑफ द रिनेसन्स (बहरीन)

ऑर्डर ऑफ द रिनेसन्स (बहरीन) – 24 ऑगस्ट 2019
बहरीनने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द रिनेसन्स’ या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले. भारत आणि बहरीन यांच्यातील सामरिक आणि आर्थिक संबंधांचे महत्त्व या पुरस्कारात प्रकट झाले आहे.

संयुक्त राज्य अमेरिकेचा सर्वोच्च सन्मान लेजियन ऑफ मॅरिट Narendra Modi यांना 21 डिसेंबर 2020 रोजी प्राप्त झाला

लेजियन ऑफ मॅरिट (संयुक्त राज्य अमेरिका) – 21 डिसेंबर 2020
अमेरिकेने २०२० मध्ये पंतप्रधान मोदींना ‘लेजियन ऑफ मॅरिट’ या सर्वोच्च सन्मानाने गौरवले. हा सन्मान अमेरिका-भारत संबंधांच्या वृद्धीचे प्रतीक आहे. भारताने अमेरिका आणि भारताच्या सामरिक आणि व्यापारिक संबंधात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्यासाठी मोदींना हा पुरस्कार प्राप्त झाला.

Narendra Modi यांना ऑर्डर ऑफ फिजी दि. 22 मे 2023 रोजी फिजी देशाने प्रदान केला

ऑर्डर ऑफ फिजी (फिजी) – 22 मे 2023
फिजीने २०२३ मध्ये पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ फिजी’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. हा सन्मान भारत आणि फिजी यांच्यातील सखोल सांस्कृतिक, वाणिज्यिक आणि पर्यावरणीय सहकार्याचे प्रतीक आहे.

पापुआ न्यू गिनी या देशाने त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ लॉगोहु मोदींना (Narendra Modi ) प्रदान केला.

ऑर्डर ऑफ लॉगोहु (पापुआ न्यू गिनी) – 22 मे 2023
पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ लॉगोहु’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने २०२३ मध्ये गौरवले. हा सन्मान पापुआ न्यू गिनी आणि भारत यांच्यातील राजनैतिक, आर्थिक, आणि सामरिक संबंधांच्या वृद्धीचे प्रतीक आहे.

ऑर्डर ऑफ द नाइल हा इजिप्तचा सरोच्च पुरस्कार Narendra Modi यांना २०२३ मध्ये मिळाला.

ऑर्डर ऑफ द नाइल (मिसर) – 25 जून 2023
मिसरने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द नाइल’ हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला. हा सन्मान भारत आणि मिसर यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहे, आणि मोदींनी मिसरसोबत असलेल्या व्यापार, ऊर्जा आणि सांस्कृतिक सहकार्याचे महत्त्व वृद्धिंगत केले आहे.

फ्रान्सने आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार लेजियन ऑफ ऑनर Narendra Modi यांना २०२३ मध्ये प्रदान केला.

लेजियन ऑफ ऑनर (फ्रान्स) – 14 जुलै 2023
फ्रान्सने २०२३ मध्ये पंतप्रधान मोदींना ‘लेजियन ऑफ ऑनर’ सन्मान दिला. हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो परदेशी नेत्यांना दिला जातो. भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण, ऊर्जा आणि विज्ञान क्षेत्रातील सहकार्यामुळे मोदींना हा सन्मान मिळाला.

ऑर्डर ऑफ ऑनर हा सन्मान ग्रीसने Narendra Modi यांना प्रदान केला.

ऑर्डर ऑफ ऑनर (ग्रीस) – 25 ऑगस्ट 2023
ग्रीसने २०२३ मध्ये पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ ऑनर’ हा सन्मान प्रदान केला. हा सन्मान ग्रीसचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. भारत आणि ग्रीस यांच्यात सांस्कृतिक आणि व्यापारिक संबंधांचे महत्त्व या पुरस्कारात स्पष्ट झाले आहे.

ऑर्डर ऑफ द ड्रॅगन किंग (भूतान)

भूतान ऑर्डर ऑफ द ड्रॅगन किंग (भूतान) – 22 मार्च 2024
भूतानने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द ड्रॅगन किंग’ हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला. हा पुरस्कार भूतानच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योगदानाची मान्यता आहे, आणि भारत-भूतान संबंधांच्या वृद्धीचे प्रतीक मानला जातो.

ऑर्डर ऑफ सेंट एंड्र्यू हा रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार Narendra Modi यांना प्रदान

ऑर्डर ऑफ सेंट एंड्र्यू (रशिया) – 9 जुलै 2024
रशियाने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू’ हा सर्वोच्च नागरी सन्मान २०२४ मध्ये दिला. भारत-रशिया संबंध आणि मोदींच्या नेतृत्वाच्या दृषटिकोनातून हा सन्मान दिला गेला.

Narendra Modi यांना दि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी ऑर्डर ऑफ द नायजर हा नायजेरियाचा सर्वोच्च सन्मान मिळाला.

ऑर्डर ऑफ द नायजर (नायजेरिया) – 17 नोव्हेंबर 2024
नायजेरियाने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द नायजर’ हा सर्वोच्च सन्मान दिला. हा पुरस्कार नायजेरियाच्या जागतिक पातळीवरील योगदानाची मान्यता आहे, आणि भारत-नायजेरिया संबंधांच्या वृद्धीचे प्रतीक आहे.

डोमिनिकाचा अवॉर्ड ऑफ ऑनर हा डोमिनिका देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार Narendra Modi यांना दि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदान केला गेला.

डोमिनिकाचा अवॉर्ड ऑफ ऑनर (डोमिनिका) – 20 नोव्हेंबर 2024
डोमिनिकाने पंतप्रधान मोदींना ‘अवॉर्ड ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. या पुरस्काराद्वारे डोमिनिकाने भारताच्या जागतिक नेतृत्वाचे आणि मोदींच्या कार्याचे कौतुक केले.

ऑर्डर ऑफ एक्सलेन्स हा आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार गयाना देशाने Narendra Modi यांना दि २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदान केला.

ऑर्डर ऑफ एक्सलेन्स (गयाना) – 20 नोव्हेंबर 2024
गयाना सरकारने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ एक्सलेन्स’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. हा सन्मान गयाना आणि भारत यांच्यातील सखोल आणि दीर्घकालीन संबंधांचे प्रतीक आहे.

ऑर्डर ऑफ फ्रीडम (बार्बाडोस) पुरस्कार Narendra Modi यांना प्रदान.

ऑर्डर ऑफ फ्रीडम (बार्बाडोस) – 20 नोव्हेंबर 2024
बार्बाडोसने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ फ्रीडम’ हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला. हा पुरस्कार विशेषतः परदेशी नेत्यांना दिला जातो, आणि भारत-बार्बाडोस यांच्यातील घनिष्ठ संबंधाचे प्रतीक आहे.

ऑर्डर ऑफ स्टार & कि ऑफ द इंडियन ओशियन – मौरीशस

ऑर्डर ऑफ स्टार & कि ऑफ द इंडियन ओशियन (Order of the Star and Key of the Indian Ocean) मौरीशस – 11 मार्च 2025

हा मौरीशस देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. दि ११ मार्च २०२५ रोजी मौरीशसच्या दौऱ्यावर असताना भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना मौरीशस ची राजधानी असलेल्या पोर्ट लुईस याठिकाणी विशिष्ट कार्यक्रमात मौरीशसचे राष्ट्रपती श्री धरम गोकुळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

श्रीलंका मित्र विभूषण – श्रीलंका

श्रीलंका मित्र विभूषण- (श्रीलंका) 5 एप्रिल 2025

श्रीलंकेचे राष्ट्रपती श्री अनुरा कुमारा दिस्सानायके यांच्या हस्ते श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो याठिकाणी विशेष समारंभात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना दि. ५ एप्रिल २०२५ रोजी श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार “श्रीलंका मित्र विभूषण” (Sri Lanka Mitra Vibhushana) देऊन सन्मानित केले गेले आहे.

ऑर्डर ऑफ मकारिओस -३ – सायप्रस

ऑर्डर ऑफ मकारिओस -३ – सायप्रस – 16 जून 2025

नुकतेच सायप्रस देशाच्या दौऱ्यावर असताना भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना दि १६ जून २०२५ रोजी सायप्रसचे राष्ट्रपती श्री निकोस ख्रिस्तोडौलीडस यांनी सायप्रस देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला ऑर्डर ऑफ मकारिओस -३ (Order of Makarios III) देऊन संपूर्ण भारताला गौरवान्वित केले आहे.

निष्कर्ष


पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध देशांकडून मिळालेल्या या प्रतिष्ठित सन्मानांमुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रभावाचा आणि नेतृत्वाच्या सामर्थ्याचा आदर व्यक्त झाला आहे. प्रत्येक सन्मान हा भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा, आणि पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीने व नेतृत्वाच्या कार्यक्षमता दर्शवतो. मोदींच्या पुढील कार्यक्षेत्रातील आव्हानांवर विजय मिळवण्याच्या दिशेने हे सर्वच सन्मान एक प्रेरणा बनतील.

सायप्रस देशाचा दौरा आणि मोदींचा समाज माध्यमावर व्हिडीओ.

आमचे अन्य ब्लॉग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक ३ देशांचा दौरा सुरु; २३ वर्षांनी सायप्रसला भेट- Cyprus, Canada, Croatia, G7

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत