राष्ट्रीय NEET (UG) 2025 चा निकाल आणि  आकडेवारी जाहीर – परीक्षार्थी, पात्रता व नोंदणीबाबत महत्त्वाची माहिती – NEET 2025

Vishal Patole
NEET 2025

NEET 2025 – राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) NEET (UG) 2025 परीक्षेसंबंधीचा निकाल आणि महत्त्वपूर्ण आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. या वर्षीही ही परीक्षा देशभरातून तसेच परदेशातून लाखो विद्यार्थ्यांनी दिली असून, विविध भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या निकालाची लिंक तसेच परीक्षार्थींची संख्या, पात्र उमेदवार, भाषा, लिंग, श्रेणी आणि राज्यवार संख्येचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.

NEET 2025

NEET 2025 निकाल

मेडिकल- वैद्यकीय विज्ञान शी संबंधित अभ्यासक्रम जसे कि, – B.Sc. (H) Nursing, BVSc & AH (पशुवैद्यकीय शिक्षण – 15% VCI कोटा), BAMS, BUMS, BSMS (NCISM अंतर्गत) आणि BHMS (NCH अंतर्गत)– यासाठी AACCC (All India Ayush Central Counselling Committee) ही सल्लागार संस्था असणार. प्रवेशासाठी आवश्यक असलेली प्रवेशपरीक्षा म्हणजे नीट परीक्षा होय. २०२५ च्या नीट परीक्षांचा चा निकाल दि १४ जून २०२५ जाहीर केला गेला आहे.

ऑनलाईन NEET २०२५ चा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

NEET 2025 चे टॉपर्स

राजस्थान चा महेश कुमार याने संपूर्ण भारतातून NEET 2025 ची एकूण व ओपन मेरीट मधील पहिली रँक पटकावली आहे तर मध्यप्रदेश चा उत्कर्ष अवधिया याने देशातून दुसरी रँक मिळवली आहे. नीट २०२५ मध्ये देशातून तिसरा (रँक३) येणारा कृष्णा जोशी महाराष्ट्रातून प्रथम आला आहे. ओ बी सी प्रवर्गात राजस्थान राज्याचा तनय पहिला (देशातून NEET 2025 ची १३ वी रँक) आला आहे तर दिल्ली चा गौरव यादव (देशातून २३ वी रँक ) ओ बी सी मधून दुसऱ्या स्थानावर राहिला तर राजस्थानचाच दौलतसिंग गुर्जर (देशातून २४ वी रँक) हा ओ बी सी प्रवर्गात तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. एस सी प्रवर्गातून पहिला येणारा उत्तरप्रदेशचा आयुष गौतम याला देशातून ५३ वी रँक मिळाली आहे. ई डब्ल्यू एस प्रवर्गात हरयाणा चा कवीश याला देशातून ३५ वी रँक मिळाली आहे. एस टी प्रवर्गात प्रथम आलेला राजस्थानचा निशांत कुमार मीना याला देशातून NEET 2025 ची १९७ वी रँक मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे.

दिल्लीची अविका अग्रवाल हि महिलांमधून प्रथम आली व तिला देशातून NEET 2025 ची ५ वी रँक मिळविण्यात यश आले आहे. तर दिलीचीच आशी सिंग हि महिलांमधून द्वितीय तर तिला देशातून १२ वी रँक मिळाली आहे.

दिव्यांग प्रवर्गात प्रथम आलेला कर्नाटकचा गौतम कुमार एस. (ओ बी सी ) याला देशातून १२ वी रँक मिळाली आहे

नोंदणी आणि पात्रतेबाबत एकूण आकडेवारी (2024 व 2025)

  • 2024 मध्ये एकूण नोंदणी: 24,06,079
  • 2025 मध्ये एकूण नोंदणी: 22,76,069
  • 2025 मध्ये पात्र ठरलेले उमेदवार: 12,36,531

 राष्ट्रीयत्वानुसार नोंदणी आणि पात्रता (2025)

  • भारतीय विद्यार्थी: 22,73,528 नोंदणीकृत, 12,34,991 पात्र
  • विदेशी नागरिक: 939 नोंदणीकृत, 529 पात्र
  • NRI विद्यार्थी: 741 नोंदणीकृत, 405 पात्र
  • OCI विद्यार्थी: 861 नोंदणीकृत, 606 पात्र

भाषेनुसार नोंदणी (NEET 2025)

  • इंग्रजी: 18,22,410
  • हिंदी: 3,28,634
  • मराठी: केवळ 927 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली (2023 मध्ये ही संख्या 1,833 होती)
  • तामिळ, गुजराती, बंगाली, तेलगू, उर्दू आदी भाषांमध्येही विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

लिंगानुसार परीक्षार्थींची संख्या (NEET 2025)

  • पुरुष: 9,65,996 नोंदणी, 5,14,063 पात्र
  • महिला: 13,10,062 नोंदणी, 7,22,462 पात्र
  • तृतीयपंथी: 11 नोंदणी, 6 पात्र

 श्रेणीवार पात्र उमेदवारांची संख्या (NEET 2025)

  • OBC: 9,48,507 नोंदणी, 5,64,611 पात्र
  • SC: 3,33,646 नोंदणी, 1,68,873 पात्र
  • ST: 1,50,224 नोंदणी, 67,234 पात्र
  • General: 6,89,366 नोंदणी, 3,38,728 पात्र
  • EWS: 1,54,326 नोंदणी, 97,085 पात्र
  • PwBD श्रेणीतील पात्र उमेदवार: 3,673

पात्रता निकष आणि गुणमर्यादा (कट ऑफ) (NEET 2025)

  • UR/EWS: 686-144 गुण, 11,01,151 पात्र
  • OBC: 143-113 गुण, 88,692 पात्र
  • SC: 143-113 गुण, 31,995 पात्र
  • ST: 143-113 गुण, 13,940 पात्र
  • PwBD सर्व श्रेणी: किमान गुण मर्यादा 126-113 दरम्यान

 राज्यवार नोंदणी व पात्र उमेदवार (NEET 2025)

  • उत्तर प्रदेश: 3,41,491 नोंदणी, 1,70,684 पात्र
  • महाराष्ट्र: 2,48,201 नोंदणी, 1,25,727 पात्र
  • राजस्थान: 1,80,637 नोंदणी, 1,19,865 पात्र
  • कर्नाटका: 1,47,782 नोंदणी, 83,582 पात्र
  • तामिळनाडू: 1,40,158 नोंदणी, 76,181 पात्र
  • बिहार: 1,64,186 नोंदणी, 80,954 पात्र
  • केरळ: 1,27,442 नोंदणी, 73,328 पात्र
  • दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशसह इतर राज्यांमधूनही लक्षणीय सहभाग

 NEET 2025 – परीक्षा आयोजन सांख्यिकी

घटकआकडेवारी
परीक्षा घेणारी शहरे566 (14 परदेशात समाविष्ट)
परीक्षा भाषा13 भाषा (मराठीसह)
परीक्षा केंद्रे5468
उपकेंद्र प्रमुख (Deputy Centre Supdt.)8205
पर्यवेक्षक (Invigilators)1,89,672
निरीक्षक (Observers)10,936
शहर समन्वयक (City Coordinators)697

या आकडेवारीतून स्पष्ट होते की NEET (UG) ही भारतातील सर्वात मोठी वैद्यकीय पात्रता परीक्षा आहे, जी अत्यंत विस्तृत व अचूक नियोजनासह घेतली जाते.

निष्कर्ष

NEET (UG) 2025 मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. महिला विद्यार्थिनींचे प्रमाण वाढले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही स्पर्धेत छाप पाडली आहे. मराठी भाषेतील सहभाग मात्र घटलेला दिसतो. NEET परीक्षेच्या माध्यमातून देशातील वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरते.

 पुढील टप्पा: काउंसिलिंग प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.


स्रोत: राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) द्वारे जाहीर NEET (UG) अहवाल 2025

NEET 2025 चे १०० टॉपर्स च्या यादीसाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट – https://neet.nta.nic.in/

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती – 2025 मध्ये सुवर्णसंधी!- Indian Coast Guard Bharti 2025

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत