NEET 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; 3 मे रोजी होणार राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा, क्लिक करून वाचा सविस्तर वृत्त !

Vishal Patole

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठीची सर्वात महत्त्वाची प्रवेश परीक्षा असलेल्या  NEET 2026 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून; 3 मे रोजी हि परीक्षा घेतली जाणार आहे. या राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अगोदरच सुरू झालेली आहे. National Testing Agency (NTA) ने 8 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वजनिक सूचना जारी करत देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी अर्ज मागवले आहेत. भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससह विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. सविस्तर वृत्त खाली वाचा-

NEET 2026

NEET 2026 परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख

 उमेदवार 8 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 या कालावधीत NEET 2026 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम वेळ 8 मार्च रोजी रात्री 9 वाजेपर्यंत आहे, तर अर्ज शुल्क भरण्याची अंतिम वेळ 11:50 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना अर्जामधील चुका दुरुस्त करण्यासाठी 10 मार्च ते 12 मार्च 2026 दरम्यान करेक्शन विंडो उपलब्ध असेल.

NEET 2026 परीक्षा कधी होणार?

NTA च्या माहितीनुसार  NEET 2026 ही परीक्षा 3 मे 2026 (रविवार) रोजी आयोजित केली जाणार आहे. परीक्षा दुपारी 2:00 ते 5:00 या वेळेत घेण्यात येईल. परीक्षेचा कालावधी 180 मिनिटे (3 तास) असणार आहे. परीक्षा केंद्राची माहिती उमेदवारांना त्यांच्या अॅडमिट कार्डवर दिली जाईल.

NEET 2026 साठी कोणता अभ्यासक्रम

 NEET 2026 परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे खालील पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो –

  • MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery)
  • BDS (Bachelor of Dental Surgery)
  • BVSc & AH (Veterinary Science and Animal Husbandry)
  • BAMS, BUMS, BSMS (भारतीय पारंपरिक वैद्यकीय पद्धती)
  • BHMS (होमिओपॅथी)
  • तसेच Military Nursing Service अंतर्गत B.Sc. Nursing अभ्यासक्रमासाठीही NEET (UG) गुणांचा उपयोग केला जाईल.

 13 भाषांमध्ये होणार परीक्षा

देशभरातील विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. त्यामध्ये –

इंग्रजी, हिंदी, मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे.

NEET 2026 परीक्षेसाठी अर्ज शुल्क (Application Fee)

 भारतामधील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे आहे –

  • सामान्य (General) – ₹1700
  • General-EWS / OBC-NCL – ₹1600
  • SC / ST / PwBD / तृतीयपंथी – ₹1000
  • परदेशातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क ₹9500 निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय प्रोसेसिंग चार्जेस आणि जीएसटी लागू होऊ शकतो.
NEET 2026 परीक्षा पॅटर्न

NEET 2026 मध्ये एकूण 180 प्रश्न विचारले जाणार असून सर्व प्रश्न MCQ (Multiple Choice Questions) प्रकारातील असतील.

विषय   प्रश्नगुण 
भौतिकशास्त्र 45  180
रसायनशास्त्र  45 180    
जीवशास्त्र (बॉटनी + झूलॉजी)90   360
एकूण  180720
NEET 2026 परीक्षेसाठी अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी –

 National Testing Agency – https://nta.ac.in

NEET 2026 ची परीक्षा देण्याकरिता नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.

 NEET – [https://neet.nta.nic.in](https://neet.nta.nic.in)

अर्ज करताना उमेदवारांनी अलीकडील पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी, पत्ता पुरावा इत्यादी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक उमेदवाराने फक्त एकच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

 हेल्पलाइन माहिती

परीक्षेसंदर्भात अधिक माहिती किंवा शंका असल्यास उमेदवार खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकतात –

 हेल्पलाइन: +91-11-40759000 / 011-69227700

 ई-मेल: neetug2026@nta.ac.in, mailto:neetug2026@nta.ac.in

 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

NTA ने विद्यार्थ्यांना अर्ज भरताना सर्व सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला आहे. अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास उमेदवाराला अपात्र घोषित केले जाऊ शकते. तसेच अर्जामध्ये दिलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी सक्रिय असणे आवश्यक आहे, कारण सर्व सूचना त्याच माध्यमातून पाठवल्या जाणार आहेत.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत