श्रीनगर : 28 जुलै 2025 – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा करत असतानाच, काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी मोठा विजय मिळवला आहे. श्रीनगरजवळ आज सकाळी झालेल्या Operation Mahadev मध्ये तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या तिघांमध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या भयावह पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सुलैमान शहा याचाही समावेश आहे. सुलैमान शहा, जो लष्कर-ए-तोयबाचा (LeT) दहशतवादी होता, त्याच्यावर पहलगामच्या बैसरण व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे असल्याचा ठपका होता. या हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. जम्मू-कश्मीर पोलिसांनी याच्यावर माहिती देणाऱ्यासाठी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

आज झालेल्या चकमकीचे नाव ऑपरेशन महादेव (Operation Mahadev) ठेवण्यात आले होते. या ऑपरेशनमध्ये आणखी दोन दहशतवादी — अबू हमजा आणि यासिर — यांचाही खात्मा करण्यात आला. यासिर देखील पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे.
Operation Mahadev
भारतीय लष्कराच्या चिनार कोअरच्या अधिकृत ‘X’ (माजी ट्विटर) खात्यावरून माहिती देण्यात आली की, “लिडवास भागात सुरू करण्यात आलेल्या (Operation Mahadev) ऑपरेशन महादेवमध्ये तिघे दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. अजूनही ऑपरेशन सुरू आहे.”
ही कारवाई भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-कश्मीर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने केली. गुप्त माहितीवरून श्रीनगरजवळील हरवानच्या मुलनार परिसरात ही मोहीम हाती घेण्यात आली. सर्व दहशतवादी “हाय व्हॅल्यू टार्गेट्स” होते. परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असून अतिरिक्त दलं तैनात करण्यात आली आहेत.
सुलैमान शहा पूर्वी पाकिस्तान आर्मीमध्ये सेवा देत होता व ‘हाशिम मूसा’ या नावानेही ओळखला जात होता.
हे ऑपरेशन देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठे यश मानले जात आहे.
Operation Mahadev -ऑपरेशन महादेव घटनाक्रम
- घटना स्थळ व वेळ:ऑपरेशन महादेव 28 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्रीनगरजवळील हरवान परिसरातील डाचिगाम नॅशनल पार्कजवळ सुरू झाले. ही कारवाई लिडवास भागात भारतीय लष्कर व जम्मू-कश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाद्वारे पार पडली.
- ठार करण्यात आलेले दहशतवादी:तीन पाकिस्तानी दहशतवादी ठार.यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सुलैमान शहा याचा समावेश आहे.
- इतर दहशतवाद्यांमध्ये जिब्रान (जो सोनमार्ग टनेल प्रकल्पावर हल्ल्यात सहभागी होता) याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- सुलैमान शहा कोण होता?- सुलैमान शहा उर्फ हाशिम मूसा.पाकिस्तानी लष्करात पूर्वी सेवा केलेली.एप्रिल 2025 मधील पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले होते, त्या हल्ल्यामागचा प्रमुख सूत्रधार.
- ऑपरेशनचे नाव कसे पडले?- हे ऑपरेशन झबरवान आणि महादेव डोंगररांगेत जंगलात पार पडल्याने त्याला “ऑपरेशन महादेव” असे नाव देण्यात आले.
- सुरक्षा दलांचा सहभाग: भारतीय लष्कर, चिनार कोर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि विशेष पॅरा कमांडो यांचे संयुक्त पथक सहभागी.
- इतर घडामोडी: कुपवाडा जिल्ह्यातील क्रालपोरा परिसरात वली मोहम्मद मीर नावाचा एक दहशतवादी सहाय्यक अटक. त्याच्याकडून एके-56 रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला गेला.
Operation Mahadev बद्दल समाज माध्यमावरील प्रतिक्रिया
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
