भारती एअरटेलने आज दि. 17 जुलै 2025, गुरुवारला एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने परप्लेक्सिटी (Perplexity) या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित सर्च आणि उत्तर देणाऱ्या इंजिनसोबत भागीदारी करत आपल्या 360 दशलक्ष (36 कोटी) ग्राहकांसाठी एक वर्षाचे परप्लेक्सिटी Pro सब्स्क्रिप्शन मोफत देण्याची घोषणा केली आहे.

Perplexity )परप्लेक्सिटी म्हणजे काय?
परप्लेक्सिटी हे एक AI-संचालित सर्च इंजिन आहे जे वापरकर्त्यांना संवादात्मक भाषेत रिअल-टाईम माहिती पुरवते. त्याच्या प्रो व्हर्जनमध्ये आणखी विस्तारित सुविधा मिळतात जसे की:
- अधिक प्रो सर्चेस प्रति दिवस
- GPT-4.1, Claude यांसारख्या प्रगत AI मॉडेल्सचा प्रवेश
- विशिष्ट मॉडेल निवडण्याची सुविधा
- डीप रिसर्च, इमेज जनरेशन
- फाईल अपलोड आणि विश्लेषण
- Perplexity Labs: कल्पना साकार करण्यासाठी एक खास साधन
(Perplexity) एअरटेल ग्राहकांना हे कसे मिळेल?
मोफत परप्लेक्सिटी Pro सब्स्क्रिप्शनची हि ऑफर एअरटेलच्या सर्व सेवा वापरकर्ते जसे कि मोबाईल, DTH आणि वाय-फाय ग्राहकांना एक वर्षासाठी मिळणार आहे. या ऑफर चा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांनी फक्त Airtel Thanks App वर लॉगिन करून हे सब्स्क्रिप्शन सक्रिय करायचे आहे.
भारती एअरटेलचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल म्हणाले: “परप्लेक्सिटीसोबतची भागीदारी ही भारतीय डिजिटल क्षेत्रातील पहिली जन-AI भागीदारी आहे. आमच्या ग्राहकांसाठी हा एक शक्तिशाली आणि वेळोवेळी माहिती देणारा ज्ञानस्रोत ठरणार आहे – तेही कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय.”
परप्लेक्सिटीचे सहसंस्थापक आणि CEO अरविंद श्रीनिवास यांनी सांगितले:
“भारतामधील अधिकाधिक लोकांपर्यंत विश्वसनीय, अचूक आणि व्यावसायिक AI पोहोचवण्यासाठी ही भागीदारी अतिशय महत्त्वाची आहे. मग तो विद्यार्थी असो, व्यावसायिक असो किंवा गृहव्यवस्थापक – सर्वांसाठी परप्लेक्सिटी Pro हे माहिती शोधणे, शिकणे आणि अधिक उत्पादनक्षम होण्याचे सुलभ साधन ठरेल.”
सध्या परप्लेक्सिटी Pro ची जागतिक किंमत सुमारे ₹17,000 वार्षिक आहे, मात्र एअरटेलच्या ग्राहकांना ही सुविधा पूर्णतः मोफत मिळणार आहे.
अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्यब्लॉग पोस्ट :
