ब्रेकिंग न्यूज: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले; २४२ प्रवाशांसह मोठा अपघात- Plane Crash

Vishal Patole
Plane Crash

Plane Crash अहमदाबाद, १२ जून २०२५ — अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान (फ्लाईट AI171) टेक-ऑफनंतर काही मिनिटांतच अपघातग्रस्त झाले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते ज्यामध्ये २३० प्रवासी, २ वैमानिक आणि १० केबिन क्रू सदस्यांचा समावेश आहे.

Plane Crash

एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान फ्लाईट AI171 – Plane Crash

एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान फ्लाईट AI171 अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत सुमारे ८२५ फूट उंचीवर पोहोचल्यानंतर अचानक खाली कोसळले आणि अहमदाबादमधील मेघाणी भागात एका उंच इमारतीवर धडकले. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड मोठा स्फोट झाला व त्यानंतर काळा धूर आकाशात उसळताना दिसला आहे त्यानंतर तात्काळ आपत्कालीन सेवा सक्रिय करण्यात आल्या असून फायर ब्रिगेड व अन्य बचाव पथके घायाळ प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात पोहोचविण्याचे काम करीत आहेत.

विमानाचा तांत्रिक ताबा कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्याकडे होता आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर हे त्यांना सहाय्य करत होते. लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने विमानात भरपूर इंधन भरलेले होते, ज्यामुळे दुर्घटनेनंतर मोठा स्फोट झाला आणि आगीने रौद्ररूप धारण केले.

अपघात स्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या व रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या असून बचावकार्य सुरू आहे. अनेक जखमींना जवळील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या मृतांची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करणार असून बोईंगकडूनही तांत्रिक पथक पाठवले जाण्याची शक्यता आहे. अद्याप अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

या दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी प्रतिक्रिया देत सांगितले, “अहमदाबाद येथील या विमान दुर्घटनेमुळे व्यथित झालो आहे. संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून मदत व बचाव कार्य सुरू आहे. सर्व जखमींना तातडीने वैद्यकीय मदत दिली जात आहे.”

Plane Crash

एअर इंडियाचे अधिकृत निवेदन – Plane Crash

एअर इंडियाने आपल्या सोशल मिडिया माध्यम साईट “x” च्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत संबंधित अपघाताची पुष्टी केली आहे आपल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, “एअर इंडिया पुष्टी करते की अहमदाबादहून लंडन गॅटविककडे जाणाऱ्या फ्लाईट AI171 या विमानाचा आज टेक-ऑफनंतर (Plane Crash) अपघात झाला आहे.

या बोईंग 787-8 विमानाने अहमदाबादहून दुपारी १३:३८ वाजता उड्डाण घेतले होते. विमानात एकूण २४२ प्रवासी व क्रू सदस्य होते. यामध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.

जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात येत आहे.

प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी अधिक माहिती देण्यासाठी खास हेल्पलाईन क्रमांक १८०० ५६९१ ४४४ सुरू करण्यात आला आहे.

या Plane Crash च्या तपासात एअर इंडिया संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे.

या घटनेबाबतची पुढील माहिती एअर इंडिया आपल्या अधिकृत X हँडलवर (https://x.com/airindia) तसेच http://airindia.com वर सातत्याने प्रसिद्ध करत राहील.”

Plane Crash च्या संदर्भात प्रसार माध्यम प्रतिनिधींना एअर इंडिया ने सूचना जाहीर करत म्हंटले आहे कि :
कृपया विशेष प्रवासी हेल्पलाईन क्रमांकावर (१८०० ५६९१ ४४४) मीडिया प्रतिनिधींनी संपर्क करू नये.

लंडन गॅटविक विमानतळानेही निवेदन देऊन सांगितले की, “AI171 हे विमान आज लंडन गॅटविक विमानतळावर सायंकाळी १८:२५ वाजता पोहोचण्याचे नियोजित होते.”

एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी अधिकृत निवेदनात म्हटले, “ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. आमच्या सर्व प्रवासी व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखातआम्ही सामील आहोत. आपत्कालीन सेवा, मदतकार्य व सर्व संबंधितांना आवश्यक ती मदत पोहोचवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.”

सध्या घटनास्थळी आपत्कालीन यंत्रणा, पोलीस व आरोग्यसेवा कार्यरत असून परिसरात वाहतूक मार्ग बदलण्यात आले आहेत.

Plane Crash च्या संदर्भातील सोशल मिडिया वरील व्हिडीओ साठी येथे क्लिक करा.

बि जे मेडिकल कॉलेज होस्टेल च्या इमारतीवर कोसळले विमान

एअर इंडियाचे विमान टेक-ऑफ केल्यावर अवघ्या ५ मिनिटांत बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर कोसळले! . या मेडिकल हॉस्टेलमध्ये अनेक इंटर्न डॉक्टर देखील वास्तव्यास होते. सामाजिक माध्यमांवर उपलब्ध असलेल्या फोटो नुसार या होस्टेल मधील डायनिंग हॉल मध्ये जेवणाच्या टेबलवर ताटे तसीच उर्वरित पडलेली दिसत आहेत. अचानक झालेल्या या दुर्घटनेत काही शिकाऊ डॉक्टर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने ऑपरेशनल कंट्रोल रूम सक्रिय केली

नागरी उड्डाण मंत्रालय (@MoCA_GoI) यांनी AI171 विमान दुर्घटनेशी संबंधित सर्व अपडेट समन्वयित करण्यासाठी एक ऑपरेशनल कंट्रोल रूम सक्रिय केली आहे. पी आय बी ने आपल्या सामाजीक माध्यम साईट “X” वर पोस्ट करत तशी माहिती प्रसिद्ध केली आहे.

मदतीसाठी संपर्क : ०११-२४६१०८४३, ९६५०३९१८५९

आमचे अन्य ब्लॉग पोस्ट :

रेल्वे भरती बोर्ड RRB NTPC – CEN 05/2024 परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध – त्वरित डाउनलोड करा! – RRB Admit Card

शेतकरी आयडी का आवश्यक आहे? – प्रत्येक शेतकऱ्याने नक्की वाचा! – Farmer ID

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
2 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत