पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे भेट देणार आहेत. या दौऱ्यात शेतकऱ्यांची कल्याणकारी स्कीम पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत तसेच सुमारे ₹२,२०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण ते करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीच्या दौऱ्यावर असताना जनतेला संबोधितही करतील.

PM-KISAN सन्मान निधी २०वा हफ्ता
प्रधानमंत्री मोदींच्या वाराणसी दौऱ्यात PM-KISAN या योजने अंतर्गत, देशभरातील ९.७ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट ₹२०,५०० कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचा हा २०वा हफ्ता असून या योजनेच्या प्रारंभापासून आजपर्यंतचा एकूण निधी वितरणाचा आकडा आता ₹३.९० लाख कोटींच्या वर पोहोचला आहे. ही योजना केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरती मर्यादित नसून, शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासात आणि अर्थिक स्थैर्यात भर घालणारी एक महत्वाची शृंखला बनली आहे.
मोदींच्या वाराणसी दौऱ्यात ते सुमारे ₹२,२०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करणार आहेत या प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, नागरी विकास, सांस्कृतिक वारसा अशा विविध क्षेत्रांचा समावेश असून वाराणसीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हे महत्त्वाचे टप्पे ठरणार आहेत.
महत्त्वाचे विकास प्रकल्प:
- रस्ते आणि पायाभूत सुविधा:वाराणसी-भदोही रस्ता व छितौनी-शूल टंकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण, हारदत्तपूर रेल्वे ओव्हरब्रिजचे उद्घाटन. याशिवाय दलमंडी, लहरतारा-कोटवा, गंगापूर, बाबतपूर आदी भागातील ग्रामीण व शहरी रस्त्यांचे विकासकामे आणि नवे रेल्वे ओव्हरब्रिज.
- विद्युत क्षेत्र: स्मार्ट डिस्ट्रीब्युशन प्रकल्पाअंतर्गत विविध कार्यांचा प्रारंभ आणि ₹८८० कोटींच्या भुयारी वीज पायाभूत सुविधांचे भूमिपूजन.
- पर्यटन व सांस्कृतिक विकास: ८ घाटांचे पुनर्विकास, कालिका धामातील विकासकामे, दुर्गाकुंडचे पुनरुज्जीवन, रंगिलदास कुटी घाटाचे सौंदर्यीकरण, मुंशी प्रेमचंद यांच्या लमही येथील वडिलोपार्जित घराचे पुनरुत्थान, आणि सिटी फॅसिलिटी सेंटर्सचे निर्माण.
- महत्त्वाचे धार्मिक व ऐतिहासिक स्थळे:कर्दमेश्वर महादेव मंदिराचे पुनरुद्धार, क्रांतीकारकांच्या जन्मस्थळ करखियाँवचा विकास, काशीमध्ये मियावाकी जंगल आणि शहीद उद्यान व इतर २१ उद्यानांचे सुशोभीकरण.
- पेयजल व कुंडांचे जतन:रामकुंड, मंदाकिनी, शंकुलधारा आदी पौराणिक कुंडांचे शुद्धीकरण व देखभाल, चार फ्लोटिंग पूजन प्लॅटफॉर्म्सची उभारणी, आणि ४७ ग्रामीण पिण्याचे पाणी योजनांचे उद्घाटन.
- शिक्षण:५३ शाळा इमारतींचे उन्नतीकरण, नवीन जिल्हा ग्रंथालय, जाखीनी व लालपूर येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळांचे नवसृजन.
- आरोग्य:महामना मदन मोहन मालवीय कॅन्सर सेंटर आणि होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरी व सीटी स्कॅन सुविधा, नवीन होमिओपॅथिक कॉलेज व हॉस्पिटल, प्राणी जन्म नियंत्रण व कुत्रा निगा केंद्राचे उद्घाटन.
- खेळ व सुरक्षा:डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा संकुलात सिंथेटिक हॉकी टर्फचे उद्घाटन, पीएसी रामनगर येथे ३०० क्षमतेचा बहुउद्देशीय सभागृह आणि क्यूआरटी बॅरक्सचे भूमिपूजन.
- शेतकरी कल्याण SCHEME PM-KISAN योजना :पीएम-किसान (PM-KISAN)योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरण, ९.७ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹२०,५०० कोटी जमा होणार. एकूण वितरण ₹३.९० लाख कोटींपेक्षा जास्त होणार.
- काशी संसद स्पर्धा पोर्टलचे उद्घाटन:स्केचिंग, पेंटिंग, फोटोग्राफी, खेळ, ज्ञान स्पर्धा व रोजगार मेळा या स्पर्धांसाठी नोंदणी पोर्टल सुरू.
- दिव्यांग व वरिष्ठ नागरिकांना सहाय्य:७,४०० हून अधिक सहाय्यक साधनांचे वितरण.
या सर्व प्रकल्पांमुळे वाराणसीच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शहरी जीवनात व्यापक बदल घडतील, असे अपेक्षित आहे.
पंतप्रधान मोदींनी समाज माध्यम साईट “X” माध्यमातून केली घोषणा
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
