महाराष्ट्रात 11,000 पोलिसांची भरती (Police Bharti) होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा!

Vishal Patole
Police Bharti


राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 11,000 नवीन पोलिसांची भरती (Police Bharti) करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच झालेले पावसाळी अधिवेशन 2025 दरम्यान केली. साधारणपणे ऑक्टोबर २०२५ मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या भरती अंतर्गत पोलीस शिपाई, बंदोबस्त पथकातील बँड्समन, चालक शिपाई आणि राज्य राखीव दलातील विविध पदे भरली जाण्याची अपेक्षा आहे. या भरती प्रक्रियेत सर्वप्रथम मैदानी चाचणी (Physical Test) घेण्यात येईल, आणि त्यानंतर लेखी परीक्षा होईल. विशेष बाब म्हणजे मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Police Bharti

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची Police Bharti ची घोषणा

“राज्यातील सुरक्षाव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी आणि तरुणांना रोजगाराची संधी देण्यासाठी 11,000 पोलीस भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे,” असे श्री. फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

Police Bharti काय अपेक्षित आहे?

  • राज्यभरातील पोलिस दलाची ताकद वाढणार
  • ग्रामीण आणि शहरी भागातील सुरक्षेला बळ
  • युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी
  • स्मार्ट पोलीसिंगसाठी आधुनिक प्रशिक्षण

पुढील टप्पे:

सरकार लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करणार असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, शारीरिक चाचण्या, आणि लेखी परीक्षा यासारखे टप्पे घेण्यात येणार आहेत.

निष्कर्ष:

राज्यातील वाढती लोकसंख्या, नागरी गुन्हेगारी, आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या गरजा लक्षात घेता ही भरती काळाची गरज होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलून युवकांना संधी आणि राज्याला सुरक्षिततेचा विश्वास दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समाजमाध्यमातील प्रतिक्रिया.

भारताने स्वच्छ ऊर्जा (Clean Energy) क्षेत्रात रचला विक्रम: 2030 चे लक्ष्य 2025 मध्येच पूर्ण!

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया
  • पिंगबॅक GNM

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत