ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2026 — India Post कडून Post Office Recruitment ची मोठी संधी !

Vishal Patole

भारतीय टपाल विभाग (Indian Post / India Post) अंतर्गत ग्रामीण भागातील विविध कार्यालयांसाठी GDS Recruitment जाहीर झाली आहे. या Post Office Recruitment प्रक्रियेत Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak पदे भरली जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त अधिकृत India Post पोर्टलवरून ऑनलाईन करायचा आहे.

Post Office Recruitment

भरतीचा आढावा — GDS Recruitment

ही GDS Recruitment मोहीम ग्रामीण टपाल सेवा बळकट करण्यासाठी राबवली जात आहे. प्रत्येक सर्कल/डिव्हिजनमधील रिक्त पदांची माहिती Annexure-I मध्ये देण्यात आली आहे. अर्ज करताना उमेदवाराने फक्त एकदाच नोंदणी करावी; डुप्लिकेट नोंदणी आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल. अर्ज करताना कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही, मात्र फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.

नोंदणी व अर्जाचे वेळापत्रक (Post Office Recruitment Schedule)

टप्पाकालावधीवेळ
One-Time Registration31.01.2026 ते 14.02.2026सायं. 5:00 पर्यंत
ऑनलाईन अर्ज व फी भरणा02.02.2026 ते 16.02.2026सायं. 5:00 पर्यंत
Edit/Correction Window18.02.2026 ते 19.02.2026सायं. 5:00 पर्यंत

अर्ज सबमिट केल्यानंतर चूक लक्षात आल्यास पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. India Post कडून दोन दिवसांचा Edit/Correction Window दिला जाईल.

पदनिहाय कामकाज (Job Profile in GDS Recruitment)

Branch Postmaster (BPM)

  • CSC सेवा व टपाल सेवांचे मार्केटिंग
  • शाखा पोस्ट ऑफिसची पूर्ण जबाबदारी
  • टपाल वहन व वितरण
  • स्वतः जागा उपलब्ध करून संबंधित गावात राहणे बंधनकारक

Assistant Branch Postmaster (ABPM)

  • तिकीट/स्टेशनरी विक्री, घरपोच टपाल, IPPB व्यवहार
  • BPM ला सहाय्य व अनुपस्थितीत कामकाज
  • BO क्षेत्रात राहणे आवश्यक

Dak Sevak

  • HO/SO/RMS मध्ये मेल सॉर्टिंग व हाताळणी
  • तिकीट विक्री, घरपोच टपाल, IPPB सेवा
  • वितरण क्षेत्रात निवास आवश्यक

वेतन व भत्ते — India Post GDS Salary (TRCA)

GDS कर्मचाऱ्यांना वेतन TRCA (Time Related Continuity Allowance) स्वरूपात दिले जाते. दरवर्षी 3% वाढ, Dearness Allowance, GDS Gratuity आणि Service Discharge Benefit Scheme (NPS सारखी) सुविधा मिळते.

पदTRCA वेतनमान
BPM₹12,000 ते ₹29,380
ABPM / Dak Sevak₹10,000 ते ₹24,470

पात्रता निकष (Eligibility for Post Office Recruitment)

वयोमर्यादा

  • 18 ते 40 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे, PwBD: 10–15 वर्षे सवलत
  • EWS ला वयोमर्यादा सवलत नाही, पण 10% आरक्षण लागू

शैक्षणिक अर्हता

  • 10वी उत्तीर्ण (गणित व इंग्रजी पास)
  • मान्यताप्राप्त मंडळ

इतर पात्रता

  • संगणक ज्ञान
  • सायकल चालवता येणे
  • उपजीविकेचे साधन

निवड प्रक्रिया — Merit Based GDS Recruitment

India Post मध्ये ही gds recruitment पूर्णपणे मेरिटवर आधारित आहे. 10वीच्या गुणांवर System Generated Merit List तयार केली जाईल. फक्त ग्रेड असल्यास 9.5 ने गुणाकार करून गुणांची गणना केली जाईल.

कागदपत्र पडताळणी (Document Verification)

Shortlist झालेल्या उमेदवारांना SMS/Email द्वारे कळवले जाईल. 15 दिवसांत Divisional/Unit Head कार्यालयात मूळ कागदपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे. Medical Certificate अनिवार्य आहे.

अर्ज फी (Application Fee)

  • फी: ₹100
  • सूट: महिला, SC/ST, PwBD, Transwomen
  • पेमेंट: Debit/Credit Card, Net Banking, UPI
  • फी परत मिळणार नाही

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

Post Office Recruitment – विभागनिहाय जागा

  • अहिल्या नगर विभाग – ७३
  • अमरावती विभाग – १३२
  • अकोला विभाग – १०५
  • बारामती विभाग – ६५
  • बीड विभाग – ७४
  • भुसावळ विभाग – ६३
  • बुलढाणा विभाग – ४८
  • चंद्रपूर विभाग – ३२५
  • छत्रपती संभाजी नगर विभाग – ९९
  • धाराशिव विभाग – ८४
  • धुळे विभाग – १३३
  • गोवा विभाग – ९२
  • जळगाव विभाग – ६४
  • कराड विभाग – ८६
  • कोल्हापूर विभाग – १०८
  • मालेगाव विभाग – ८०
  • मुंबई शहर पूर्व – ३
  • मुंबई शहर उत्तर – ५
  • मुंबई शहर नॉर्थ इस्ट – १०
  • मुंबई शहर नॉर्थ वेस्ट – १८
  • मुंबई शहर दक्षिण – १
  • मुंबई शहर पश्चिम – ४
  • मुंबई शहर जी पी ओ – १
  • नांदेड विभाग – ५८
  • नागपूर शहर विभाग – ८
  • नागपूर मोफुशील विभाग – ३०५
  • नाशिक विभाग – ५२
  • नवी मुंबई – ४९
  • नांदेड विभाग – ५८
  • पालघर विभाग – ८१
  • पंढरपूर विभाग – ६१
  • परभणी विभाग – ४९
  • पुणे शहर पूर्व – ३०
  • पुणे शहर पश्चिम – १२
  • पुणे मोफुशील – १३१
  • रायगड विभाग – १३६
  • रत्नागिरी विभाग – २१८
  • आर एम एस मिरज – ४
  • आर एम एस भुसावळ – १
  • सांगली विभाग – १
  • सातारा विभाग – ८४
  • श्रीरामपूर विभाग – ७४
  • सिंधुदुर्ग विभाग – १००
  • सोलापूर विभाग – ६७
  • ठाणे विभाग – ७०
  • वर्धा विभाग – ८३
  • यवतमाळ विभाग – ९३

जातनिहाय जागांचा सविस्तर तपशील पाहण्यसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या

अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज.

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत