Pushpa –पुष्पा: द रूल या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे चाहते पुन्हा एकदा आनंद साजरा करू शकतात, कारण चित्रपटाची रीलोडेड आवृत्ती 11 जानेवारीपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, या आवृत्तीत 20 मिनिटांचे अतिरिक्त दृश्य समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे कथा आणखी दमदार आणि रोमांचक होणार आहे. नुकतेच निर्माता कंपनी Mythri Movie Makers ने सोशल मिडिया मायक्रो ब्लॉगिंग साईट “X” वर याबाबत माहिती दिली आहे. “The Wildfire Gets Extra Fiery” या घोषवाक्यासह या आवृत्तीमध्ये प्रेक्षकांना भरघोस अॅक्शन, उत्कंठावर्धक घटना आणि नवीन दृश्यांचा थरार अनुभवता येणार आहे. असे Mythri Movie Makers चे म्हणणे आहे.

Pushpa- रीलोडेड आवृत्तीमध्ये काय खास ?
२० मिनिटांच्या नवीन दृश्यांमुळे पुष्पाच्या संघर्षमय प्रवासाची अधिक सखोल झलक पाहायला मिळणार का? कि अतिरिक्त दृश्यांमध्ये चित्रपटाला काही महत्त्वाचे वळण मिळेल ? कि, उत्कट चकमकी, आणि कथेचा गडद पैलू उलगडणार आहे ? आता नेमके या वाढीव २० मिनिटात काय दाखवले जाईल असा प्रश्न पुष्पा च्या चाहत्यांना पडला आहे ज्याचे उत्तर त्यांना 11 जानेवारीला रिलोडेड पुष्पा रिलीज झाल्यावर पाहायला मिळणार आहे.
Pushpa- पुन्हा एकदा ‘पुष्पा’चा ज्वर!
अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयाची जादू, रश्मिका मंदान्नाचे कौशल्य, आणि चित्रपटातील धडाकेबाज संगीत पुन्हा एकदा प्रेक्षकांवर मोहिनी घालणार आहे. तर 11 जानेवारीपासून चित्रपटगृहात या रीलोडेड आवृत्तीचा थरार अनुभवता येणार आहे ज्यामध्ये पुष्पा 2: द रूल आता बिनधास्त, अधिक प्रचंड आणि आणखी आगीसारखा जळता अनुभव देणार आहे!
पुष्पा चा ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्यब्लॉगपोस्ट:
BOX OFFICE वरील पुष्पा-२ ची जादू कायम ! चित्रपट 1713 करोड पार !
